आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात होणारी घसरण, तसेच देशांतर्गत वाढलेली महागाई यावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने भारताने गव्हाची निर्यात तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
India bans wheat exports with immediate effect
— Press Trust of India (@PTI_News) May 14, 2022
दरम्यान, भारताचे 2022-23 मध्ये 10 दशलक्ष टन धान्य निर्यात करण्याचे लक्ष्य असेल, असे सरकारने सांगितले होते. त्यानुसार काही देशांशी भारताची चर्चा ही सुरू होती. पण आज अचानकपणे भारताने गव्हाची निर्यात करण्यावर तात्काळ बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. येणाऱ्या काळात गव्हाची जागतिक बाजारपेठ मिळवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असताना, सरकारने या निर्णयात लगेच बदल केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन या दोन देशांच्या दरम्यान सुरू असलेल्या युध्दाच्या पार्श्वभूमीवर भारत निर्यातीच्या वाढत्या संधीकडे पहात होता. रशिया आणि युक्रेननंतर भारत हा गव्हाचा मोठा निर्यातदार देश आहे. भारताने 2021-22 मध्ये गव्हाची 7 दशलक्ष टन अशी विक्रमी निर्यात केली होती. यावर्षीही भारताने गव्हाची निर्यात वाढवण्यासाठी काही देशांमध्ये व्यापारी प्रतिनिधी पाठवून त्यानुसार धोरण राबवण्याचे ठरवले होते. पण वाढती महागाई आणि सध्या भारतातील अनिश्चित नैसर्गिक वातावरणामुळे गव्हाच्या अपेक्षित उत्पादनावर संकट आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच भारताने गहू निर्यातीवर बंदी घातली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, सरकारने इतर देशांकडून अन्नधान्याची गरज पूर्ण करण्यासाठी मागणी किंवा विनंती आल्यावरच भारतातून गव्हाच्या निर्यातीला परवानगी दिली जाईल, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.
image source - https://bit.ly/3MdtUN6