तंत्रज्ञाना मानवाच्या नोकऱ्या हिसकावून घेईल का? असा प्रश्न मागील काही वर्षांपासून विचारला जात आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये नवतंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. त्यामुळे मशिन माणसाची जागा घेईल का? हा प्रश्न पडणं सहाजिक आहे. जेव्हा एटीएम मशिन आलं तेव्हा, बँकेमधील कर्मचाऱ्यांची भरती कमी झाली. कॉलसेंटरवरील मशिन व्हाईसच्या वापरामुळे तिथंही कमी कर्मचाऱ्यांची गरज पडते. मग भविष्यात अशा सर्वच क्षेत्रातील नोकऱ्यांवर गदा येऊ शकते का, तर नक्कीच तंत्रज्ञान हे दिवसेंदिवस विकसित होतच जाणार आहे. काही काही प्रमाणात नोकऱ्या कमी होतील, मात्र, मनुष्यास पूर्णपणे मशिन कधीही पर्याय ठरू शकत नाही.
ओपन AI ही कंपनी कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात काम करते. या कंपनीने chat GPT हा कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असा चॅटबॉट तयार केला आहे, जो विविध क्षेत्रांमधील नोकऱ्या खाऊन टाकील, असे बोलले जात आहे. यावर बरीच चर्चा सुरू आहे. जर तुम्हाला मॅनेजरला मेल लिहायचांय तर चॅटजीपीटी तुम्हाला मदत करेल. एखाद्या विषयावर हजार शब्दांचा लेख लिहायला, शॉपिंग करायला, प्रश्नांची उत्तर देण्यास सॉफ्टवेअर कोड लिहण्यास मदत करेल. चॅटजीपीटी हा कृत्रिम बॉट तयार करण्यासाठी खूप सारी माहिती अल्गोरिदममध्ये फिट केली आहे. त्या माहितीच्या आधारे उत्तर देण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, ही माहिती मशिनला व्यक्तीकडूनच दिली जाते. त्यामुळे पुन्हा माणसांच्याच नोकऱ्या वाढणार.
AI क्षेत्रात कोणत्या नोकर्या वाढू शकतात? (What kind of jobs are in AI domain)
कच्चा डेटावर प्रक्रिया करून त्याचे सुटसुटीत आणि योग्य माहितीमध्ये रूपांतर करण्यासाठी डेटा लेबलिंग, प्रोसेसिंग, इमेज कलेक्शन, डेटा रेकॉर्डिंग, डेटा विश्लेषण अशा अनेक कामांसाठी कर्मचाऱ्यांची गरज पडत आहे. तसेच संपूर्ण काम मशिन किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेवर सोडून आपण मोकळे होऊ शकत नाही. मशिनने केलेले काम हाताळण्यासाठी माणसांची गरज कायमच पडणार आहे. त्यामुळे कौशल्याधारित कामगारांना कायमच डिमांड राहणार आहे.
कसं ठेवाल स्वत:ला अपडेट? (How keep yourself Update)
वाहतूक, पर्यटन, बँकिंग, शिक्षण, उद्योग, व्यापार यासारखी अर्थव्यवस्थेची अनेक क्षेत्रे आहेत. या प्रत्येक क्षेत्रात भविष्यात तंत्रज्ञानाचा वापर वाढण्याची शक्यता आहे. हे ओळखून प्रत्येक क्षेत्रामध्ये काय बदल होऊ शकतात याचा आधी अभ्यास करायला हवा. त्यानुसार टेक्निकल कौशल्ये शिकून घ्यायला हवी. यासाठी पूर्ण तज्ज्ञ होण्याची तुम्हाला गरज नाही. तुम्ही विशिष्ट एखादे तांत्रिक कौशल्य शिकू शकता. ज्यामुळे तुम्हाला जॉब मार्केटमध्ये कायमच डिमांड राहील. फक्त काम चांगले करता येते यावर भागणार नाही. तांत्रिक कामाबाबतची कौशल्येही तुम्हाला आत्मसात करावी लागतील.
कोणत्या क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढू शकतो (Where will AI industry Grow)
रिटेल, बँकिंग आणि फायनान्स, कार निर्मिती, हेल्थकेअर, कन्झ्युमर इंडस्ट्री या क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राचा 60% होऊ शकतो, असे नॅसकॉम या संस्थेने २०२२ साली सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे या क्षेत्रांमधील तांत्रिक कौशल्ये आत्मसात केली तर जॉबच्या अनेक संधी निर्माण होऊ शकतात.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            