Home Buying: कमी जागेत जास्तीत जास्त लोकांना राहता यावे यासाठी उंच इमारतींना हल्ली सरकारकडून परवानगी दिली जात आहे. त्यामुळे आपल्याला हल्ली उंचच्या उंच इमारती(Building) पाहायला मिळत आहेत. अशाच उंच इमारतीत(Building) घर खरेदी करण्याचा तुम्ही विचार करत असाल तर कोणत्या मजल्यावर घर घ्यायचं असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. पण तुम्हाला माहिती आहे का? प्रत्येक मजल्यावर(Floor) घर घेण्याचे काही फायदे तसेच तोटेही आहेत. चला तर याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात.
वरील मजल्यावर फ्लॅट घेण्याचे फायदे
उंच इमारतीच्या वरच्या मजल्यावर घर घेतल्यास तिथून दिसणारा व्ह्युव्ह हा अतिशय सुंदर असतो. जर तुमची बिल्डिंग निसर्गाच्या सान्निध्यात आहे किंवा असेल तर वरच्या मजल्यावर राहण्याची मजाच वेगळी असते. तुम्ही बाल्कनीत उभे राहून आजूबाजू्च्या व्ह्युव्हचा आनंद घेऊ शकता. संपूर्ण परिसर तुम्ही एकाच ठिकाणावरून पाहू शकता. खालच्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये उंचावरील घरांच्या तुलनेत मर्यादित प्रकाश असतो. याशिवाय उंचावरील फ्लॅटमध्ये डासांची चिंताही त्रास देत नाही.
खालील मजल्यावर घर घेण्याचे फायदे
तुम्ही खालच्या मजल्यावर(Ground Floor) घर घेतलं असेल आणि ते घर(Home) तुम्ही भाड्याने(Rent) देणार असाल तर तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो, असं एका सर्वेक्षणात सिद्ध झाले आहे. म्हणजेच तुम्ही तुमचे घर भाड्याने देऊन चांगला नफा मिळवू शकता, कारण भारतीय बहुतेकदा उंचीवर राहण्यापेक्षा खालच्या मजल्यावर(Ground Floor) राहणे पसंत करतात. जेणेकरून यदाकदाचित लिफ्ट(Lift) बंद पडली तर सहज फ्लॅट पर्यंत जाता येईल. पण जर तुमचे घर आठव्या किंवा नवव्या मजल्यावर असेल तर तुम्हाला लिफ्टसाठी कायमची वाट पाहावी लागेल हे देखील खरे आहे. एकत्र कुटुंब असलेल्यांना तळमजल्यावर घर असणे उत्तम. सुरक्षितते व्यतिरिक्त ते सोयीस्कर देखील असते. तसेच कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी असल्यास किंवा उंचीची भीती वाटत असेल तर खालच्या मजल्यावर घर घेणे नक्कीच फायद्याचे ठरू शकते.
प्रायव्हसी जपली जाते
खालच्या मजल्यावर(Ground Floor) घर असेल तर तुम्हाला हवी तितकी प्रायव्हसी(Privacy) मिळत नाही. जर तुम्हाला एकटे राहायचे असेल तर उंच मजल्यावर घर घेणे तुमच्यासाठी केव्हाही योग्य ठरू शकते. बरेचजण रस्त्यावर किंवा इमारतीच्या कॉरिडॉरमध्ये(Corridor) कोणताही आवाज टाळण्यासाठी उंच मजल्यावर घर घेण्यासाठी पसंती दर्शवतात. दुसरीकडे, जर घर तळमजल्यावर असेल आणि जिने, लिफ्ट(Lift) आणि क्लब हाऊसपासून(Club House) जवळ असेल तर तुमच्यासाठी आवाज ही समस्या सतत त्रासदायक ठरू शकते. याशिवाय तळमजल्यावर घर असल्याने सुरक्षेचा प्रश्न देखील उद्भवतो. कारण चोरांना खालच्या मजल्यावर प्रवेश सहज करणे सोपे जाते परंतु हे इमारतीच्या सिक्युरिटीवरही(security) अवलंबून असते.