Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Income Tax : Tax Relief संबंधी आदेश, कोणत्या Tax Payers ना होणार फायदा ते घ्या जाणून

Income Tax

Income Tax विभागाकडून कर सवलतीचा एक आदेश आला आहे. उपचारासाठी मिळणाऱ्या एकूण रकमेबाबाबत कर सवलत मिळत असते. यासंबंधी असणारा हा आदेश काय आहे ते जाणून घेऊया.

Income Tax : आयकर विभागाकडून कर सवलतीचा एक आदेश आला आहे. उपचारासाठी मिळणाऱ्या एकूण रकमेबाबाबत कर सवलत मिळत   असते. यासंबंधी असणारा हा आदेश काय आहे ते जाणून घेऊया.   

कोविड - 19 उपचारासाठी रकमेवर दावा 

केंद्रीय प्रत्यक्ष कर  मंडळाकडून याविषयीच्या अटी व शर्थी मांडण्यात आल्या आहेत. 5 ऑगस्ट 2022 रोजी याविषयीची अधिसूचना काढण्यात आली होती. कर्मचाऱ्याला कोविड -19 च्या उपचारासाठी प्राप्त केलेल्या रकमेवर कर सवलतीचा दावा दाखल करणे शक्य होणार आहे. यानुसार या सवलतीसाठी  Tax Payers ना आवश्यक कागद पत्रांसाह आयकर विभागाला एक फॉर्म जमा करावा लागेल.   

कोविड -19 उपचारासाठी लागलेल्या रकमेवर आणि कोविड-19 च्या कारणामुळे मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्यांना मिळणाऱ्या मदतीवर आयकर लागणार नाही, अशी गेल्या वर्षी केंद्र सरकारने घोषणा केली होती. यंदाच्या अर्थसंकल्पात याविषयी अधिसूचना  दिली आहे. आर्थिक वर्ष  2019-20 साठी ही सवलत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याचबरोबर आयकर विभागाने कोणत्याही प्रकारच्या तक्रारीचा त्वरित निपटारा करण्यासाठी समिती गठित करण्याचीही घोषणा करण्यात आली होती. 

यासाठी आयकर खात्याच्या कार्यालयात जाण्याचीही आवश्यकता नाही.  करदात्यांच्या सुविधेसाठी डिजिटलायझेशनला करण्यात आले आहे. यामुळे कर सवलत मिळण्यासाठी अर्ज डिजिटल करण्यात येणार आहे.   

Income Tax विभागाकडून  करदात्यांना हा दिलासा मानला जात आहे. यामुळे Tax Payers  ना  लाभ होऊ शकेल. 

आर्थिक वर्षात 8.77 लाख कोटी रुपयांचा कर 

चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत कर जमा करण्यात वाढ झाली आहे. 24 टक्के इतकी ही वाढ आहे. एकूण रक्कम 8.77 लाख कोटी रुपये इतकी आहे. नुकतीच याविषयीची माहिती आयकर विभागाने दिली आहे. 2022-23 या आर्थिक वर्षाच्या अंदाजाच्या 61.79 टक्के इतकी एकूण कर वसूली आहे.