Redmi Note 12 India Launch: Xiaomi या स्मार्टफोनची निर्मिती करणाऱ्या कंपनीने आपल्या Redmi Note या श्रेणीतील 12 वी सिरीज (Redmi Note 12 Series India Launch) भारतात लॉन्च केली. Redmi Note 12 सिरीजमधील टॉप मॉडेलमध्ये 200 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन कंपनीची अधिकृत वेबसाईट Mi.com याशिवाय ऑनलाईन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. ही विक्री 11 जानेवारीपासून सुरू होणार आहे.
शिओमी कंपनीने Redmi Note 12 सिरीज अंतर्गत एकूण 3 स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. यामध्ये Redmi Note 12 5G शिवाय Redmi Note 12 Pro आणि Note 12 Pro+ यांचा समावेश आहे. शिओमी ही चीनमधील कंपनी आहे. पण या कंपनीचे स्मार्टफोन भारतात मोठ्या प्रमाणात वापरले जातात. Redmi Note 12 मध्ये Qualcomm अंतर्गत Snapdragon 4 Gen 1 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. तर प्रो मॉडेल्समध्ये Media Tek Dimensity 1080 चिपसेटचा वापर केला आहे.
Redmi Note 12 सिरीजमधील फोनची किंमत
Redmi Note 12 ची किंमत 15,499 रुपये ठेवण्यात आली. ही किंमत 4GB रॅम आणि 128GB स्टोरेजसाठी ठेवण्यात आली आहे. तर Redmi Note 12 Proची किंमत 20,999 रुपये आहे आणि Redmi Note 12 Pro+ या फोनची किंमत 25,999 रुपये (Redmi Note 12 Price) असणार आहे.
Redmi Note 12 सिरीजमधील फोनचे फीचर्स!
Redmi Note 12 सिरीजमध्ये AMOLED स्क्रीन 120Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. या सिरीजमधील सर्व फोनमध्ये Android 12 देण्यात (Redmi Note 12 Specifications) आले आहे. कंपनीचे असे म्हणणे आहे की, युझर्सना दोन वर्षापर्यंत Android चे मिळत राहतील. याशिवाय यामध्ये 4 वर्षांची सिक्युरिटी स्कीम दिली आहे. याचा आकार 6.67 इंच असून याच्या हायर मॉडेलमध्ये HDR10+ आणि Dolby Visionची सोय दिली आहे.
Redmi Note 12 5G मध्ये तीन कॅमेरे दिले आहेत. याचा प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सेल आहे. याशिवाय 8 मेगापिक्सेलचा वाईड अॅंगल सेन्सर आणि एक 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी पुढच्या बाजुला 13 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. Redmi Note 12 Pro 5G मध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. याची बॅटरी 5000 mAh ची असून त्याला 33W चार्जिंग सपोर्ट दिला आहे.