Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Oneplus 11 5G launch date: One plus 11 5G कधी होणार लाँच? जाणून घ्या डिटेल्स

Oneplus 11 5G launch date

Image Source : http://www.91mobiles.com/

Oneplus 11 5G launch date: Oneplus 11 5G हा स्मार्टफोन OnePlus Cloud 11 इव्हेंटमध्ये लाँच केला जाईल. स्मार्टफोनची लॉन्च डेट आणि वैशिष्ट्ये जाणून घेऊया.

Oneplus 11 5G launch date: OnePlus चे अनेक स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहे. त्यातील नवीन सिरिज लाँच होतच आहे. भारतात येणारा फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 11 लॉन्च करण्याची डेट जाहीर केली आहे. OnePlus 11 5G सोबत कंपनी नवीन वर्षात भारतीय बाजारात OnePlus Buds Pro 2 लाँच करणार आहे.  Qualcomm चा नवीनतम चिपसेट OnePlus च्या येणाऱ्या फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये उपलब्ध असेल. OnePlus Cloud 11 इव्हेंटमध्ये हा स्मार्टफोन लाँच केला जाईल. स्मार्टफोनची लॉन्च डेट आणि वैशिष्ट्ये जाणून घेऊया. 

OnePlus 11 5G कधी होणार लाँच? (When will OnePlus 11 5G be launched?)

OnePlus 11 5G आणि OnePlus Buds Pro 2 इयरबड भारतात 7 फेब्रुवारी 2023 रोजी लॉन्च होतील. कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट करून लॉन्चची डेट जाहीर केली आहे. एक टीझरही रिलीज केला. टीझर व्हिडिओमध्ये स्मार्टफोनची झलक दिसली आहे. गेल्या आठवड्यातही एक टीझर व्हिडिओ लीक झाला होता, ज्यामध्ये फोनचे डिझाइन समोर आले होते. टीझर व्हिडिओनुसार, हँडसेटमध्ये वर्तुळाकार कॅमेरा मॉड्यूल उपलब्ध असेल. त्याच्या मध्यभागी हॅसलब्लॅडचा लोगो देण्यात आला आहे. टीझर व्हिडिओमध्ये दिसणारे डिझाईन OnLeaks च्या रेंडर सारखे होते.

काय असू शकतील OnePlus 11 5G ची वैशिष्ट्ये? (What could be the specifications of OnePlus 11 5G?)

स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाले तर नवीन Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर OnePlus 11 मध्ये उपलब्ध असणार आहे.  डिव्हाइसला 16GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज मिळेल. स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा QHD + AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. त्याचा रिफ्रेश दर 120Hz असेल. फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा, 48MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि 32MP टेलिफोटो लेन्स दिला जाऊ शकतो. याशिवाय फोनच्या इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर वनप्लसच्या या येणाऱ्या स्मार्टफोनमध्ये 100W फास्ट चार्जिंगसह 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

TWS इयरबड्सची वैशिष्ट्ये (Features of TWS earbuds)

कंपनी स्मार्टफोनसोबत TWS OnePlus Buds Pro 2 देखील देत आहे. यात ड्युअल ऑडिओ ड्रायव्हर्स LHDC 4.0 कोडेक, स्पेशियल ऑडिओ आणि अॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन सारखी वैशिष्ट्ये मिळतील. स्मार्टफोन आणि इअरबड्सबद्दल सध्या इतकेच डिटेल्स समोर आले आहेत. काही दिवसात त्याच्याशी संबंधित इतर माहिती शेअर करेल अशी करणार आहे.