Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Phishing Cyber Fraud: फिशिंग म्हणजे काय? हॅकर्स ऑनलाईन फसवणूक कशी करतात?

what is phising fraud

फिशिंग हा एक सायबर गुन्ह्याचा प्रकार आहे ज्याद्वारे तुमची गोपनीय माहिती चोरली जाऊ शकते. संवेदनशील माहिती चोरून तुमचे बँक अकाऊंटही खाली होऊ शकते. यापासून तुम्ही स्वत:चा कसा बचाव करू शकता, याबाबत माहिती जाणून घ्या.

फिशिंग हा एक सायबर गुन्ह्याचा प्रकार आहे ज्याद्वारे तुमची गोपनीय माहिती चोरली जाऊ शकते. संवेदनशील माहिती चोरून तुमचे बँक अकाऊंटही खाली होऊ शकते. त्यामुळे हॅकर्सद्वारे फिशिंग कशा पद्धतीने केली जाते. यापासून तुम्ही स्वत:चा कसा बचाव करू शकता, याबाबत माहिती जाणून घ्या. तुमची क्रेडिट कार्ड, मोबाईल नंबर, इमेल खाते, बँक खाते याबाबतची माहिती हॅकर्स काढून घेतात. यासाठी हॅकर्सकडून बनावट मेल, संदेश, बेवबाईट आणि लिंक्सचा वापर केला जातो. वरवर पाहता तुम्हाला वेबसाई, मेल, मेसेज खरे वाटू शकतात. मात्र, ते खरे नसतात. या बनावट लिंक्सद्वारे तुमची माहिती चोरली जाते.  

फिशिंग हा सायबर गुन्हा हॅकर्सकडून अत्यंत शिताफीने केला जातो. समजा, तुमचे बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे, आणि तुम्ही ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी आयडी आणि पासवर्डने लॉगइन करता. मात्र, हॅकर्स हुबेहूब एसबीआयची बनावट वेबसाईट तयार करतात. तुम्ही इंटरनेटवर प्रत्येक वेळी वेबसाईटचा युआरएल चेक करालच असे नाही. अशा बनावट वेबसाइटद्वारे तुम्ही लॉनइन करण्याचा प्रयत्न केला तर तुमचे लॉगइन क्रेडेंशियल्स चोरले जातात. त्याद्वारे तुमच्या खात्यातून हॅकर्स पैसे काढून घेऊ शकतात.

इमेल फिशिंग

या पद्धतीमध्ये अनेकांना बनावट इमेल पाठवले जातात. यामध्ये तुमचे बँक खाते अद्ययावत किंवा रिन्यू करण्यास सांगितले जाते. मात्र, यामध्ये दिलेली लिंक बनावट असते. तुम्हला हा मेल बँकेचा खरा वाटू शकतो. इमेल अॅड्रेसही ओरिजनल वाटू शकतो. जर तुम्ही या लिंकवर क्लिक करून माहिती अपडेट केली तर तुमचे बँकेचे खाते खाली होऊ शकते. यापासून वाचण्यासाठी तुम्हाला येणारे मेल आयडी तपासून पाहा. मेल अॅड्रेसमधील कंपनीच्या नावाचे स्पेलिंग .com, org, in, io असे डोमेन नेम कधीकधी हॅकर्सकडून काढले जातात, किंवा अॅड केले जातात. मात्र, हे छोटेछोटे बदल ग्राहकांच्या लक्षात येत नाहीत. त्यामुळे फसवणूक होते.

लिंकवर किंवा इमेजवर क्लिक करू नका

तुम्हाला आलेल्या मेल  मेसेजमधील कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. मजकुराची खात्री केल्यानंतरच पुढील कृती करा. बऱ्याच वेळा मेलद्वारे ग्राहकाला धमकावले जाते, किंवा जॉब ऑफर, डिस्काऊंट, अकाऊंट बंद करण्याबाबतची माहिती दिली जाते. मात्र, हे सर्व बनावट मेल मेसेज असतात. यावर तुम्ही क्लिक केले तर तुमची संवेदनशील माहिती चोरी होऊ शकते.

या गोष्टी करू नका

1)सार्वजनिक वायफायचा अॅक्सेस घेवू नका, त्याद्वारे माहिती चोरी होऊ शकते. 
2)ऑनलाइन जाहिरातीचे बॅनर आणि वेबसाइटवर पॉप-अप होणाऱ्या संदेशावर क्लिक करू नका
3)वैयक्तिक मेल आणि उद्योग, नोकरी, व्यवसायाबाबतचे मेल माहिती सार्वजनिक करू नका.
4)फेक जॉबचे कॉल्स आणि मेल्सला प्रतिसाद देऊ नका. फेक जॉब पोर्टल्सची संख्या वाढत आहे.
5)बनावट वेबसाइट ओळखण्यासाठी वेबसाइटचे कनेक्शन सिक्युअर आहे की नाही ते आधी तपासा