जगभरात प्रसिद्ध असलेल्या स्टारबक्स कॉफी चैन हाऊसच्या सीईओपदी (Starbucks New CEO Laxman Narasimhan) मूळचे भारतीय असलेले लक्ष्मण नरसिंहन यांची नियुक्ती झाली आहे. नरसिंहन हे 1 ऑक्टोबर, 2022 पासून पदभार स्वीकारणार आहेत. त्यांना या पदासाठी कंपनीने दिलेली ऑफर ऐकून तुम्हाला धक्का बसेल.
स्टारबक्सच्या सीईओपदी सध्या हॉवर्ड शल्ट्झ (Howard Shultz) हे असून ते 1 एप्रिल, 2023 पर्यंत या पदावर असणार आहेत. त्यानंतर लक्ष्मण नरसिंहन हे पूर्णवेळ सीईओ पदाचा पदभार स्वीकारतील. लक्ष्मण नरसिंहन यांनी यापूर्वी ड्युरेक्स कॉडमची निर्मिती करणाऱ्या रेकिट बेनकिंसर (Reckitt Benckiser) कंपनीच्या सीईओपदी 3 वर्षे काम पाहिले आहे. या पदासाठी स्टारबक्सने लक्ष्मण नरसिंहन यांना वार्षिक 13.6 दशलक्ष डॉलर इतका पगार ऑफर केला. या व्यतिरिक्त नरसिंहन यांना कॅश सायनिंग बोनस म्हणून 1.6 दशलक्ष डॉलर आणि रेकिट बेनकिंसर या कंपनीतील भरपाई म्हणून 9.25 दशलक्ष डॉलर इन्सेटीव्ह मिळणार आहे.
भारतीयांचे जागतिक कंपन्यांवर वर्चस्व!
लक्ष्मण नरसिंहन यांनी भारतीयांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रमुखपदी अनेक भारतीय आहेत. त्यात सुंदर पिचाई, शांतनु नारायण, पराग अग्रवाल, सत्या नडेला, अरविंद कृष्णा असे महारथी आहेत. त्यात आता लक्ष्मण नरसिंहन यांचे नाव जोडले गेले.
Image Source: Bloomberg