Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

क्रिप्टो ट्रेडिंगमध्ये नवीन आहात? जाणून घ्या 2022 च्या क्रिप्टो ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज

क्रिप्टो ट्रेडिंगमध्ये नवीन आहात? जाणून घ्या 2022 च्या क्रिप्टो ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज

Image Source : www.twitter.com

क्रिप्टोकरन्सीमध्ये नव्याने गुंतवणूक (Crypto Currency Trading) करणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी काही गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे.

क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंग (Crypto Currency Trading) सध्या तेजीत आहे. अनेक गुंतवणूकदार या डिजिटल चलनामध्ये गुंतवणूक करण्यासाठी पुढे येत आहेत. पण क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंगमध्ये नव्याने येणाऱ्या गुंतवणूकदारांनी काही गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे. अशा नवशिक्या गुंतवणूकदारांसाठी आम्ही 10 मार्गदर्शनपर सूचना घेऊन आलो आहेत. ज्या तुम्हाला ट्रेडिंग करण्यापूर्वी माहित असणे आवश्यक आहे.

उद्देश स्पष्ट असणे

क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंगमध्ये प्रवेश करण्याचा तुमचा हेतू स्पष्ट असणे गरजेचे आहे. शेअर मार्केटमधील डे ट्रेडिंग असो किंवा स्कॅल्प, या अशा गोष्टींकडे वळण्याचा एक हेतू असतो आणि तो असायलाच हवा. अन्यथा तुम्ही अशा गोष्टींमध्ये पडू नका. क्रिप्टोकरन्सीमध्ये नफा – तोटा दोन्ही होऊ शकते. क्रिप्टोकरन्सीच्या मार्केटमध्ये खूप अस्थिरता (Volatility) असते. तुमची एक साधीशी चूकही तुमचे मोठे नुकसान करू शकते. त्यामुळे संपूर्ण माहिती घेऊनच क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारात उतरा.

नफा आणि तोट्यावर नियंत्रण ठेवा

बिटकॉईनचा नफा असो की तोटा असो, यातून बाहेर कधी पडायचे हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. तसेच यात ट्रेडिंग करताना स्टॉप लॉस लेव्हल (Stop Loss Level) सेट करणे खूप महत्वाचे आहे; यामुळे तुमचे नुकसान कमी होण्यास मदत होऊ शकते. नफ्यासाठी सुद्धा हाच नियम वापरा. जास्तीचा नफा कमावण्याच्या नादात नुकसान होऊ शकते. त्यामुळे नफ्यासाठी देखील एक स्तर सेट करा.

फोमोदरम्यान (Fear of Missing Out) सतर्क रहा

एकूणच शेअर मार्केट आणि ट्रेडिंगमध्ये गमावण्याची भीती, अयशस्वी होण्याचे कॉमन कारण मानले जाते. बरेच जण प्रत्यक्ष मार्केटमध्ये न उतरता बाहेरून हा खेळ पाहतात आणि त्यावर अंदाज मांडतात. पण ट्रेडिंगमध्ये  याच्या अगदी उलट होत असतं. बाहेरून दिसणारं क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंगचे चित्र वास्तववादी नसतं. जो त्यात प्रत्यक्ष उतरलेला असतो, त्यालाच त्याचा अंदाज असतो. त्यामुळे यात उतरताना गमावण्याची विनाकारण भीती बाळगू नका. ती इतरांसाठी कमावण्याची संधी ठरू शकते. अशावेळी सतर्क राहून अधिकाधिक टेक्निकल माहिती करून घेणे महत्त्वाचे आहे.

सतत अलर्ट राहा

क्रिप्टो एक्सचेंज 24 तास सतत 7 दिवस काम करतात. अशावेळी गुंतवणूकदाराला अलर्ट राहणे महत्त्वाचे आहे. त्याला आपल्या पोर्टफोलिओमध्ये हवे तेव्हा बदल करता येतात. तसेच तो कधीही खरेदी किंवा विक्री करू शकतो.

जोखमीवर लक्ष ठेवा

सतत मोठा नफा कमावण्याच्या मागे न धावता स्मार्ट बना. ट्रेडिंगमधील छोटे-छोटे नफा गोळा करा. त्याची स्वत:ला सवय लावून घ्या. एकाचवेळी जास्तीचा पैसा ट्रेडिंगमध्ये लावण्याऐवजी थोड्याथोड्या पैशांनी नियमितपणे ट्रेडिंग करा.

जोखीम व्यवस्थापन (Risk Management)

क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये बहुतेक ऑल्टकॉईन्सच्या (altcoins) किमती बिटकॉईनच्या (Bitcoin) सध्याच्या बाजारभावावर अवलंबून असतात. बिटकॉईन हे अत्यंत अस्थिर असून ते फिएट क्रिप्टोकरन्सीशी (fiat cryptocurrency) संबंधित आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे. तसेच जेव्हा बिटकॉईनची किंमत वाढते तेव्हा ऑल्टकॉईन घसरतात, आणि तसेच उलटे होते. यामुळे बहुतेक क्रिप्टोकरन्सी व्यापारी गोंधळात टाकू शकतात. म्हणून अशा जवळचे लक्ष्य ठेवणे किंवा ट्रेडिंग न करणे फायद्याचे ठरू शकते.

तंत्रज्ञान समजून घ्या

क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंग हा पूर्णत: डिजिटल व्यवहार आहे. अशावेळी तुम्हाला ट्रेडिंगसाठी वापल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाची प्राथमिक माहिती असणे आवश्यक आहे. अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते किंवा तुमचे खाते हॅक करून तुमचे पैसे चोरले जाऊ शकतात.

मार्केटमधला ट्रेंड फॉलो करा

बऱ्याचवेळा नव्याने क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंगमध्ये आलेले नवशिके समान चूक करतात. ती म्हणजे जेव्हा बाजारात करन्सीची किंमत कमी असते तेव्हा ते खरेदी करतात. अशावेळी तुम्हाला ते परवडते म्हणून खरेदी करण्यापेक्षा मार्केट कॅपच्या निर्णयावर खरेदी करण्याचा निर्णय घेणे उचित असते. करन्सीचे मार्केट कॅप जितके जास्त असेल तितके ते ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीसाठी चांगले असते.

गुंतवणुकीचा काळ समजून घ्या

बहुतेक ऑल्टकॉईन्स (Altcoins) ठराविक काळानंतर किंमत खाली येते, हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण तुम्ही ऑल्टकॉईन जेव्हा दीर्घकाळासाठी घेऊन ठेवता तेव्हा तो किती ठेवायचा याचा वेळोवेळी अंदाज आणि आढावा घेणं आवश्यक आहे. कारण ठराविक काळानंतर त्याची किंमत खाली येते. त्यावेळे तुमचे जास्तीचे नुकसान होऊ शकते. ते टाळण्यासाठी करन्सीचे चार्ट नियमितपणे पाहण्याची सवय ठेवा. त्यांच्या वाढणाऱ्या किमतींच्या नोंदी ठेवा.

वैविध्यपूर्ण गुंतवणूक महत्त्वाची

क्रिप्टोकरन्सीचा तुम्ही अंदाज नाही लावू शकत. ते प्रचंड अस्थिर आहे. अशावेळी त क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये टिकून राहण्यासाठी वैविध्यपूर्ण गुंतवणूक हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. यामुळे तुमचे नुकसान विभागून तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसणार नाही.