Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Xiaomi चा टीजर दाखल, एकाच वेळी लॉन्च होणार अनेक प्रॉडक्ट

Xiaomi

Image Source : www.ixbt.com

Xiaomi चा टीजर दाखल झाला आहे. कंपनी एकाच वेळी अनेक प्रॉडक्ट लॉन्च करणार आहे. कंपनीने रेडमी वॉच 3, रेडमी बँड 2 आणि इअरबड्स Redmi Buds 4 Lite या त्यांच्या वेअरेबल डिव्हाइसेसचा अधिकृत टीझर जारी केलेला आहे.

Xiaomi चा टीजर दाखल झाला आहे. कंपनी एकाच वेळी अनेक प्रॉडक्ट लॉन्च करणार आहे.  कंपनीने रेडमी वॉच 3, रेडमी बँड 2 आणि इअरबड्स Redmi Buds 4 Lite या त्यांच्या वेअरेबल डिव्हाइसेसचा अधिकृत टीझर जारी केलेला आहे.

 Xiaomi च्या 27 डिसेंबरच्या इव्हेंटमध्ये ही उत्पादने लॉन्च केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.  ही उत्पादने आधी देशांतर्गत बाजारात आणली जाणार आहेत. या व्यतिरिक्त कंपनी Redmi K60 आणि Redmi Note 12 Pro स्पीड एडिशन लाँच करू शकते, असेही सांगण्यात आले आहे. Xiaomi कडून त्याचा नवीन UI देखील अलीकडे आणण्यात आला आहे.

कंपनीने Weibo वर Redmi Watch 3, Redmi Band 2 आणि Redmi Buds 4 Lite ला टीज  केले आहे.  Xiaomi 27 डिसेंबर रोजी एक कॉन्फरन्स आयोजित करणार आहे. यामध्ये  ही उत्पादने लॉन्च केली जाऊ शकतात.  वेअरेबल्सची डिझाईनही टीझरच्या माध्यमातून समोर आली आहे. या टीझरनुसार, रेडमी वॉच 3 कंट्रोलर बटणांसह येईल. टीझरमध्ये ते एका चमकदार हिरव्या रंगाच्या पट्ट्यात दाखवण्यात आले आहे. त्याच वेळी Redmi Band 2 त्याच्या जुन्या मॉडेलच्या डिझाइनमध्ये सादर केला जाऊ शकतो तर Redmi Buds 4 Lite ही  डिझाइनमध्ये सादर केला जाणार आहे. रेडमी बड्स 4 लाइट टीझरमध्ये ब्लॅक आणि ग्रीन कलर थीममध्ये दाखवण्यात आले आहे.

MIUI 14

Xiaomi ने Android 13 आधारित कस्टम यूजर इंटरफेस MIUI 14 आणला आहे. यामध्ये अनेक उत्तम फीचर्स आणि अपडेट्सचा समावेश करण्यात आलेला आहे. Xiaomi च्या नवीनतम UI सह क्रॉस-डिव्हाइस सपोर्ट उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच, चांगल्या कार्यक्षमतेसाठी प्रगत सिस्टीम आर्किटेक्चरचा सपोर्ट देण्यात आलेला आहे.

कंपनीचा असा दावा आहे की,  MIUI 14 सह सिस्टम फ्लोमध्ये 60 टक्के सुधारणा झालेलीआहे. नवीन UI सह आयकॉन आणि व्हिज्युअलमध्ये देखील बदल केले जाऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे.  याचाच अर्थ आता तुम्हाला अधिक कस्टमायझेशन मिळेल. आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार आयकॉनचा आकार वाढवू किंवा कमी करू शकता आणि त्याची रचना देखील बदलू शकता.