Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

गुंतवणुकीत Nominee देणे का महत्त्वाचे आहे; यासाठी कोणाची निवड करावी?

Investment Nominee

तुम्ही बँकेमध्ये किंवा कोणत्याही संस्थेत ज्यावेळी गुंतवणूक करता, त्यावेळी तुम्हाला एक फॉर्म भरण्यासाठी दिला जातो. या फॉर्ममध्ये संपूर्ण माहिती भरल्यानंतर नॉमिनीचे (Nominee) नाव द्यावे लागते. हा नॉमिनी गुंतवणूक करताना का महत्त्वाचा आहे आणि यासाठी कोणाची निवड करावी, याबाबत आपण अधिक जाणून घेऊ.

आपण विविध कारणांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतो. ही गुंतवणूक करण्यापाठीमागे अनेक विचार असतात. आपली आर्थिक बाजू भक्कम असावी, व्यवसायासाठी चार पैसे जवळ असावेत किंवा निवृत्तीनंतरचे आयुष्य निवांतपणे जगता यावे यासाठी गुंतवणूक करतो. ही गुंतवणूक करत असताना बँक किंवा संस्थांकडून फॉर्म भरून घेण्यात येतात. याच फॉर्मवर 'नॉमिनी' (Nominee) नावाचा कॉलम आपल्याला पाहायला मिळतो. कोणतीही गुंतवणूक करताना नॉमिनी भरणे किंवा त्याची नोंद करणे  गरजेचे का असते? आणि त्यासाठी कोणाची निवड करावी, हे आपण पाहणार आहोत.

गुंतवणुकीत नॉमिनी का असावा?

गुंतवणूकदाराने केलेल्या गुंतवणुकीला नॉमिनीचे नाव देणे गरजेचे आहे. तसे सेबीने अधिकृतरीत्या निर्देशही दिले आहेत. नॉमिनीला सोप्या मराठी भाषेत 'वारस' असे म्हटले जाते. वारस म्हणजे अशी व्यक्ती जी तुमची संपत्ती तुमच्या पश्चात सांभाळू शकेल आणि वाढवू शकेल. याच कारणास्तव आपण केलेल्या गुंतवणुकीला नॉमिनी असणे गरजेचे आहे. हा नॉमिनी कोणीही असू शकतो. ज्यावेळी तुम्ही हयात नसाल, त्यावेळी याच नॉमिनीला तुमच्या गुंतवणुकीचे किंवा मालमत्तेचे अधिकार दिले जातात.

नॉमिनी म्हणून कोणाची निवड ठरेल योग्य

पालक (Parents)

तुम्ही केलेल्या गुंतवणुकीसाठी तुम्ही नॉमिनी (Nominee)  म्हणून तुमच्या पालकांची निवड करू शकता. आई-वडील आपल्या मुलांसाठी आयुष्यभर कष्ट करतात. त्यामुळे तुम्ही त्यांची निवड केली तर आकस्मित कोणतीही घटना घडल्यावर तुमच्या पश्चात ही गुंतवणूक किंवा मालमत्ता त्यांना मिळेल. या गुंतवणुकीमुळे त्यांचे पुढील आयुष्य सुखात आणि आरामात जाऊ शकते.

जोडीदार (Life Partner)

आई-वडिलांबरोबरच तुम्ही तुमच्या जोडीदारालाही नॉमिनी (Nominee) म्हणून ठेवू शकता. बऱ्याच वेळा आई वडील हयात नसतात. अशावेळी जोडीदार हा पर्याय सर्वोत्तम ठरतो. नवरा-बायको एकमेकांना यासाठी नॉमिनेट करू शकतात. बऱ्याच कुटुंबात आजही मुख्य व्यक्तीवर दुसरी व्यक्ती/जोडीदार अवलंबून असतो. त्यामुळे तुमच्या पश्चात या गुंतवणुकीतील किंवा मालमत्तेतील लाभामुळे पुढील आयुष्य चांगले जगू शकतात.  

मुले (Child)

आई-वडील, जोडीदार यानंतर तुमच्या पाल्याची निवड तुम्ही नॉमिनी (Nominee) म्हणून करू शकता. पालक आपल्या मुलांचे आयुष्य सुखात जावे, या विचाराने संपूर्ण आयुष्य कष्टात करतात आणि त्यांच्याच नावाने गुंतवणूक करतात. आता केलेली गुंतवणूक ही तुमच्या पश्चात मुलांना योग्य वेळी कामी येईल. या गुंतवणुकीतून मुलांना स्वतःचा शैक्षणिक खर्च किंवा इतर महत्त्वाची कामे पूर्ण करता येतील. शिवाय त्यांना आर्थिक मदत होईल.