• 28 Nov, 2022 17:15

Shark Tank India : ‘शार्क टॅंक इंडिया’चा दुसरा सीझन लवकरच!

Shark Tank India Season 2

Image Source : www.sharktank.co.in

Shark Tank India Season 2 : 2021 मध्ये डिसेंबर महिन्यात शार्क टॅंक इंडियाचा पहिला सीझन सुरू झाला होता. याचा दुसरा सीझन लवकरच सुरू होणार असून यात अश्निर ग्रोव्हर आणि गझल अलग हे शार्क दिसणार नाहीत.

Shark Tank India Season 2 : ‘शार्क टॅंक इंडिया शो’च्या पहिल्या सिझनला प्रेक्षकांची भरभरून पसंती मिळाली होती. या शोच्या माध्यमातून अनेक उद्योजक घराघरात पोहचले होते. आता या शोच्या दुसऱ्या सिझनचा प्रोमो रिलीज झाला आहे. त्यामुळे लवकरच शार्क टॅंकचा दुसरा सीझन येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याची तारीख येणाऱ्या काही दिवसांत जाहीर केली जाऊ शकते.

भारतातील Shark Tank हा कार्यक्रम अमेरिकन बिझनेस रीअलिटी शो ज्याचे नाव सुद्धा Shark Tank असेच आहे; त्यावर आधारित आहे. अमेरिकेत 2009 पासून हा शो सुरू झाला आहे. या कार्यक्रमाची मूळ संकल्पना जपानमधील ‘मनी टिगर’ (Money Tigers) या कार्यक्रमामधून घेतली असल्याचे सांगितले जाते. जपानमध्ये हा कार्यक्रम 2001 मध्ये हा आला होता.


भारतातील शार्क टॅंकचा पहिला सीझन चांगलाच लोकप्रिय झाला. गेल्या वर्षी डिसेंबर 2021 मध्ये सोनी टीव्ही या चॅनेलवर याचे प्रक्षेपण होत होते. हा कार्यक्रम अनेकांच्या मनात स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकतो, अशी भावना निर्माण करण्यात यशस्वी झाल्याचे मानले जाते. कार्यक्रमातील शार्क्सकडून स्वतःच्या व्यवसायासाठी फंडिंग मिळवणे, हा या कार्यक्रमाचा मूळ उद्देश होता. आता या कार्यक्रमाचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. यात काही बदल बघायला मिळणार आहेत. दुसऱ्या सीझनमध्ये अश्निर ग्रोव्हर आणि गझल अलग हे दिसणार नाहीत, असे सांगितले जाते.

अश्निर ग्रोव्हरचीच अधिक चर्चा!

शार्क टॅंकच्या पहिल्या सीझनमध्ये आश्विन ग्रोवर कायम बातम्यांमध्ये असायचा. अश्निर याची बोलण्याची रोखठोक पद्धत यामुळे तो शार्क टॅंकमधील सर्वाधिक चर्चेतील परीक्षक आणि गुंतवणूकदार म्हणून ओळखला जात होता.

शार्क टॅंक इंडियाच्या पहिल्या सीझनमध्ये विनिता सिंह, पियुष बन्सल, नमिता थापर, अनुपम मित्तल, अमन गुप्ता यांच्यासोबत अश्निर ग्रोव्हर होते. आता येणाऱ्या दुसऱ्या सीझनमध्ये अश्निर यांना अमित जैन रिप्लेस करणार असल्याचं बोललं जातंय. अमित जैन हे कार देखो या ग्रुपचे को-फाऊंडर आहेत. आता हा दुसरा सीझनही पहिल्याप्रमाणे हिट ठरणार का ते पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे.