Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Shark Tank India 2: लोकप्रिय शो ‘शार्क टॅंक इंडिया सीझन 2’ कधीपासून होणार सुरू!

shark Tank India 2

Image Source : www.serialupdates.me

सोनी वाहिनीवरील सुपरहिट शो ‘शार्क टॅंक इंडिया सीझन 2’ लवकरच सुरू होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या शो चा प्रोमोदेखील दाखविण्यात आला आहे. प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा हा शो कधी व किती वाजता टेलिकास्ट होणार हे जाणुन घेऊयात.

Shark Tank India 2 Start: भारतातील सर्वाधिक गाजलेला शो म्हणजे ‘शार्क टॅंक इंडिया.’ हा एक यशस्वी बिझनेस संबधित असणारा रियालिटी शो आहे. या शो चा पहिला सीझन सुपरडुपर हिट झाल्यानंतर आता प्रेक्षक दुसऱ्या सीझनच्या प्रतिक्षेत आहेत. हा शो कधी व किती वाजता प्रसारित होणार आहे. याची प्रत्येकाला उत्सुकता लागली आहे. चला, मग आपण या शो च्या दुसऱ्या सीझनबाबत जाणून घेऊयात.

कधी सुरू होणार शार्क टॅंक इंडिया सीझन 2

शार्क टॅंक इंडिया (Shark Tank India) हा लोकप्रिय शो चा नुकताच प्रोमो दाखविण्यात आला आहे. या प्रोमोची सर्वाधिक चर्चा प्रेक्षकांमध्ये होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रोमोच्या माध्यमातून कळते की, हा शो नवीन वर्षाच्या सुरूवातीला म्हणजेच 2 जानेवारी 2023 रोजी सुरू होणार आहे. रात्री 10 वाजता हा शो प्रसारित (टेलिकास्ट) होणार आहे. एवढेच नाही, तर टी.व्ही व्यतिरिक्त हा शो ओटीटी प्लेटफॉर्म सोनी लिववरदेखील पाहायला मिळेल. 

शार्क टॅंक इंडिया सीझन 2 चा प्रोमो पाहिला का?


शार्क टॅंक इंडिया सीझन 2 च्या नवीन प्रोमोमध्ये स्वत:च्या बिझनेसचे काय महत्व असते हे पटवून दिले आहे. प्रोमोमध्ये दाखविण्यात आले आहे की, एक मुलगा खुर्चीवर बसून इंजिनिअरिंगची तयारी करीत असतो. सोबतच तो मोबाईलमध्ये गुंतलेला असतो. त्याची आई हे चित्र पाहून त्याला जोर-जोरात टोमणे मारत म्हणते, फक्त फोनवर टाईम-पास कर. शिकला नाही, नोकरी नाही, मग करत बस गार्डनिंग. हे एक गार्डनिंग काम करत असणारा माणूस ऐकत असतो. तो लगेच म्हणतो, टोमणे मारत प्रतिउत्तर देतो की, गार्डनिंगमध्ये काय ठेवले आहे. मागील वर्षी फक्त आम्हाला 28 लाख रूपये उत्पन्न मिळाले होते. यंदा ही काही खास नाही फक्त 50 लाख रूपये उत्पन्न मिळेल. हे ऐकून आई व मुलाला धक्काच बसतो. म्हणजेच या प्रोमोमधून आता संपूर्ण इंडियाला बिझनेसचे महत्व नक्कीच समजेल असे वाटते.

कोण असणार परीक्षक 

‘शादी डॉट कॉम’(Shadi.com)चे सह-संस्थापक अनुपम मित्तल, ‘लेंसकार्ट’ कंपनीचे संस्थापक पीयुष बंसल, ‘बोट’ (Boat)कंपनीचे सह-संस्थापक अमन गुप्ता, ‘शुगर कॉस्मेटिक्स’ कंपनीच्या सह-संस्थापिका विनिता सिंह व ‘एमक्योर फार्मास्युटिकल्स’ च्या कार्यकारी संचालिका नमिता थापरसह ‘कार देखो’ ग्रुपचे सह-संस्थापक व सीईओ अमित जैन असणार आहेत. 


शार्क टॅंक इंडिया हा शो नक्की काय आहे?

शार्क टॅंक इंडिया हा शो एक बिझनेस रियालिटी शो (Business Show) आहे. नवीन उद्योजकांसाठी हा शो अधिक फायदेशीर ठरतो. म्हणजेच गायकांसाठी जसे इंडियन आयडल हे यशस्वी व्यासपीठ आहे, तसेच नवीन उद्योजकांसाठी शार्क टॅंक इंडिया हे उत्तम व्यासपीठ आहेत. तरूण व नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देणे हाच या शो चा मुख्य हेतू आहे. या शो मध्ये परीक्षक (जज) म्हणून देशातील काही यशस्वी उद्योजक गुंतवणूकदार समोर बसलेले असतात. तरूण व नवीन उद्योजक आपल्या नवीन व्यवसायाची संकल्पना व भन्नाट आइडिया त्यांना समजावून सांगतात. जर कोणत्या उद्योजकाला ती पसंद पडल्यास, तो तो उद्योजक त्या व्यवसायात गुंतवणूक करण्यास तयार होतात. त्यामुळे हा शो नवीन उद्योजकांसाठी आशेचे एक किरण असते.