भारतात सोन्याच्या खाणी नसल्यामुळे जवळपास सर्व सोनं आयात केलं जातं. हे सोनं रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (Reserve Bank of India), स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank), एचडीएफसी बँक (HDFC Bank), येस बँक (YES Bank), युनियन बँक (Union Bank) इत्यादी मोठ्या बँकांद्वारे आयात केलं जातं. याशिवाय मेटल अँड मिनिरल ट्रेडिंग कॉर्पोरेशन (एमएमटीसी), स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन (एसटीसी) यांना सोन्याची आयात करण्याची परवानगी आहे. या संस्थांकडून आंतरराष्ट्रीय किमतींवर सोन्याची आयात केली जाते.
आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याच्या दरामध्ये चढ-उतारपणा दिसून आला की, भारतातील सोन्याचे दर ही बदलतात. भारतात सोन्याची कोणतीही मानक किंमत नाही. भारतातील जवळपास प्रत्येक शहरात किंवा राज्यात सोन्याची किंमत वेगवेगळी असते. स्थानिक शुल्क आणि करामुळे प्रत्येक राज्यातील आणि शहरातील सोन्याच्या किमतीत फरक असतो. तसेच प्रत्येक शहरासाठी 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्यासाठी वेगवेगळी किंमत आकारली जाते. या व्यतिरिक्त, स्थानिक सराफा संघटना देखील किंमत निश्चित करतात. यामुळे, शहरांनुसार सोन्याची किमती बदलतात. दररोज दोनदा सोन्याच्या किंमतीमध्ये सुधारणा केली जाते.
भारतातील काही शहरांतील 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमचे दर*
चेन्नई गोल्ड रेट - ₹ 51,970
अहमदाबाद गोल्ड रेट – ₹ 50,840
मुंबई गोल्ड रेट – ₹ 50,780
दिल्ली गोल्ड रेट – ₹ 50,780
कोलकता गोल्ड रेट – ₹ 50,780
केरळ गोल्ड रेट – ₹ 50,780
बेंगळुरू गोल्ड रेट – ₹ 50,780
हैदराबाद गोल्ड रेट – ₹ 50,780
(*हे दर 17 मे 2022 रोजीचे आहेत)
वर देण्यात आलेल्या दरांमध्ये गुड्स अॅड सर्व्हिस टॅक्स (GST), टॅक्स कॅलेक्टड अॅट सोर्स (TCS) यांसारख्या दरांचा समावेश नाही. सोन्याचा मूळ दर वेगवेगळा असतो. त्यात उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्क लागत असल्यामुळे दरांमध्ये तफावत आढळते. विविध राज्यांमध्ये उत्पादन शुल्क वेगवेगळे असल्याने राज्यनिहाय सोने, चांदी दरात फरक असू शकतो. त्यात सोन्याचे दागिने खरेदी करत असाल तर त्यावर घडणावळ म्हणजे मेकींग चार्जेसही द्यावे लागतात. त्यामुळे अचूक दरांसाठी नजीकच्या किंवा विश्वासातल्या सोन्याच्या पेढीशी संपर्क साधू शकता.
IMAGE SOURCE P- https://bit.ly/3lkWoJ3