cotton rate: अवकाळी पावसामुळे कापूस या पिकाची स्थिती आधीच बिघडलेली होती. त्यात आता कापसाला भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांना चिंता वाटत आहे. दरवर्षी कापूस या पिकाला 10 ते 12 हजार प्रति क्विंटल या दराने भाव मिळत होता परंतु यावर्षी कापूस 8000 ते 8500 पर्यंत भाव मिळत आहे. कृषी तज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे की कापसाचे दर वाढण्याची शक्यता आहे.
कापसाचे भाव जसे रुई कशी कोणत्या क्वालिटीची आहे यावर अवलंबून असतो त्याचप्रमाणे सरकी सुद्धा महत्वाची असते. कापसामध्ये 35 टक्के रुई आणि बाकी सरकी असते. तर जाणून घेऊया कापसात भाव वाढ होण्याची शक्यता आहे का?
सरकीचे दर किती?
कापसातील सरकी सुद्धा महत्वाची ठरते. सध्या सरकी आणि ढेपचे भाव स्थिर आहेत. सोया ढेपचे वाढीव असल्याने सरकी ढेपला मागणी वाढत आहे. सरकी तेलाचा भाव गेल्या काही महिन्यात 2250 रुपये प्रति क्विंटल असा आहे. म्हणजेच एकंदरीत सरकी आणि सरकीपासून बनणाऱ्या प्रोडक्टसची किंमत बऱ्यापैकी आहेत म्हणजे कापसाचे दरही वाढण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांची अपेक्षा काय? (What do farmers expect?)
गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत कापसाचे दर या वर्षी घसरले आहेत. मागील वर्षी कापसाचे दर 12 ते 15 हजार रुपये प्रतिक्विंटल असे होते. त्यामुळे आता शेतकऱ्यांना 10 हजार रुपये प्रतिक्विंटल कापूस दर मिळण्याची अपेक्षा आहे. सद्यस्थितीमध्ये शेतकऱ्यांची स्थिती विस्कटली असल्याने त्यांना कापूस दर वाढीची अत्यंत वाट आहे. शेतीच्या मशागतीसाठी लागलेला खर्च अजूनही शेतकऱ्यांच्या हाती आला नसल्याने शेतकरी चिंता व्यक्त करीत आहे.