Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

स्वस्तात लॅपटॉप शोधताय? मग हे जरूर वाचा!

स्वस्तात लॅपटॉप शोधताय? मग हे जरूर वाचा!

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ऑफिस वर्क कल्चरमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. आता बरेच कर्मचारी घरातूनच कंपनीचे काम करत आहेत. यासाठी लॅपटॉप (Laptop) किंवा डेस्कटॉप (Desktop) गरजेचा आहे. तुम्हीही वर्क फ्रॉम होमसाठी लॅपटॉप विकत घेण्याचा विचार करत असाल ही माहिती जरूर वाचा.

कोरोना महामारीमुळे सगळं जग थांबलं होतं. त्यावेळी बरीचशी खासगी ऑफिसेसमधील कर्मचारी वर्क फ्रॉम होम करता होती. तसेच सगळ्या शाळा आणि महाविद्यालयेही ऑनलाईन सुरु होती. या काळात लॅपटॉपची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. आताही लॉकडाऊन संपल्यानंतर वर्क फ्रॉम होमचं कल्चर सुरूच आहेत. काही मुलांचे क्लासेस ऑनलाईन सुरू आहेत. यासाठी स्वस्त आणि मस्त लॅपटॉप निवडणं गरजेचं आहे. तुमची ही गरज लक्षात घेऊन आम्ही तुमच्यासाठी लॅपटॉप विकत घेताना कोणत्या गोष्टी पाहणे आवश्यक आहे, हे सांगणार आहोत.

लॅपटॉप घेताना अनेक जणांचा गोंधळ होतो. कारण बऱ्याच जणांना किरकोळ कामांसाठी लॅपटॉची गरज लागते. त्यासाठी खूप महागडा लॅपटॉप घेण्याची गरज नसते. पण याची माहिती नसल्याने विनाकारण अधिक किमतीची वस्तू घेतली जाते. जर तुम्हाला लॅपटॉपवर अत्यंत बेसिकी कामे करायची असतील तर फार महाग लॅपटॉप घेऊन उपयोग नाही. तुम्हाला नेट सर्फिंग, मायक्रोसॉफ्ट ऑफिस (वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट), व्हिडिओ मिटिंगसाठी गुगल मीट किंवा झूम, यासारख्या बेसिक गोष्टी लागत असतील तर कमी प्रोसेसिंग पॉवर असणारे लॅपटॉप तुमच्यासाठी योग्य आहेत. त्यासाठी हाय प्रोसेसिंग पॉवरचा लॅपटॉप घेणे गरजेचे नाही. 

तसेच दुकानात जाऊन लॅपटॉप खरेदी कारण्यापेक्षा ऑनलाईन खरेदी करून तुम्ही वेगवेगळ्या ऑफरमधून सूट मिळवू शकता. फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनसारख्या शॉपिंग अ‍ॅपवर खरेदी केल्यास सुमारे 20 ते 25 टक्के सूट मिळू शकते. अनेक लॅपटॉप कंपन्यांनी सध्या कमी किमतीचे, सर्वांना परवडतील असे 15 हजार रूपयांपासूनचे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.    यात आसूस (ASUS), लिनोवा (LENOVO), आयबॉल (iball) या कंपन्यांचे लॅपटॉप स्वस्त दारात उपलब्ध आहेत.

कमी किमतीतील काही लॅपटॉप आपण पाहू

ASUS CHROMOBOOK  
हा लॅपटॉप 14 इंचाचा असून याची किंमत 19,990 आहे.

LENOVO IDEAPAD3
हा लॅपटॉप 11.6 इंचाचा असून याची किंमत 15,990 आहे.

iball Compbook
cambook  प्रकारामध्ये 3 प्रकारचे लॅपटॉप येतात ते 17 ते 20 हजार रुपयांमध्ये मिळतील.

Avita  satus
हा लॅपटॉप 14.1 इंचाचा असून याची किंमत 21,990 आहे.

ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर वरीलप्रमाणे स्वस्तातील लॅपटॉपचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. फक्त ते घेताना तुमची गरज ओळखून त्यानुसार ते विकत घ्यावेत.