आजच्या दिवसातील कच्च्या तेलाचे दर काय?
गेल्या सहा दिवसापासून कच्च्या तेलाचे दर(crude oil rate) घसरले होते मात्र आज(13 डिसेंबर) कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली आहे. आज 3 टक्क्यांनी तेलाचे दर वाढून 78 डॉलर पार पोहचले आहे तर ब्रेंटचा भाव 79 डॉलरनी पार झाला आहे. फक्त दोन दिवसामध्ये ब्रेंट 4 टक्क्यांनी वाढले आहे. WTI (West Texas Intermediate) चा भाव 74 डॉलरने पार झाला आहे. केवळ 2 दिवसात WTI (West Texas Intermediate) मध्ये 3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी भारतीय सराफा बाजारात(MCX) कच्च्या तेलाच्या किंमती 6150 रुपयांनी वाढून 2 दिवसात 5 टक्क्यांपर्यत पोहचल्या आहे.
कच्च्या तेलाच्या किमती वाढण्यामागील प्रमुख कारणे
कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची कारणे पाहिली तर लक्षात येईल की, कॅनडा अमेरिकेला कीस्टोनमार्फत कच्च्या तेलाचा पुरवठा करते. 8 डिसेंबर पासून कीस्टोन पाईपलाईनमधून तेलाचा पुरवठा बंद झाला आहे. हा पुरवठा आजतागायत सुरु झालेला नाही. या दरम्यान चीन सरकारने कोरोना निर्बंध शिथिल केल्याने तेलाची मागणी वाढण्याची शक्यता आहे.
कच्च्या तेलाच्या किमतीतील हालचाली
ब्रेंटच्या हालचालीवर नजर टाकल्यास, कच्च्या तेलाच्या दरात एका आठवड्यात 0.44 टक्क्यांनी तर 1 महिन्यात 14 टक्क्यांनी घट झाली आहे. त्याचवेळी 1 वर्षात 7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आपण WTI(West Texas Intermediate) कच्च्या तेलाच्या हालचालीवर नजर टाकली तर, कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये एका आठवड्यात 0.47 टक्के इतकी तर 1 महिन्यात 13 टक्क्यांनी घट झाली आहे. त्याचवेळी 1 वर्षाच्या आढाव्यात 5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याउलट जर आपण भारतीय सराफा बाजरात(MCX) कच्च्या तेलाच्या हालचाली पाहिल्या तर एका आठवड्यात 4 टक्क्यांनी वाढ झाली असून, एका महिन्यात 7 टक्क्यांनी घट झाली आहे व 1 वर्षात 9 टक्क्यांनी वाढ झाल्याची पाहायला मिळत आहे.