Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bank FD rate : कोणत्या बँकेतल्या एफडीत मिळतो सर्वात जास्त परतावा? गुंतवणूक करण्यापूर्वी घ्या संपूर्ण माहिती

Bank FD rate : कोणत्या बँकेतल्या एफडीत मिळतो सर्वात जास्त परतावा? गुंतवणूक करण्यापूर्वी घ्या संपूर्ण माहिती

Bank FD rate : एफडीमध्ये अनेकजण गुंतवणूक करत असतात. मात्र विविध बँकांचे एफडीवरचे व्याज दर वेगवेगळे आहेत. त्यामुळे कोणतीही एफडी काढण्यापूर्वी त्याचे व्याज दर जाणून घेणं महत्त्वाचं आहे. सरकारी बँका तसंच खासगी बँकांची आणि त्यांच्या एफडी व्याज दराविषयी थोडक्यात माहिती घेऊ...

एफडी म्हणजेच मुदत ठेव (Fixed deposit) गुंतवणूक करण्यासाठी सुरक्षित मानली जाते. व्याजदरात वाढ झाल्यामुळे एफडीकडे लोकांचं आकर्षणही वाढू लागलं आहे. मुदत ठेव भारतात आधीपासूनच लोकप्रिय आहे. व्याज दरातल्या वाढीमुळे त्यात भर पडल्याचं दिसून येतंय. इतर गुंतवणुकीच्या योजना जसं की स्टॉक मार्केट (Stock market) किंवा म्युच्युअल फंड (Mutual fund) यामध्ये जोखीम असते. मात्र एफडीत फारशी जोखीम नाही. गुंतवणूकदाराला खात्रीशीर परतावा मिळतो. पैसेही पूर्णपणे सुरक्षित असतात. सध्या विविध बँका (Banks) आपल्या मुदत ठेव योजनेवर आकर्षक असा परतावा देत आहेत. त्यातल्या काहींची माहिती देत आहोत.

स्टेट बँक ऑफ इंडिया

एसबीआय 7 ते 45 दिवसांच्या एफडीवर 3 टक्के व्याज देत आहे. दुसरीकडे, एका वर्षासाठी बँकेत एफडी करणार असाल तर तुम्हाला 6.80 टक्के परतावा मिळेल. याशिवाय, जर तुम्ही 5 वर्षांपेक्षा जास्त काळ एफडी करणार असाल तर तुम्हाला वार्षिक 7 टक्के परतावा मिळू शकतो.

एचडीएफसी बँक

एचडीएफसी बँक 7 ते 14 दिवसांच्या एफडीवर साधारणपणे 3 टक्के व्याज देत आहे. दुसरीकडे, तुम्ही जर एका वर्षासाठी बँकेत एफडी करणार असाल तर तुम्हाला 6.60 टक्के परतावा मिळणार आहे. याशिवाय जर 5 वर्षांपेक्षा जास्त काळ एफडी करत असाल तर तुम्हाला वार्षिक 6.50 टक्के रिटर्न मिळणार आहे.

आयसीआयसीआय बँक

आयसीआयसीआय बँक 7 ते 14 दिवसांच्या एफडीवर साधारणपणे 3 टक्के व्याज देत आहे. दुसरीकडे, जर तुम्ही एका वर्षासाठी बँकेत एफडी करत असाल तर तुम्हाला 6.70 टक्के परतावा मिळणार आहे. त्याचवेळी बँक त्याच कालावधीत ज्येष्ठ नागरिकांना 7.20 टक्के दरानं परतावा देत आहे.

पंजाब नॅशनल बँक

पंजाब नॅशनल बँक सर्वसामान्य नागरिकांना दोन कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवर वार्षिक 7.25 टक्के व्याज ऑफर करत आहे. यासाठी तुम्हाला बँकेत दोन वर्षांची एफडी करावी लागणार आहे. जर तुम्ही बँकेत एक वर्षाची एफडी केली तर तुम्हाला 6.80 टक्के परतावा मिळणार आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर विद्यमान व्याजदरांवर 50 बीपीएस (bps) अतिरिक्त व्याज मिळतं.

अ‍ॅक्सिस बँक

अ‍ॅक्सिस बँक 7 ते 14 दिवसांच्या एफडीवर 3.50 टक्के व्याज देत आहे. दुसरीकडे, जर तुम्ही एका वर्षासाठी बँकेत एफडी करत असाल तर तुम्हाला 6.80 टक्के परतावा मिळेल. त्याचवेळी, बँक याच कालावधीत ज्येष्ठ नागरिकांना 7.55 टक्के परतावा देऊ करत आहे.

कोटक महिंद्रा बँक

कोटक महिंद्रा बँक 7 ते 14 दिवसांच्या एफडीवर 2.75 टक्के व्याज ऑफर करत आहे. दुसरीकडे, जर तुम्ही एका वर्षासाठी बँकेत एफडी करत असाल तर तुम्हाला 6.26 टक्के परतावा मिळणार आहे. याच कालावधीत बँक ज्येष्ठ नागरिकांना 6.75 टक्के परतावा देत आहे.