Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Government Scheme: सरकारी योजनांचा परिणाम किती? यावर सरकारचा आढावा घेणे सुरू..

Pradhan Mantri Jan Dhan Yojana

Image Source : http://www.pmjdy.gov.in.com/

Government Scheme: केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांच्या फायद्यासाठी अनेक सामाजिक सुरक्षा योजना राबविण्यात येत आहेत. आता या योजनांचा लोकांना किती फायदा होतोय याचा आढावा सरकारने घ्यायचे ठरवले आहे.

Government Scheme: केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांच्या फायद्यासाठी अनेक सामाजिक सुरक्षा योजना राबविण्यात येत आहेत. आता या योजनांचा लोकांना किती फायदा होतोय याचा आढावा सरकारने घ्यायचे ठरवले आहे. या कारणास्तव, जन धन (PMJDY), मुद्रा कर्ज, किसान क्रेडिट कार्ड (KCC) आणि PM स्वानिधी यासह विविध सामाजिक योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी वित्त मंत्रालयाने सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि वित्तीय संस्थांच्या प्रमुखांसोबत बैठक बोलावली होती. 

प्रधानमंत्री जन धन योजना आणि पीएम स्वानिधी (Pradhan Mantri Jan Dhan Yojana and PM Swanidhi)

मिळालेल्या माहितीनुसार, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांच्यासोबत अर्थ मंत्रालयाची बैठक 19 जानेवारी रोजी झाली. या बैठकीत आर्थिक समावेशनाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यासाठीच्या योजनांचा आढावा घेतला. वित्तसेवा सचिव विवेक जोशी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) चा आढावा घेतला गेला. सरकारने ही योजना डिसेंबर 2024 पर्यंत वाढवली आहे.

कोरोना महामारीमुळे बाधित झालेल्या रस्त्यावरील विक्रेत्यांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी पुन्हा काम सुरू करण्यास मदत करण्यासाठी गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने 1 जून 2020 रोजी प्रधानमंत्री स्वानिधी योजना सुरू केली. योजनेअंतर्गत, 10,000 रुपयांचे कर्ज अत्यंत अनुदानित व्याजदरावर उपलब्ध करून दिले जाते.

इतर काही योजना….. (Some other plans...)

सूत्रांनी सांगितले की, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBI) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBI) आणि अटल पेन्शन योजना (APY) ची लक्ष्ये आणि उपलब्धी यांचाही आढावा घेतला जाणार आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी गेल्या वर्षी सरकारने त्यांच्या प्रमुख विमा योजनांचा प्रीमियम वाढवला होता. याशिवाय मुद्रा योजना आणि स्टँड अप इंडिया योजनेचाही आढावा घेतला जाईल. 

प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) 2015 मध्ये बिगर-औद्योगिक, बिगर कृषी लघु किंवा सूक्ष्म उद्योगांना 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यासाठी सुरू करण्यात आली होती. संपूर्ण योजनांचा आढावा घेऊन झाला की त्याचा अहवाल आपल्या समोर सादर केला जाईल.