देशातील विविध क्षेत्रात वर्चस्व गाजवणाऱ्या आणि आघाडीच्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या विप्रोनं (Wipro) आता ग्राहकोपयोगी वस्तूंच्या क्षेत्रात दमदार पाऊल टाकण्याचं ठरवलं आहे. विप्रो कंझ्युमर केअर अँड लाइटिंग या त्यांच्या उपकंपनीने केरळमधली आघाडीची कंपनी पॅकेज्ड फूड ब्रँड ब्राह्मिंसचे (Brahmins) विकत घेतली आहे. यामुळे आता विप्रोची खाद्य पदार्थ क्षेत्रात अदानी, अंबानी आणि टाटा यांच्याशी स्पर्धा होणार आहे. भारतातील पॅकेज्ड फूडची बाजारपेठ 5 लाख कोटी रुपयांची आहे. आणि मानवी गरजा बघता या क्षेत्राचा प्रचंड झपाट्याने विकास आणि विस्तार होत आहे. त्यात आता विप्रो आपल्या प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देऊन बाजारात मोठा बदल घडवण्याचे स्वप्न बघत आहे.
निरापारा ब्रँडने केली सुरुवात
विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी देखील मसाले आणि स्वयंपाकासाठी तयार उत्पादनांचा निरापारा (Nirapara) ब्रँड विकत घेऊन विप्रोने भारताच्या पॅकेज्ड फूड मार्केटमध्ये आपली जागा मजबूत केली होती. संतूर साबण, यार्डली टॅल्क मेकर्ससारख्या पूर्वी घरगूती आणि पर्सनल केअरबरोबरच लायटिंगवर त्यांनी लक्ष केंद्रित केले होते.
ब्राह्मिंस 1987 मध्ये स्थापना
विप्रोचे याआधी मार्केटध्ये कंझ्युमर केअर, साबण,वैयक्तिक आणि घरगुती स्वच्छता उत्पादने,इत्यादी प्रॉडक्ट होते. आता या कंपनीने केरळची कंपनी रेडी-टू-कूक ब्रँड ब्राह्मिंस विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. रेडी-टू-कूक ब्रँड असलेली ब्राह्मिंस ही कंपनी केरळमधील जुन्या आणि अनुभवी कंपन्यांपैकी एक आहे. 1987 मध्ये या कंपणीची स्थापना झाली होती. हा ब्रँड रेडी-टू-कूक पदार्थांसोबतच शाकाहारी पदार्थ, मसाले,लोणचे, गोड मिक्स, गव्हाचे पदार्थ, इतर स्वयंपाकासाठी लागणारी उत्पादने तयार करतो. तर ब्राह्मिंसची उत्पादने केवळ भारतात नाही तर, अनेक मेट्रो शहरे आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देखील उपलब्ध आहेत.