Sachin Tendulkar Net Worth: भारतीय लोकांना तुम्ही विचारले की, तुमचा आवडता खेळ कोणता? तर 10 पैकी 8 लोक नक्कीच क्रिकेटचेच(Cricket) नाव घेतील. इतकी ही क्रिकेटची आवड. याच क्रिकेटमध्ये आपल्या सर्वांचा आवडता खेळाडू आणि गॉड ऑफ क्रिकेट म्हणजे ‘सचिन रमेश तेंडुलकर’ (Sachin Tendulkar). सचिनच्या क्रिकेटमधील निवृत्ती नंतरही त्याची लोकप्रियता कायम आहे. लोकांचे सचिनबद्दलचे (Sachin Tendulkar) प्रेम आणि आदर जसा त्याला क्रिकेटच्या मैदानात मिळत होता, तसाच आजही कायम आहे. सचिनने त्याच्या बॅटने जितक्या धावा केल्या असतील त्याच्या दुपटीने प्रसिद्धी आणि पैसेही कमावला. निवृत्तीनंतरही सचिन लक्झरी लाईफचा आनंद घेत आहे. पण तुम्हाला माहित आहे का? सचिन तेंडुलकरची एकूण संपत्ती किती? चला तर आज जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
Sachin Tendulkar's Earnings: कमाईचे स्रोत काय?
जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक म्हणून सचिन तेंडुलकरला ओळखले जाते. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याने भारतासोबतच अनेक परदेशी कंपन्यांच्या ब्रँडशी करार केला आहे. ब्रँड एंडोर्समेंट, गुंतवणूक आणि हॉटेल व्यवसायातूनही तो मोठी कमाई करतो. मुंबई आणि बंगळुरूमध्ये सचिनचे दोन रेस्टॉरंट(Restaurant) आहेत. याशिवाय सचिनला क्रिकेट असोसिएशन कडून पेन्शनही मिळते. अशा प्रकारे सचिन एका महिन्याला 4 कोटींहून अधिक आणि वार्षिक 50 कोटींहून अधिक कमाई करतो.
Sachin Tendulkar's Pension: सचिन तेंडुलकरला किती पेन्शन मिळते?
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर बीसीसीआय(BCCI) सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) दर महिन्याला 50,000 रुपये पेन्शन देते. याशिवाय सचिनला भारतरत्न मिळाला असल्याने त्यातूनही त्याला प्रत्येक महिन्याला पेन्शनची रक्कम मिळते.
Sachin Tendulkar: 100 कोटींचा बंगला
- सचिन सध्या मुंबईतील वांद्रे(Bandra) येथील एका आलिशान बंगल्यात कुटुंबासह राहतो. हा बंगला सचिनने 2007 मध्ये खरेदी केला असून तेव्हा या बंगल्याची किंमत 39 कोटी रुपये होती, मात्र आज सचिनच्या या बंगल्याची किंमत जवळपास 100 कोटींवर पोहोचली आहे. सचिनच्या या आलिशान बंगल्यात सर्व प्रकारच्या सुविधा(Facility) उपलब्ध आहेत
- याशिवाय सचिनचा (Sachin Tendulkar) वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये(Bandra Kurla Complex) एक फ्लॅट आहे, ज्याची किंमत जवळपास 8 कोटी रुपये इतकी आहे
- एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, केरळमध्ये सचिन तेंडुलकरचे वॉटर फेसिंग असलेले घर(Water Facing Home) असून या घराची किंमत सुमारे 78 कोटी रुपये आहे
Sachin Tendulkar Net Worth: सचिन तेंडुलकरची एकूण संपत्ती किती?
एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, सचिन तेंडुलकरची एकूण संपत्ती 150 मिलियन डॉलर्स तर भारतीय चलनानुसार एकूण 1,110 कोटी रुपयांची संपत्ती आहे. याशिवाय सचिन ‘Kochi ISL’ नावाच्या फुटबॉल संघाचा आणि प्रीमियर बॅडमिंटन लीगमधील ‘Bangalore Blaster’ संघाचा मालक आहे.