Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंगमध्ये काय फरक आहे?

net banking and mobile banking difference

धकाधकीच्या जीवनात बँकेच्या कामांसाठी रांगेत उभे राहून वेळ वाया जाऊ नये म्हणून मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंगचा वापर करणे सर्वसामान्यांच्या फायद्याचे ठरत आहे.

मोबाईल बँकिंग (Mobile Banking) आणि इंटरनेट बँकिंगच्या (Internet Banking) वापरामुळे अनेकांचा बँकेच्या रांगेतला वेळ वाचत आहे. कोणत्याही वेळी आणि कुठूनही या सेवांचा लाभ घेता येत असल्याने नागरिकांची या सेवांना पसंती मिळत आहे. मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंग या दोन्ही सेवांमध्ये नेमका काय फरक आहे ते आपण पाहणार आहोत.

मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंगची कार्यक्षमता  

दोघांमधील सर्वात मोठा फरक म्हणजे त्यांची कार्यक्षमता. इंटरनेट बँकिंग तुम्हाला तुमच्या डेस्कटॉप (Personal Computer) किंवा लॅपटॉप आणि इंटरनेट कनेक्शनद्वारे ऑनलाईन व्यवहार करता येतात. दुसरीकडे, मोबाईल बँकिंग इंटरनेटसह किंवा त्याशिवाय करता येते. आजकाल अनेक बँकांकडे मोबाईल बँकिंगसाठी त्यांचे मोबाईल अ‍ॅप आहेत. असे असले तरी, असे मोबाईल बँकिंग अ‍ॅप वापरण्यासाठी तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे. तर बँका एसएमएसद्वारे (SMS) मोबाईल बँकिंगची सेवा देतात. त्यामुळे, तुमच्याकडे स्मार्टफोन नसला, आणि अगदी बेसिक फीचर्स असलेला मोबाईल असेल तरीही, तुम्ही एसएमएसद्वारे मोबाईल बँकिंगचा वापर करू शकता.

मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंगची व्यवहार सुविधा

मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंगमधील फरक म्हणजे व्यवहार सुविधा. सामान्यतः, बँकेचे ऑनलाईन पोर्टल ज्याद्वारे इंटरनेट बँकिंग व्यवहार केले जातात, ते अधिक सुविधा देतात. खाते विवरण तपासण्यापासून, निधी हस्तांतरित करणे, नवीन चेकबुक ऑर्डर करणे, नवीन एफडी उघडण्यापर्यंत, तुम्ही ऑनलाईन बँकिंगद्वारे बरेच व्यवहार करू शकता. परंतु ऑनलाईन बँकिंगच्या तुलनेत मोबाईल बँकिंग मर्यादित आहे.

whatsapp-image-2022-05-23-at-45459-pm.jpeg

ऑनलाईन बँकिंग पोर्टल आणि मोबाईल बँकिंग अ‍ॅप

तुमच्या संगणकावर किंवा लॅपटॉपवर ऑनलाईन बँकिंग वापरण्यासाठी, तुम्हाला कोणतेही विशिष्ट सॉफ्टवेअर किंवा प्रोग्राम डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही. तुमच्या बँकेच्या इंटरनेट बँकिंग संकेतस्थळावर प्रवेश करण्यासाठी तुम्ही कोणताही ब्राऊझर वापरू शकता. पण मोबाईल बँकिंग अ‍ॅपच्या मदतीने वापरली जाऊ शकतात. त्यासाठी अ‍ॅड्रॉइड (Android) किंवा आयओएस (iOS) डिव्हाईसवरून बँकेचे योग्य अ‍ॅप डाउनलोड करावे लागेल.

ऑनलाईन बँकिंग आणि मोबाईल बँकिंग खाते उघडणे

इंटरनेट बँकिंगमध्ये तुमच्या बँकेच्या ऑनलाईन बँकिंग पोर्टलवर लॉग इन करण्यासाठी तुमच्याकडे आधीपासूनच एक युजरनेम आणि पासवर्ड असू शकतो. तसेच, तुमची ऑनलाईन बँकिंग क्रेडेन्शियल्स तुमच्या बँकेच्या मोबाईल अ‍ॅपवर लॉग-इन करण्यासाठी वापरली जाऊ शकत नाहीत. तुम्हाला मोबाईल बँकिंगसाठी स्वतंत्रपणे अर्ज करावा लागेल. त्यानंतर तुमची बँक तुम्हाला त्यासाठी पासवर्ड पाठवेल. बर्‍याच बँका ऑनलाईन बँकिंग पोर्टलद्वारे मोबाईल बँकिंगसाठी अर्ज करण्याची परवानगी देतात.

पुश सूचना (Push Notifications)

push-notification.png

दोघांमधील शेवटचा महत्त्वाचा फरक म्हणजे पुश सूचना. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर वापरत असलेल्या इतर अ‍ॅपप्रमाणे, मोबाईल बँकिंग अ‍ॅप देखील पुश सूचना (Push Notification) पाठवते. यापैकी बर्‍याच सूचनांमध्ये वापरकर्त्यांसाठी डील, सवलती आणि विशेष म्हणजे इव्हेंट किंवा कोणत्याही संदेशाबद्दल इशारा देणाऱ्या असतात. त्यामुळे, या ऑफर मिळविण्यासाठी तुम्हाला अ‍ॅपमध्ये लॉग इन करण्याची आवश्यकता नाही.

हे आहेत मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंग मधील फरक. दोन्हीचा वापर करून तुम्ही बँकेची कामे सुलभपणे करू शकता.