Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Farmers ITR Filing : शेतकऱ्यांनी का भरावा आयटीआर? जाणून घ्या, शेतकऱ्यांनी आयटीआर फाईल करण्याचे फायदे

Farmers ITR Filing

Farmers ITR Filing : शेतकऱ्यांना ITR फाइल करणे अनिवार्य नाही. पण, ITR फाइल केल्यास अनेक फायदे मिळू शकतात. आपण सर्वांना माहिती आहे की, कलम 10(1) नुसार, भारतातील करदात्याने मिळवलेले कृषी उत्पन्न करमुक्त आहे. म्हणजेच शेतकऱ्याला शेतीमधील उत्पन्नावर कोणत्याही प्रकारचा टॅक्स भरावा लागत नाही. तरीही शेतकऱ्यांनी ITR का फाइल करावा? जाणून घेऊया

Farmers ITR Filing : आर्थिक वर्ष 2021-22 किंवा मूल्यांकन वर्ष 2022-23 साठी ITR भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. देशात प्रत्येक आर्थिक वर्षात एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न मिळवणाऱ्यांना इन्कम टॅक्स Prospectus भरावे लागते. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने रिटर्न भरण्यासाठी ITR फॉर्म तयार केले आहेत. 'महामनी'ने अनेकांशी चर्चा केली असता लक्षात आले की, ITR बद्दल अनेक लोकांमध्ये गैरसमज आहेत. अनेकांचा समज असा आहे की ITR म्हणजे आपल्याला टॅक्स भरावा लागणार किंवा मग आपल्या उत्पन्नातून काही पैसे द्यावे लागणार. पण तसे नाही तर इन्कम टॅक्स रिटर्न भरता तेव्हा तुम्ही सरकारला कुठलाही टॅक्स  देत नाही तर उत्पन्नाचा एक ठोस पुरावा सादर करता.

शेतकऱ्यांना ITR फाइल करणे अनिवार्य नाही. पण, ITR फाइल केल्यास अनेक फायदे मिळू शकतात. आपण सर्वांना माहिती आहे की, कलम 10(1) नुसार, भारतातील करदात्याने मिळवलेले कृषी उत्पन्न करमुक्त आहे. म्हणजेच शेतकऱ्याला शेतीमधील उत्पन्नावर कोणत्याही प्रकारचा टॅक्स भरावा लागत नाही. ज्या  शेतकऱ्यांकडे शेतीशिवाय दुसऱ्या मार्गाने उत्पन्न येत असेल आणि ते 2.50 लाखांच्यावर असेल तर त्याला टॅक्स भरावा लागतो.

शेती उत्पन्नावर टॅक्स नाही पण…

internal-2.jpg
शेतातील संत्रा विकून मिळालेल्या उत्पन्नावर टॅक्स लागत नाही, पण संत्राचा ज्यूस करून विकल्यास त्यावर टॅक्स द्यावा लागतो. 

भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशातील कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर टॅक्स लावला जात नाही. मात्र, कोणत्याही कृषी उत्पादनापासून प्रक्रिया केलेले प्रॉडक्ट तयार केले जात असेल तर त्यापासून मिळणारे उत्पन्न हे कृषी उत्पन्न मानले जात नाही. उदाहरणार्थ, एखाद्या ऊस उत्पादक शेतकऱ्याने आपला ऊस थेट बाजारात विकला आणि रक्कम हाती घेतली तर ते कृषी उत्पन्न असेल. पण उसापासून गूळ किंवा साखर करून विकली तर तो व्यवसाय होईल शेती उत्पन्न राहणार नाही.

अमरावती जिल्ह्यातील शेघाट येथील प्रगतशील शेतकरी उद्धव फुटाणे यांच्याशी चर्चा केली असता ते सांगतात की, आम्ही दरवर्षी ITR फाइल करतो. कारण आमचा शेतीपुरक व्यवसाय म्हणून माऊली प्लॅस्टिक प्रायवेट लिमिटेड नावाची कंपनी आहे. त्यात क्रेट निर्मिती केली जाते. तेथील उलाढाल वर्षाला 6 ते 7 कोटींच्यावर होते. त्यामुळे ते आमचे करपात्र उत्पन्न आहे. पण, ITR फाइल करत असतांना एकूण उत्पन्न त्यात आम्ही दाखवतो. कारण त्यामुळे अनेक फायदे होतात.

भारतात 70% लोकं शेती करतात, त्यांच्या आधारावर प्रत्येकाला दोन घास सुखाचे मिळतात. पण शेतकऱ्याचे उत्पन्न हे पूर्णतः निसर्गावर अवलंबून असते. निसर्गाने साथ दिली तर शेतकरी मालमाल सुद्धा होतो आणि निसर्गाची अवकृपा झाली तर कंगाल सुद्धा होतो. जेव्हा शेतकऱ्याची परिस्थिती डबघाईला येते तेव्हा त्याला लोन घेण्याची गरज पडते. मग तेव्हा जर तुम्ही ITR फाइल केला असला तर तुम्हाला बँक सहज लोन देते. या व्यतिरिक्त सुद्धा अनेक फायदे आहेत. ज्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ITR फाइल करायला पाहिजे. 

शेतकऱ्यांनी ITR फाइल का करावा? कोणते लाभ मिळतात?

गैरसमज दूर करून शेतकऱ्यांनी जर ITR फाइल केला तर अनेक लाभ मिळू शकतात. शेतकऱ्यांना कर्ज घेण्याची गरज ही नेहमी भासते त्यासाठी ITR फाइल करणे अत्यंत महत्वाचे आहे. जाणून घेऊया, आणखी कोणकोणते लाभ मिळतात? 

itr-file.jpg

शेतीसाठी सहज कर्ज मिळते

बँकेकडून कर्ज घेण्यासाठी ITR हा उत्पन्नाचा ठोस पुरावा आहे. कर्जासाठी बँक तुमच्याकडे 2 ते 3 वर्षांचे ITR मागते. ITR भरला असेल तर तुम्हाला सहज कर्ज मिळू शकते.

शेतीला जोडून व्यवसाय उभारणीसाठी लाभदायक ठरते

व्यवसाय सुरू करण्यासाठी ITR खूप महत्वाचे आहे. याशिवाय जर तुम्हाला कोणत्या विभागाकडून कंत्राट मिळवायचं असेल तर तेव्हाही ITR दाखवावे लागते. कंत्राट मिळवण्यासाठी मागील 5 वर्षांचे आयकर रिटर्न द्यावे लागते.

Residence proof म्हणून वापर करू शकता 

ITR ची काॅपी हा तुमच्या वास्तव्याचा ठोस पुरावा आहे. याचा वापर तुम्ही सरकारी कामात सुद्धा करू शकता. तुम्हाला पासपोर्ट बनवायचा असेल तुम्ही  म्हणून ITR काॅपी देऊ शकता. 

बँकेकडून क्रेडिट कार्ड मिळण्यास मदत होते 

ITR मुळे क्रेडिट कार्डही सहजपणे मिळू शकेल. क्रेडिट कार्ड देणाऱ्या बँकांना आयकर रिटर्नमुळे ग्राहकांच्या कर्ज घेण्याच्या आणि फेडण्याच्या क्षमतेचा अंदाज येतो.

विमा संरक्षण घेण्यासाठी मदत होते 

तुम्हाला 1 कोटी रुपयांचा टर्म प्लान घ्यायचा असेल तर विमा कंपनी तुमच्याकडे ITR मागू शकते. तुमच्या उत्पन्नाचा स्रोत माहिती करून घेण्यासाठी आणि नियमीत उत्पन्नाची खात्री होण्यासाठी विमा कंपनी ITR वरच विश्वास ठेवतात.

कृषी प्रदर्शनीसाठी विदेशात जावे लागल्यास व्हिजा मिळणे सोपे जाते 

जर तुम्हाला शेतीच्या नवनवीन तंत्रासाठी किंवा प्रदर्शनीसाठी परदेशात जायचं असेल तर तुमच्यासाठी ITR महत्त्वाचे आहे. बहुतांशी Foreign Embassy Visa अर्जात मागील 2 वर्षांचे ITR मागतात. जर तुमच्याकडे ITR असेल तर इतर लोकांच्या तुलनेत तुम्हाला व्हिजा मिळणे सोपे होते.

पात्र असलेल्या सरकारी योजनेचा लाभ लवकर मिळतो

सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. त्यातील काही योजनांचा लाभ हा उत्पन्नावर अवलंबून असतो. तुम्ही जर दरवर्षी ITR फाइल करत असाल तर तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीचे पुरावे सादर करण्याची गरज भासणार नाही. सहज कोणत्याही योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता.