Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Rahul Gandhi on Adani: अदानींच्या बनावट कंपन्यांमध्ये 20 हजार कोटींची गुंतवणूक कुणाची? राहुल गांधींचा सवाल

Gautam Adani

Gautam Adani: गौतम अदानी यांच्या देशभरात आणि विदेशातही अनेक शेल कंपन्या (बनावट) असून त्यात 20 हजार कोटी रुपये कोणी गुंतवले आहेत असा थेट सवाल राहुल गांधींनी केला आहे. हा अदानींचा पैसा नाही, असेही राहुल गांधी म्हणाले आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यावर त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यात काय साटेलोटे आहे हे नागरिकांना कळायला हवे असे ते म्हणाले होते.

गौतम अदानी यांच्या बनावट कंपन्यांमध्ये 20 हजार कोटी रूपये कुणी गुंतवले आहेत? गौतम अदानी आणि नरेंद्र मोदींचा संबंध काय? असे प्रश्न विचारले. माझी खासदारकी गेली तरी मला पर्वा नाही, मी असे प्रश्न  विचारतच राहील असेही ते म्हणाले.

गौतम अदानी यांच्या अनेक बनावट कंपन्या

गौतम अदानी यांच्या देशभरात आणि विदेशातही अनेक शेल कंपन्या (बनावट) असून त्यात 20 हजार कोटी रुपये कोणी गुंतवले आहेत असा थेट सवाल राहुल गांधींनी केला आहे. हा अदानींचा पैसा नाही, असेही राहुल गांधी म्हणाले. अदानी ग्रुपचा पायाभूत सुविधा पुरविण्याचा व्यवसाय आहे, मग इतके पैसे आले कुठून असा सवाल त्यांनी विचारला आहे. सदर प्रश्न लोकसभेत विचारल्यावर राहुल गांधी यांचे भाषण पटलावरून काढूल टाकण्यात आले होते. 

शेल कंपन्या या अनेकदा गैर प्रकारचे आर्थिक व्यवहार करण्यासाठी केला जातो. कुणा त्रयस्थ व्यक्तीच्या नवे कंपनी उघडून त्यात आर्थिक व्यवहार केले जातात. कर बचत, काळे धन आदी विषयासंबंधी व्यवहार यात केले जातात.

गौतम अदानी यांच्याकडे  संरक्षण खात्याशी संबंधित कंत्राटे आहेत, ज्यात एक चीनी व्यावसायिक अदानी यांच्या प्रकल्पात  सहभागी आहे असा आरोप देखील राहुल गांधींनी केला.देशातील अनेक महत्वाची विमानतळे चालविण्याचे कंत्राट देखील गौतम अदानी यांना मिळाले आहे, त्यांच्याकडे इतका पैसा येतो कुठून हा प्रश्न विचारला तर बिघडले कुठे असे राहुल गांधी म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांचे संबंध लवकरच जगजाहीर होतील असेही ते म्हणाले. जोपर्यंत सत्य लोकांसमोर येत नाही तोवर विरोधी पक्ष असे प्रश्न विचारातच राहणार असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.

 गौतम अदानी यांच्याविरुद्ध बोलेल ही भाजपला भीती

माझे पुढील भाषण गौतम मोदी यांच्या विरोधात असेल हे भाजपाला माहिती होते. तशी भीती नरेंद्र मोदींच्या डोळ्यात स्पष्टपणे दिसत होती, असे सांगत राहुल यांनी म्हणाले की , मी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात काहीही बोलत नाहीये. माझा आक्षेप गौतम अदानींवर आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गौतम अदानी हे एक भ्रष्ट व्यक्ती आहे हे आधीच सिद्ध झाले आहे. आता प्रश्न हा आहे की या भ्रष्ट व्यक्तीला सरकार वाचविण्याचा प्रयत्न का करत आहे? काही लोक तर असे म्हणत आहेत की गौतम अदानी यांच्या विरोधात बोलणे म्हणजे देशविरोधात बोलणे आहे. जे लोक गौतम अदानी यांना देश समजत असतील तर काय समजावे? असा प्रश्न राहुल गांधींनी विचारला आहे.

पुराव्यांशिवाय आरोप केलेले नाहीत

मी आजवर गौतम अदानी यांच्यावर केलेले आरोप पुराव्यांशिवाय केलेले नाहीत, असे राहुल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मी संसदेत याविषयी पुरावे दिले आहेत, अदानी आणि मोदींच्या संबंधाबाबत विस्तृतपणे बोललो आहे असा पुनरुच्चार त्यांनी केला.नरेंद्र मोदी जेव्हापासून गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हापासून ते गौतम अदानी यांच्यासोबत काम करतायेत असेही राहुल म्हणाले.

एका खाजगी विमानात नरेंद्र मोदी अदानींसोबत बसलेले आहेत असे छायाचित्रे मी संसदेत दाखवली होती. ऑस्ट्रेलियात नरेंद्र मोदी, उद्योगपती गौतम अदानी आणि एसबीआय बँकेच्या संचालकांची बैठक झाली होती, त्यांनतर एसबीआयमधून अदानी यांना पैसे दिले गेले. याविषयी देखील मी संसदेत प्रश्न विचारला होता. माझे सगळे प्रश्न  संसदेच्या कामकाजातून काढून टाकण्यात आले आहेत.तसेच एअरपोर्ट कामकाजाचे  नियम बदलून मोठमोठ्या कामांचे टेंडर अदानींना देण्यात आले आहे, त्याचे देखील मी स्पष्टीकरण विचारले होते ,नियमांची कॉपी दाखवली होती. यावर देखील कुठलीही कारवाई झाली नाही.

हिंडेनबर्ग अहवालानंतर गौतम अदानी संकटात

अदानी समूहाला हिंडनबर्ग अहवालाचा फटका बसल्याने गौतम अदानी जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात श्रीमंत अब्जाधीशांच्या स्थानावरून 23 व्या स्थानावर घसरले आहेत. शॉर्ट सेलर हिंडेनबर्गच्या अहवालानंतर जानेवारीमध्ये अदानीच्या संपत्तीत 60 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे.