Soybeans: गेल्या काही दिवसांत सोयाबीनचे दरात घसरण (Fall in soybean prices) झाली आहे. त्यामुळे सोयाबीनची विक्री (Selling soybeans) करावी की नाही? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पुढे सोयबिनच्या दरात वाढ होईल की आणखी घट? या विचाराने काही शेतकरी सोयाबीनची विक्री करायला घेत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर वाढले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना आशा आहे की सोयाबीनचे भाव वाढतील.
Table of contents [Show]
सीड क्वॉलिटी आणि मिल क्वॉलिटी (Seed quality and mill quality)
सोयाबीनची पेरणी झाल्यापासून ते आतापर्यंत त्यावर ग्रहण असल्याप्रमानेच आहे. आधीच अति पावसामुळे सोयाबीनचे पीक डबघाईला आले आणि आता त्याला भावही मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. स्थानिक बाजारात जरी सोयाबीनची भाव वाढ झाली तरी सुद्धा शेतकरी सुखावेल. गेल्या आठवड्यात सोयापेंडच्या दरात वाढ झाली आहे. सोयाबीन तेलात सुद्धा वाढ झाल्याची माहिती मिळाली आहे. सीड क्वॉलिटी आणि मिल क्वॉलिटी (Seed quality and mill quality) यांच्या दरात 1500 रुपयाचा फरक दिसून येत आहे, सीड क्वॉलिटी 7000 तर मिल क्वॉलिटी 5500 असा दर दिसून येत आहे.
देशातील बाजारात सोयाबीनची आवक (Arrival of soybeans in the domestic market)
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयबिनच्या दरात चढ उतार दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसात सोयाबीन, तेल यांचे दर वाढले आहेत. आज बाजारात 2 लाख 70 क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. आवक पाहता सध्या देशातील बाजारात सोयाबीनचे दर स्थिर आहेत. सोयातेल महागल्याने सोयबिनच्या दरात सुद्धा वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 6 हजार रुयायांच्या वर सोयबिनला भाव मिळू शकतो असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.
कोणत्या पिकात आहे तेजी? (Which crop is booming?)
सोयाबीन प्रमाणे कापसाच्या दरात सुद्धा घट दिसून येत आहे. देशातील बाजारात सध्या नवीन तुर येत आहे. सध्या आवक कमी असल्याने तुरीत तेजी दिसून येत आहे. नवीन तुरीला सध्या 6700 ते 7400 असा दर मिळत आहे.
महाराष्ट्रातील काही बाजारातील सोयाबीनचे दर (Soybean prices in some markets in Maharashtra)
बाजार समिती | आवक | सोयाबीनचे दर |
कांरजा कृषी उत्पन्न बाजार समिती | 2500 | 5050 ते 5425 |
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती | 1220 | 4500 ते 5456 |
हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती | 600 | 5030 ते 5320 |
चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती | 1883 | 4601 ते 5700 |
औसा कृषी उत्पन्न बाजार समिती | 774 | 5351 ते 5651 |