Smartphone Tricks: तुम्हाला जर तुमच्या मित्र मैत्रिणींना कॉल(Call) करून त्रास द्यायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला एक कमालीची ट्रिक सांगणार आहोत. गंमत म्हणजे यामध्ये तुम्ही समोरच्या व्यक्तीला फोन किंवा मेसेज केल्यावर तुमचा नंबर दिसणार नाही. चला तर या भन्नाट ट्रिकबद्दल जाणून घेऊयात.
तुमचा नंबर कोणालाही कळू न देता करू शकता फोन
सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या Android फोनमध्ये 'Text Me' नावाचे अॅप डाउनलोड करून घ्यावे लागणार आहे. तुमच्याकडे एकच सिमचा फोन(Single SIM) असेल किंवा एकच सिम असेल तर हे अॅप तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकणार आहे. हे अॅप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला येथे साईन अप(Sign Up) करावे लागेल. स्वत:ची नोंदणी(Registration) पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला तो नंबर द्यावा लागेल जो तुम्हाला इतरांना दिसावा असे वाटत असेल. म्हणजेच, तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही क्रमांक याठिकाणी टाकू शकता. मात्र, याकरिता तुम्हाला सबस्क्रिप्शन(Subscription) घ्यावे लागणार आहे, पण तुम्ही सबस्क्रिप्शन शिवायही कॉल करू शकता. तुम्हाला अॅप डाउनलोड करण्यासाठी काही क्रेडिट्स(Credits) देण्यात येतील. या क्रेडिट्सचा वापर करून तुम्ही कोणालाही कॉल करू शकणार आहेत.
एकापेक्षा जास्त नंबर वापरायचे असतील तर द्यावे लागतील पैसे
कॉल करण्यासाठी तुम्हाला तळाशी एक डायल पॅड(Dial Pad) देण्यात येईल. त्यावर टॅप केल्यानंतर कोणताही नंबर डायल करा. असे केल्यावर तुमचा कॉल समोरच्या व्यक्तीकडे जाईल तेव्हा त्याला दिसणारा नंबर हा वेगळा असणार आहे. मात्र जर तुम्हाला एकापेक्षा जास्त नंबर वापरायचे असतील तर तुम्हाला त्यासाठी पेड सब्स्क्रिप्शन(Paid Subscription) द्यावे लागणार आहे. या अॅपद्वारे तुम्ही तुमचा नंबर न देता कोणाशीही चॅट देखील करू शकणार आहात.
(टीप: ही माहिती एनबीटीने(NBT) दिली आहे. तुम्ही तुमच्या जबाबदारीवर हे अॅप वापरून पाहू शकता.)