सध्या गणपतीची धूम सर्वत्र पाहायला मिळतेय. सर्वत्र भक्तिमय वातावरण पाहायला मिळतंय. मंडळात विराजमान झालेल्या गणरायांच्या चरणी दानाचा पाऊस पडतोय. मात्र आता तुमच्याजवळ खिशात चेकबुक किंवा कॅश नसल्यासही तुम्हाला दान करायचं असल्यास पेटीएमने तुम्हाला एक जबरदस्त पर्याय उपलब्ध करून दिला आहे. वन 97 कम्युनिकेशन्सने मुंबईतल्या 14 गणेशोत्सव मंडळांबरोबर करार केला आहे. याअंतर्गत गणेशभक्ताना दान द्यायचं झाल्यास त्यांना आता फक्त एक क्युआर कोड स्कॅन करायचा आहे आणि आपल्याला जे दान द्यायचं आहे तो आकडा टाकायचा आहे. म्हणजे थेट त्या मंडळांच्या बँकेत ती रक्कम जमा होईल.
कोणत्या गणेश मंडळांशी केला गेलाय करार?
प्रभादेवीचं सिद्धिविनायक मंदिर,गिरगावचा महाराजा, लालबागचा तेजूकाया मंडळाचा गणपती, अंधेरीचा राजा, मरोळचा राजा, खेतवाडीचा राजा, परळचा इच्छापूर्ती, लोअर परेल येथील फ्रेण्ड सर्कल मंडळ, लालबाग येथील बालयुवक मित्र मंडळ, लोअर परेल जंक्शन येथील बालसाथी मंडळ, चेंबूर येथील सह्याद्री गणपती, पवई येथील पवईचा राजा, कांदिवली येथील महावीर नगर आणि ठाणे येथील ठाण्याचा महाराजा अशा गणेश मंडळांचा समावेश आहे.
मिठाईची दुकानं आणि हॉटेल्सनाही केलं करारबद्ध
पेटीएमने या प्रसंगाच औचित्य साधत मिठाईची दुकानं आणि हॉटेल्सनाही यात ऑनबोर्ड केलं आहे. पेटीएम वापरकर्त्यांना पेटीएम पोस्टपेडच्या माध्यमातून पेमेंट केल्यास 1000 रूपयाच्या बिलवर 50 रूपये कॅशबॅक आणि पेटीएम वॉलेटच्या माध्यमातून पेमेंट केल्यास 5 टक्के म्हणजेच जवळपास 100 रूपयांची कॅशबॅक मिळू शकते.
गणेशोत्सवानिमित्त देशांतर्गत विमानप्रवासांवरही मिळणार सूट
पेटीएमने याशिवाय गणपती उत्सवासाठी एक खास ऑफरही आणली आहे. या ऑफरद्वारे सर्व देशांतर्गत विमानांच्या तिकीट बुकींगवर पेटीएमने एक हजार रुपयांची सूटही जाहीर केली आहे. विमानप्रवासाची तिकीट बुक करताना प्रवाशांना फक्त FLYUTSAV हा प्रोमो कोड वापरवा लागणार आहे. यात इंडिगो, एअर एशिया, आकासा, स्पाइसजेट, विस्तारा व एअर इंडिया अशा फ्लाईटसचा समावेश आहे.