मुंबईत स्वतःची एखादी जरी खोली असती तर आज मालामाल झालो असतो, अशा प्रकारची वाक्ये तुम्ही कधीतरी ऐकली असाल. मुंबईत जागेची मागणी किती आहे हे यासारख्या वाक्यातून लक्षात येते. Real estate investment साठी मुंबई का आकर्षक ठरत आहे, याबाबत अशा काही कारणाचा आपण विचार करूया.
भविष्यात चांगले उत्पन्न मिळेल (Return on investment in Mumbai )
मुंबई हे राज्यातील किंवा देशातीलचं नव्हे तर जगातील एक महत्वाचे शहर आहे. मुंबईच्या भौगोलिक सीमांचा विस्तार होतो आहे. या शहरातील जागंच्या किमती वाढताना दिसत आहेत. यामुळे भविष्यात चांगले उत्पन्न मिळेल, या दृष्टीने मुंबईत गुंतवणूकदारांचा कल असतो. सी-फेसिंग विदेशी अपार्टमेंट्सपासून ते डुप्लेक्स हाऊसेस ते बजेट अपार्टमेंट्सपर्यंत विविध पर्याय उपलब्ध आहेत. यामुळे आपल्या क्षमतेप्रमाणे मुंबई किंवा मुंबईनजीकच्या परिसरात खरेदी करता येते. मुंबईपासून लोकल ट्रेन मार्गावर जसजसे दूर जाऊ तशा घरांच्या किमती कमी होताना दिसतात.
प्रकल्प आणि सार्वजनिक वाहनांची उपलब्धता
मुंबई आणि नाजिकच्या परिसरात अनेक मोठे प्रकल्प आहेत. काही प्रकल्प प्रस्तावित आहेत. यामुळे नाजिकच्या भविष्यात जागाच्या किंमती वाढण्याच्या शक्यता आहेत. मुंबईत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा खूप विस्तार झाला आहे. अंतर आणि गर्दी कमी करण्यासाठी नवनवे प्रकल्प येत आहेत. मुंबई लोकल ट्रेनमुळे सेंट्रल लाईनवरील कर्जत-खोपोली, पश्चिम रेल्वेवरील विरारपर्यंत प्रवास करण्यासाठी रोज लोकल ट्रेन उपलब्ध होत असतात. यामुळे भविष्यातील गरजेच्या दृष्टीनेही अनेक जण मुंबईत जागा घेऊन ठेवण्याचा विचार करत असतात. मेट्रो प्रकल्पाच्या माध्यमातून दोन लाइन जोडणे आणि प्रवासाचा वेळ कमी होणे हेदेखील साध्य होत आहे.
मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध
मुंबईत मोठ्या प्रमाणणात रोजगार उपलबद्ध होत असतो. अनेक मोठ्या कंपन्या इथे आहेत. त्यांची संख्याही जास्त आहे. नवनवे स्टार्ट अप सुरू होत आहेत. यामुळे रोज मुंबईत स्थलांतर करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अनेक जण नोकरी-धंद्यात स्थिरस्थावर झाल्यावर स्वत:चे घर घेण्याचा विचार करतात. यामुळे भविष्यात मुंबईतील जागेला चांगली मागणी राहील असा विचार करताना गुंतवणूकदार दिसतात. यामुळे मुंबईत रिअल इस्टेटमध्ये केलेल्या गुंतवणूकीला चांगला परतावा मिळेल (ROI) असा विचार गुंतवणूकीच्या दृष्टीनेही केला जातो.
अशा काही कारणामुळे मुंबई आकर्षक ठरत आहे. मात्र असे असले तरी याविषयीचा निर्णय काळजीपूर्वक घेणे आवश्यक आहे. Real estate investment च्या दृष्टीने मुंबई आकर्षक ठरण्याची ही कारणे सर्वसामान्य आहेत. प्रत्यक्ष जागा घेताना नेमके लोकेशन, भविष्यातील वाढ अशा अनेक बाबींचा सारासार विचार करणे आवश्यक आहे.