Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Akshaya Tritiya 2023: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर भारतीय टांकसाळातून सोने-चांदीची नाणी खरेदी करा

Gold & Silver Coins for Akshaya Tritiya

Akshaya Tritiya 2023: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याची खरेदी करण्याची परंपरा आहे. यामुळे अनेक ज्वेलर्स आणि सुवर्णपेढ्यांनी सोन्याच्या किमतीवर आकर्षक सूट जाहीर केली आहे. याला अनुसरूनच भारत सरकार टांकसाळच्या मुंबई शाखेने सोन्याची आणि चांदीची नाणी खरेदी करण्याची संधी ऑनलाईन आणि ऑफलाईन उपलब्ध करून दिली. टांकसाळच्या वेबसाईटवरून ऑनलाईन खरेदी कशी करायची हे आपण जाणून घेणार आहोत.

Akshaya Tritiya 2023: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर शुभसंकेत म्हणून मौल्यवान वस्तू आणि धातू खरेदी करण्याची परंपरा आहे.या परंपरेच्या निमित्ताने आणि ग्राहकांच्या मागणीनुसार भारत सरकार टांकसाळच्या मुंबई शाखेने ग्राहकांना सोन्याची आणि चांदीची नाणी खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

भारत सरकारच्या टांकसाळ मुंबई विभागाने प्रत्यक्ष सेल्स काऊंटर आणि ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून सोन्याची आणि चांदीची नाणी खरेदी करण्यासाठी उपलब्ध करून दिली आहेत. हे सोने 24 कॅरेटचे असून शुद्ध चांदीचे कॉईन्ससुद्धा विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. यामध्ये सोन्याच्या 2 ग्रॅम नाण्यापासून 10 ग्रॅमपर्यंतची नाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे शुद्ध चांदीची वेगवेगळ्या ग्रॅममधील नाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यामध्ये देवदेवतांची चित्रे असलेली नाणीसुद्धा विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मुंबईच्या टांकसाळ शाखेने खास अक्षय्य तृतीयेनिमित्त 5 ग्रॅमचे शुद्ध सोन्याचे नाणे विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहे. या नाण्याची किंमत 34,933.92 रुपये इतकी आहे.

indian coins

भारतीय टांकसाळमधून असे सोने-चांदी खरेदी करा

भारत सरकारने अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने ग्राहकांना ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने सोने-चांदीच्या नाण्याची खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली.

  • सर्वप्रथम indiagovtmint.in या वेबसाईटला भेट द्या.
  • त्यानंतर होमपेजवरील Indian Gold & Silver यावर क्लिक करा
  • इथे तुम्हाला सोने आणि चांदीच्या कॉईन्ससे वेगवेगळ्या ग्रॅममधील पर्याय दिसतील.
  • या पर्यायामधून आवडीनुसार आणि किमतीनुसार कॉईनची निवड करा.
  • जो कॉईन खरेदी करायचा आहे; त्यावर क्लिक करा.
  • नवीन पेजवर ओपन झालेल्या कॉईनचा प्रकार, त्याची शुद्धता, वजन आणि किंमत पाहा.
  • हा कॉईन जर तुम्हाला खरेदी करायचा असेल तर Add to Cart यावर क्लिक करा.
  • त्यानंतर व्यवहार पूर्ण करण्यासाठी proceed to checkout वर क्लिक करा.
  • इथे बिला संदर्भात संपूर्ण माहिती भरा आणि उपलब्ध ऑनलाईन पर्यायानुसार पेमेंट करा.

अशाच पद्धतीने भारत सरकारचा अधिकृत उपक्रम असलेल्या MMTC-PAMP India Pvt. Ltd कंपनीच्या वेबसाईटवरूनही ग्राहकांना अक्षय्य तृतीयेनिमित्त सोने-चांदी खरेदी करता येऊ शकते. या साईटवरून ग्राहक किमान 500 रुपयांपासून सोन्याची किंवा चांदीची खरेदी करू शकतात.

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर सोने खरेदी करण्याची परंपरा जपण्यासाठी या दोन पर्यायांचा ग्राहक वापर करू शकतात. इथे त्यांना किमान वजनाचे आणि किमान किमतीत सोने किंवा चांदी ऑनलाईन खरेदी करण्याची सुविधा मिळत आहे.