सिक्युरिटीज अँण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने इनिशियल पब्लिक ऑफर (IPO) साठी अर्ज करण्यासाठी आणि युपीआय (Unifies Payment Interface) द्वारे पेमेंट करण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. त्याबरोबरच सेबीने ग्रुप ऑफ सेल्फ-सर्टिफाइड बँक्स (SCSBs) द्वारे अनब्लॉक केलेल्या ASBA अर्जांचा डेटा मिळवण्यासाठी नवीन प्रारूप तयार केले आहे.
सेबीचे नवीन प्रारूप सादर
सेबीने एका परिपत्रकाद्वारे म्हटले आहे की, एससीएसबी (SCSB) च्या कार्यप्रणालीचा आढावा घेतल्यानंतर आणि ठराविक वेळेत अर्जासोबत दिलेल्या रकमेवरील स्थगिती काढून टाकण्यासाठी हे नवीन प्रारूप आणले गेले आहे. बाजारातील मध्यस्थांकडून आलेल्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रक्रिया शुल्काचा दावा केल्यानंतर अर्जाची रक्कम देण्यास उशिर झाल्यास नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे.
एसएमएस अलर्ट पाठवावा लागणार
एससीएसबी (SCSB) ने परिपत्रकातील तरतुदींचे पालन केले नाही तर त्यांच्याविरुद्ध सिक्युरिटीज कायद्यान्वये कारवाई केली जाईल, असे सेबीने स्पष्ट केले आहे. तसेच आयपीओसाठी पात्र असलेल्या गुंतवणूकदारांना एससीएसबी/युपीआय (SCSB/UPI) अॅप्स एसएमएस अलर्ट (SMS Alert) पाठवतील. तसेच ईमेल वर बिल पाठवू शकतात. ज्यात युपीआयद्वारे पेमेंट करण्याची माहिती दिलेली असेल.
गुंतवणूकदाराला एसएमएसद्वारे जी माहिती दिली जाणार आहे; त्यात आयपीओचे नाव, अर्जाची रक्कम आणि रक्कम गोठवलेली तारीख इत्यादींचा समावेश असून हे नियम तात्काळ लागू करण्यात आले आहेत.