Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Shark Tank India 2 Judges: पहा, कोण असणार आहेत, ‘शार्क टॅंक इंडिया’ शो चे परिक्षक?

Shark Tank India 2 Judges

Image Source : http://www.entrepreneur.com/

Shark Tank India 2 Judges : भारतातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा 'शार्क टॅंक इंडिया' शो ची सर्वांना उत्सुकता लागली आहे. हा शो कधी सूरू होणार, या शो मध्ये सहभागी होण्यासाठी कसे रजिस्ट्रेशन करायचे या सर्व गोष्टी आपण यापूर्वी जाणून घेतले आहेत. आता या शो च्या परिक्षक (जज) विषयी जाणून घेऊयात.

Shark Tank India 2 Judges
शार्क टॅंक इंडिया (Shark Tank India 2 ) या शो मधील परिक्षकांची चर्चा ही काही थांबत नाही. यातील परिक्षक ही आता एक प्रकारे सेलिब्रिटीच बनले आहेत असे म्हणण्यास हरकत नाही. चला, तर मग जाणून घेऊयात शार्क टॅंक इंडिया सीझन 2 यामधील परिक्षक व त्यांच्या व्यवसायासंदर्भात.

विनिता सिंह (Vineeta Singh)

साधाराण 2007 मध्ये 1 करोडची नोकरी सोडून विनिता सिंह यांनी नवीन बिझनेस सुरू करण्याचा निर्णय घेतला. आज त्या ब्युटी प्रोडक्टमधील नामांकित कंपनी ‘शुगर कॉस्मेटिक’ (Sugar Cosmetics) च्या  को- फाऊंडर आहेत. त्यांनी  दिल्ली येथील पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर IIT मद्रास येथून इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगची डिग्री घेतली. एवढेच नाही विनिता यांनी  IIM अहमदाबाद येथून मॅनेजमेंटमध्ये मास्टरदेखील पूर्ण केले आहे.

पीयूश बंसल (Peyush Bansal)

पीयूश बंसल हे लेन्सकार्ट (Lenskart) कंपनीचे संस्थापक (CEO) आहेत. त्यांचे शालेय शिक्षण दिल्ली येथे पूर्ण झाले आहे. तर इलेक्ट्रिकल इंजिनिरींगची पदवी कॅनडा येथून घेतली आहे. शिक्षणानंतर त्यांनी अनेक स्टार्टअप सुरू केले होते. मात्र 2010 पासून लेंसकार्ट कंपनी सुरू केली होती. आज एक यशस्वी कंपनी म्हणून लेंसकार्टकडे पाहिले जाते.

अमन गुप्ता (Aman Gupta)

बोट (Boat) कंपनीचे सह-संस्थापक अमन गुप्ता एक यशस्वी उद्योजक आहेत. अमन गुप्ता यांनी दिल्ली येथे शालेय व महाविदयालयीन शिक्षण पूर्ण केले आहे. आज तरूणांमध्ये बोटचे हेडफोन, ब्लूटूथ व इयरफोनला प्रचंड मागणी आहे.

अनुपम मित्तल (Anupam Mittal)

देशातील प्रसिद्ध शादी डॉट कॉम (Shadi.com) चे संस्थापक म्हणून अनुपम मित्तल यांची ओळख आहे. त्यांचे शालेय शिक्षण मुंबई येथे झाले असून महाविदयालयीन शिक्षण कॅनडा येथे पूर्ण झाले आहे.आज 15 वर्षाच्या कठोर संघर्षानंतर Shadi.com ही यशस्वी वेबसाइट उभी राहिली आहे.

नमिता थापर (Namita Thapar)

Emcure Pharma या कंपनीच्या नमिता थापर या एग्झिक्यूटिव डायरेक्टर आहेत. एमक्योर फार्मास्युटिकल्स ही एक मेडिकलसंबंधित मल्टीनॅशनल कंपनी आहे. नमिता यांनी ICAI मधून चार्टर्ड अकाउंटिंगची  डिग्री मिळवली आहेत.

अमित जैन (Amit Jain)

कार देखो (cardekho) चे संस्थापक अमित जैन यांनी अशनीर ग्रोवर यांची जागा घेतली आहे. ते  पहिल्यांदा या शो मध्ये दिसणार आहेत. यांचे शिक्षण आयआयटी दिल्ली येथून झाले आहे.  आपल्या भावासोबत त्यांनी cardekho.com काम सुरू केले आहे. आज ही कंपनी करोडोंचा बिझनेस करीत आहे.