Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Top-Up SIP: टॉप-अप एसआयपी म्हणजे काय? आणि ते कसे काम करते?

What is Top-Up SIP

Top-Up SIP: टॉप अप एसआयपी ही अशी एक सुविधा आहे; जी गुंतवणूकदाराला ठराविक कालावधीने एसआयपीची रक्कम वाढविण्याची परवानगी देते.

म्युच्युअल फंड गुंतवणुकीत एसआयपी म्हणजेच सिस्टेमॅटिक इन्वेस्टमेंट प्लॅन (Systematic Investment Plan-SIP) हा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एक प्रभावी आणि सोयिस्कर असा पर्याय मानला जातो. या पर्यायाद्वारे दीर्घकालीन गुंतवणुकीत चांगले रिटर्नस मिळू शकतात. एसआयपी हा एकूणच आर्थिक शिस्त लावण्यासाठी खूप महत्त्वाचा पर्याय मानला जातो.                                   

एसआयपी या पर्यायाद्वारे गुंतवणूकदार प्रत्येक दिवशी, आठवड्याने, महिन्याने, 3 महिन्याने, 6 महिन्याने किंवा वर्षावर्षाने नियमितपणे म्युच्युअल फंडमध्ये (Mutual Fund) गुंतवणूक करू शकतो. दीर्घकालात एसआयपीद्वारे गुंतवणूक केल्यास शेअर मार्केटमधील अस्थिरतेचा परिणाम म्युच्युअल फंडमधील युनिट्च्या एनएव्हीवर होत असतो. जेव्हा मार्केट वर जाते तेव्हा म्युच्युअल फंडच्या एनएव्हीची किंमतसुद्धा वाढते आणि जेव्हा मार्केट खाली येते तेव्हा एनएव्हीची किंमत खाली येते. एसआयपीद्वारे यात गुंतवणूक केल्याने 2-3 वर्षाच्या कालावधीत या एनएव्हीची किंमत एका साधारण पातळीवर येते. ज्याचा फायदा गुंतवणूकदाराला होतो. यामध्ये महिन्याच्या एसआयपीला (Monthly SIP) प्राधान्य दिले जाते आणि Monthly SIP पॉप्युलरसुद्धा आहे. 

SIP Benefit

म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही वर्षानुवर्षे किंवा नियमितपणे एसआयपीद्वारे गुंतवणूक करत असताना, तुमच्या वार्षिक उत्पन्नात किंवा व्यावसायातील नफ्यातही वाढ होत असते. पण तुमची गुंतवणूक मात्र तेवढ्याच पटीने सुरू असते. जी तुम्ही पहिल्यांदा सुरू केली होती. आता तुमच्याकडे पूर्वीपेक्षा अधिक रक्कम गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहे. जी तुमचा नियमित खर्च भागवून शिल्लक राहते. यासाठी एसआयपी या प्रक्रियेमध्ये  SIP Top-Up ही सुविधा उपलब्ध आहे. या सुविधेद्वारे तुम्ही तुमच्या एसआयपीची रक्कम वर्षावर्षाने वाढवू शकता. ही एसआयपी टॉप-अपची रक्कम तुम्ही एका ठराविक रकमेने किंवा टक्क्यांनुसार वाढवू शकता. यासोबत तुमची ओरिजनल एसआयपीची रक्कम सुद्धा सुरू राहते.

Top-Up SIP म्हणजे नेमके काय?

अक्षयला रिटायरमेंट फंडसाठी मासिक एसआयपी सुरू करायची आहे. यासाठी तो प्रत्येक महिन्याला 20 हजार रुपये असे 20 वर्षांसाठी मल्टी-कॅप फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे ठरवतो. या गुंतवणुकीतून त्याने 11 टक्के परतावा मिळण्याची अपेक्षा ठेवली आहे.

प्रत्येक महिन्याला 20 हजार रुपये आणि त्यावर वर्षिक परतावा 11 टक्के पकडले तर अक्षय 20 वर्षांत 48 लाख रुपये गुंतवणूक करतो आणि त्याला त्या गुंतवणुकीतून अंदाजे 1.75 लाख रुपयांचा रिटायरमेंट फंड उभा राहतो.

आता अक्षयने प्रत्येक महिन्याच्या एसआयपीवर वर्षाला 10 टक्के टॉप-अप एसआयपी करायची ठरवले?

तर यातून अक्षयला रिटायरमेंट फंड अंदाजे 2.82 कोटीपर्यंत जाऊ शकतो आणि त्यासाठी त्याची गुंतवणूक असणार आहे 93.60 लाख रुपये. म्हणजेच प्रत्येक वर्षी 10 टक्के रक्कम वाढवल्याने अक्षयच्या रिटायरमेंट फंडमध्ये अतिरिक्त 1 कोटी रुपयांची वाढ होईल.

टॉप-अप एसआयपीचे फायदे! Advantages of Top-Up SIP!

  • महागाईशी सामना करण्यासाठी चांगला पर्याय!
  • वाढत्या उत्पन्नाबरोबर गुंतवणुकीत वाढ करण्यासाठी मदतनीस!
  • वापरण्यासाठी खूपच सोपे आणि सोयिस्कर!
  • आर्थिक गोल जलदगतीने पूर्ण करण्यासाठी उपयुक्त!


SIP Top-Up मुळे गुंतवणुकीत वाढ करण्यासाठी आणि आर्थिक गोल पूर्ण करण्यासाठी मदत होऊ शकते. तसेच वाढत्या महागाईला तोंड देताना गुंतवणुकीचा ओघ वाढवण्यासाठी एसआयपी टॉप-अपचा चांगला फायदा होऊ शकतो.