Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Updated ITR: अपडेटेड आयटीआर फॉर्म म्हणजे काय?

updated ITR

इन्कम टॅक्स विभागाने अपडेटेड इन्कम टॅक्स रिटर्न (Updated Income Tax Return) भरण्याची सुविधा सरकारने 2022 च्या बजेटमधून उपलब्ध करून दिली आहे.

इन्कम टॅक्स विभागाने अपडेटेड इन्कम टॅक्स रिटर्न (Updated Income Tax Return) भरण्याची सुविधा सरकारने 2022 च्या बजेटमधून उपलब्ध करून दिली आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की, तुम्हाला आयटीआर रिटर्न (IT Return) भरण्यासाठी जास्तीचा वेळ मिळाला. या सुविधे अंतर्गत ज्यांनी आयटीआर रिटर्न यापूर्वी भरलेले आहे. पण त्यात काही उत्पन्नाचे स्त्रोत देण्यात आलेले नाही किंवा द्यायचे राहिले आहेत. ते दंड भरून सुधारित रिटर्न (Updated Return) भरू शकतात. अपडेटेड रिटर्नबद्दल आपण अधिक जाणून घेऊयात.

अपडेटेड रिटर्न म्हणजे काय? 

इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम 139 (8 अ) मध्ये अद्ययावत / सुधारित इन्कम टॅक्स रिटर्न (Updated Income Tax) भरण्याची तरतूद उपलब्ध आहे. इन्कम टॅक्स कायद्यात करण्यात आलेल्या नवीन तरतुदींमुळे करदात्याला रिटर्न फाईल करताना काही त्रुटी राहिल्यास किंवा त्यात काही चूका झाल्यास ती दंड भरून सुधारण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. संबधित करदात्याला मुदत संपल्यानंतर दंड भरून 2 वर्षांच्या आत सुधारित आयटीआर रिटर्न भरता (ITR U form online) येऊ शकते.


अपडेटेड आयटीआर कोण फाईल करू शकतं?

अपडेटेड आयटीआर (Income Tax Updated Return) कोणीही भरू शकतं. ज्याने यापूर्वी आयटीआर फाईल केला आहे/केला नाही. आयटीआर उशिरा फाईल केला आहे किंवा ज्याच्याकडून आयटीआर भरताना चूक झाली आहे, तो करदाता अपडेटेड आयटीआर फाईल करू शकतो. इन्कम टॅक्स कायद्यामध्ये नव्याने तरतूद केल्यानुसार, 2019-20 आणि त्यानंतरच्या असेसमेंट वर्षाचे रिटर्न अपडेट करता येऊ शकतात. करदाता प्रत्येक असेसमेंट वर्षासाठी एक अपडेटेड आयटीआर फाईल करू शकतो.

ITR - U PART - 1
अपडेटेड आयटीआर फॉर्मचा नमुना

अपडेटेड आयटीआर फाईल करण्यासाठी मुदत

इन्कम टॅक्स कायद्यातील तरतुदीनुसार अपडेटेड आयटीआर भरण्याची सुविधा 1 एप्रिल, 2022 पासून सुरू होते. तसेच तुम्ही असेसमेंट वर्ष संपल्यानंतर 24 महिन्यांपर्यंत अपडेटेड फाईल रिटर्न करू शकता. 2022-23 या आर्थिक वर्षात तुम्ही 2021-21 आणि 2021-22 या वर्षांचे अपडेटेड आयटीआर फाईल करू शकता.

अतिरिक्त टॅक्स भरावा लागणार!

अपेटेडेट आयटीआर 12 महिन्यांच्या आत भरल्यास करदात्याला देय असलेल्या टॅक्सवर अतिरिक्त 25 टक्के व्याज दंड म्हणून भरावे लागेल. तसेच 12 महिन्यानंतर आणि 24 महिन्यांच्या आत भरल्यास देय असलेल्या रकमेवर 50 टक्क्यांपर्यंत व्याज भरावे लागेल.

अपडेटेड आयटीआर भरण्यासाठी आवश्यक माहिती?

अपडेटेड आयटीआरमध्ये करदात्याला ज्या उत्पन्नावर टॅक्स लागतो, ते उत्पन्नाचा स्त्रोत संबंधित हेड अंतर्गत नमूद करणं गरजेचं आहे. यासाठी डिटेलमध्ये इन्कम टॅक्स ब्रेक-अप देण्याची गरज नाही. याशिवाय पॅनकार्ड, टॅक्स देय असणारे वर्ष, इतर स्त्रोतांमधून मिळणारे उत्पन्न इत्यादी माहिती देणं आवश्यक आहे. त्याचबरोबर करदात्याला अपडेटेड आयटीआर भरण्याचे कारण नमूद करणं आवश्यक आहे.

अपडेटेड आयटीआर कोण फाईल करू शकत नाही?

ज्या करदात्याच्या विरोधात संबंधित असेसमेंट वर्षात काही चौकशी सुरू असेल किंवा त्याच्या विरोधात एखादा खटला चालवला जात असेल तर त्या करदात्याला अपडेटेड आयटीआर फाईल करता येत नाही. तसेच एखाद्या करदात्याला अतिरिक्त टॅक्स लागला असेल तर त्याला updated Return भरता येत नाही.