Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

2022 मध्ये क्रिप्टोचा भाव पुन्हा वाढणार का?

2022 मध्ये क्रिप्टोचा भाव पुन्हा वाढणार का?

2022 मध्ये क्रिप्टोकरन्सीच्या किमती नीचांकी पातळीवर गेल्याने जागतिक क्रिप्टोकरन्सी बाजार (Global Cryptocurrency Market) मोठ्या प्रमाणात क्रॅश झाला होता. त्यामुळे क्रिप्टोचा (Crypto) भाव पुन्हा वाढणार का? अशी धास्ती क्रिप्टोकरन्सी (Crypto Currency) गुंतवणूकदारांच्या मनात आहे.

क्रिप्टोचा (Crypto) भाव पुन्हा वाढेल का? आजकाल प्रत्येक क्रिप्टोकरन्सी (Crypto Currency) वापरकर्त्याच्या मनात कदाचित हा सर्वात मोठा प्रश्न आहे. 2022 मध्ये मोठमोठ्या क्रिप्टोकरन्सीच्या किमती नीचांकी पातळीवर गेल्याने मागील दोन आठवड्यात जागतिक क्रिप्टोकरन्सी बाजार (Global Cryptocurrency Market) मोठ्या प्रमाणात क्रॅश झाला होता. सध्याच्या मंदीमध्ये अग्रस्थानी असलेल्या लुना क्रिप्टोची (LUNA Crypto) किंमत अगदी शून्याइतकी झाली आहे. क्रिप्टो मार्केट इतक्या मोठ्या प्रमाणात कोसळूनही ही स्थिती आतापर्यंतची क्रिप्टो गुंतवणूकदारांसाठी सर्वात वाईट अवस्था आहे, असे म्हणता येणार नाही.

युनोकॉईनचे सह-संस्थापक आणि सीईओ सात्विक विश्वनाथ (Sathvik Vishwanath, Co-Founder and CEO, Unocoin) यांनी सांगितले की, कंपनीच्या गेल्या 9 वर्षांच्या कारकिर्दीत अनेकवेळा बेअर मार्केट (bear market) म्हणजे कोसळणारा बाजार पाहिला आहे. जेव्हा मोठ्या प्रमाणात मार्केट खाली येतं, तेव्हा 2 ते 3 वर्षात बेअर मार्केटने रिकव्हरी केली आहे आणि आताही तसेच होऊ शकते.

तसेच तेझोस इंडियाचे अध्यक्ष ओम मालवीय (Om Malviya, President of Tezos India) म्हणतात की, कोरोनाच्या काळात 2019 मध्ये क्रिप्टो मार्केटचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले नाही. जग आर्थिक मंदीतून  परत सावरताना क्रिप्टोकरन्सीच्या पुनर्प्राप्तीची अपेक्षा करू शकतो. मार्केट कोसळण्याच्या धक्क्याने बाजारात अनेक चढउतार दिसून येतात. पण ही वेळ निघून गेली की, त्यात नक्कीच बदल होईल आणि फायदा ही होईल.

दरम्यान, जागतिक क्रिप्टो मार्केटने (Global Cryptocurrency Market) मार्केट कोसळण्याचा अनुभव घेतलेला आहे. तरीही अनेक ब्ल्यूचिप क्रिप्टो (Bluechip Crypto) तेजीत आल्या आहेत. त्यांची किंमत वाढत आहे. बिटकॉईन $30,000 च्या पातळीवर परतला आहे. बीएनबी (BNB), कारडॅनो (Cardano), एक्सआरपी (XRP), सोलाना (Solana), पोल्काडॉट (Polkadot) आणि डॉजकॉईन (Dogecoin) सारख्या क्रिप्टोकरन्सीमध्ये मागील 24 तासात 9 टक्क्यांपर्यंत वाढ झाली. क्रिप्टो मार्केट 3.36 टक्क्यांनी वाढून $1.31 वर पोहोचले आहे, तर सोलाना क्रिप्टोकरन्सीची किंमत 7 टक्क्यांनी वाढली असून ती $53.6 वर गेली आहे. अवालॉण्च (अवॅक्स)ची (Avalanche (Avax)) किंमत 8.52 टक्क्यांनी वाढून ती $32.09 वर पोहोचली आहे. त्यामुळे 2022 हे वर्ष क्रिप्टोकरन्सीसाठी कसं जातंय? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. 

क्रिप्टो मार्केटमधील इनसायडर्स मार्केट रिकव्हरीबद्दल आशावादी आहेत. डो क्वॉन (Do Kwon)च्या योजनेनुसार मार्केट पुन्हा उभारू शकतं. पण त्याला तिच किंमत मिळणं कठीण आहे. तर दुसर्‍या बाजूला, काही महत्त्वाच्या क्रिप्टोकरन्सी अधिक मजबुतीने पुन्हा मार्केटमध्ये येतील. जसे की, इथरियम ही आता महत्त्वाच्या पुढील टप्प्यावर काम करत आहे. सध्याचा हा काळ कदाचित लवकरच संपणार नाही, पण तो पुन्हा परत येईल, असा विश्वास मुफिनपे (MuffinPay) कंपनीचे संस्थापक आणि सीईओ (CEO) दिलीप सेनबर्ग यांना आहे.