बँकेमध्ये न जाता इंटरनेटच्या मदतीने ज्या बँकिंग सेवांचा वापर केला जातो, त्या सेवांना इंटरनेट बँकिंग (Internet Banking) असं म्हणतात. इंटरनेट बॅंकिंगद्वारे तुम्ही घरबसल्या बँकेचे व्यवहार करू शकता. बँक खात्यात किती रक्कम जमा आहे. तसेच मागील काही व्यवहार पाहायचे असतील, तर तुम्ही ऑनलाईन पाहू शकता. ऑनलाईन पैशांची देवाणघेवाण (Online Transfer) करू शकता, तसेच अशाप्रकारची अनेक कामे जलद गतीने आणि कमी वेळेत करू शकता. लॅपटॉप, स्मार्टफोन किंवा संगणकासह कोणत्याही डिव्हाईसवरून इंटरनेट बँकिंग करता येते. ऑनलाईन बँकिंगचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे ऑफिस, घर किंवा कोणत्याही ठिकाणाहून तुम्ही या सेवांचा वापर करू शकता. या सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकाने सर्वप्रथम बँकेकडून ई-बँकिंग सेवा (E-Banking Service) सुरू करून घेणं आवश्यक आहे.
ऑनलाईन पैसे ट्रान्स्फर करण्याचे पर्याय
एनईएफटी (NEFT), आरटीजीएस (RTGS), आयएमपीएस (IMPS) आणि युपीआय (UPI) चा वापर करून एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात (Bank Account) पैसे ट्रान्स्फर करू शकता. आयएमपीएसद्वारे, कधीही म्हणजे 24/7 पैसे ट्रान्स्फर करू शकतो. पण आरटीजीएस (RTGS) आणि एनईएफटी (NEFT) ने पैसे केवळ आठवड्यातील कामकाजाच्या दिवसात आणि कामकाजाच्या तासांमध्येच पाठवले जाऊ शकतात. NEFT, RTGS आणि IMPS व्यतिरिक्त यूपीआयमार्फत सुद्धा पैसे ट्रान्स्फर करू शकतो. एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे पाठवण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही आहे.
ई-बँकिंगचा (E-Banking) वापर कसा करायचा?
इंटरनेट बँकिंगसाठी बँकेची ऑनलाईन सेवा सुरू करून घेणं गरजेचे आहे. तसेच ही सेवा वापरण्यासाठी संबंधित खातेधारकाचे वय 18 वर्ष पूर्ण हवे.
1. बँकेत जाऊन अर्ज देऊन नेट बँकिंग सेवा सुरू करू शकता.
2. नेट बँकिंग मध्ये लॉगिंन करण्यासाठी बॅंकेकडून युजरनेम (Username) आणि पासवर्ड (Password) दिले जाते.
3. बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन युजरनेम आणि पासवर्डचा वापर करून नेट बँकिंग (Net Banking) किंवा ई-बॅंकिंग (E-Banking) सुरू करू शकता.
इंटरनेट बँकिंगचे फायदे
- इंटरनेट बँकिंगचा वापर वर्षाचे 365 दिवस आणि 24 तास करू शकता.
- बँकेत न जाता घरबसल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरच्या मदतीने ई-बँकिंगचा वापर करू शकतो.
- इंटरनेट बँकिंगच्या मदतीने बिल पेमेंट, इलेक्ट्रिसिटी बिल, पैसे ट्रान्स्फर करणे इत्यादी गोष्टी घरातून किंवा कुठूनही करू शकतो.
- सुट्टीच्या दिवशीही बँकेचे व्यवहार पाहू शकतो. पैसे ट्रान्सफर करून शकतो.
- इंटरनेट बँकिंगच्या मदतीने बँकेत न जाता ऑनलाईन पासबुक, चेकबूक, डेबिट कार्ड व क्रेडिट कार्डसाठी ऑनलाईन अॅप्लाय करू शकता.
- बॅकेच्या व्यवहारांचे स्टेटमेंट पाहून शकता. ते स्टेटमेंट डाऊनलोड करू शकता.
- इंटरनेट बँकिंगच्या मदतीने FD, RD सारखे खाते उघडू शकता.
- बिल भरताना किंवा पेमेंट करताना काही अडचण आल्यास त्याची ऑनलाईन तक्रार करू शकतो.