2022 Kawasaki Ninja 300: वर्षाच्या शेवटी अनेक ऑटोमेकर्स कंपन्या (Automakers companies) त्यांच्या वाहनांवर सूट देत असतात. या संधीचा फायदा घेऊन तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता. जपानी दुचाकी उत्पादक कंपनी Kawasaki डिसेंबर महिन्यात त्यांच्या प्रसिद्ध मॉडेल निन्जा 300 वर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. कंपनीने या ऑफरची घोषणा एका सोशल मीडिया (Social media) पोस्टद्वारे केली आहे, ज्या अंतर्गत तुम्ही या बाईकच्या खरेदीवर 10,000 रुपयांची रोख सूट (Cash discount) घेऊ शकता, सविस्तर जाणून घेऊया.
कावासाकी निन्जा 300 ची किमत (Kawasaki Ninja 300 Price)
भारतीय बाजारपेठेतील कावासाकीचे हे सर्वात लोकप्रिय मॉडेल आहे. कावासाकी निन्जा 300 (Kawasaki Ninja 300) ही Youngster मध्ये खूप जास्त पॉप्युलर आहे. पण तिच्या हाय किमतीमुळे तिची मागणी कमी होती. पण आता वर्षाच्या अखेर कंपनीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टनुसार, या बाइकवर 10,000 रुपयांची सूट दिली जात आहे, जी 31 डिसेंबरपर्यंत valid आहे. या बाईकची किंमत 3.40 लाख रुपये पासून सुरू होते, डिस्काउंटनंतर याची किंमत 3.30 लाख रुपये होईल. कंपनीने ही बाईक फक्त भारतीय बाजारपेठेसाठी नवीन BS6 नुसार अपडेट केली आहे.
कावासाकी निन्जा 300 चे फीचर्स (Features of Kawasaki Ninja 300)
296cc क्षमतेचे पॅरलल-ट्विन लिक्विड-कूल्ड | 26.1 Nm टॉर्क जनरेट | 37mm टेलिस्कोपिक फोर्क |
फोर-स्ट्रोक, इंधन-इंजेक्टेड इंजिन | 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स | गॅस-चार्ज्ड मोनो-शॉक ऑब्झर्व्हर सस्पेंशन |
38.4 bhp पॉवर | स्लीपर क्लच | ड्युअल चॅनल अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम |
इतर वैशिष्ट्यांबरोबरच यात सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील देण्यात आला आहे. मागील बाजूस 140 मिमी रुंद टायर्स, शॉर्ट स्टाइल एक्झॉस्ट, राइज्ड फेयर्ड हँडलबार, अॅल्युमिनियम फूटपेग्स, हीट मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी (Management Technology) ही बाईक त्याच्या सेगमेंटमध्ये आणखी चांगली बनवते. ही बाईक एकूण तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे, ज्यात लाइम ग्रीन, कँडी लाइम ग्रीन आणि इबोनी ब्लॅक (Lime Green, Candy Lime Green and Ebony Black) यांचा समावेश आहे.