Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Market Scam: NSE को-लोकेशन स्कॅम काय आहे?

NSE Co-Location Scam

Image Source : www.cnbctv18.com

NSE Co-Location Scam: भारतीय शेअर मार्केटमध्ये आपण अनेक स्कॅम्स बघितले आहेत. पण एखादीच संस्था जी लोकांचे हित साधण्याचे काम करत असेल आणि तिच घोटाळा करत असेल तर काय?

भारतीय शेअर मार्केटमध्ये आपण अनेक स्कॅम्स बघितले आहेत. अनेक स्कॅम्स बद्दलची माहिती व ते घडले कसे हे देखील आपण पाहिले. या सर्व घोटाळ्यांमध्ये घोटाळे करणाऱ्यांनी लोकांना फसवून व त्यांचा विश्वासघात करून त्यांना लुटल्याचं साम्य दिसून येते. सामान्य लोकांच्या भावनांचा फायदा उचलणे व त्यांचा विश्वासघात करणे सोपे असल्याने आजवर इतके घोटाळे झाले. अशावेळी आपण विचार करतो की जर लोकांना फसवणे सोपे आहे; तर मग उच्च अधिकार असणाऱ्या संस्थांचे काय? त्यांना फसवणे देखील सोपे आहे का? त्या कठोर पाऊलं का उचलत नाहीत. घोटाळे होत असताना ते केवळ लोकांसोबतच नव्हे तर मोठमोठ्या संस्थांसोबत देखील होतात. ज्यात संस्था आणि गुंतवणूकदार या दोघांना समान फटका बसतो. तर आज आपण अशाच एका घोटाळ्याबद्दल (Market Scam) जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊयात काय आहे, एनएसई को-लोकेशन स्कॅम? (NSE Co-Location Scam?)

को-लोकेशन (Co-Location) म्हणजे काय?

NSE को-लोकेशन स्कॅम समजून घेण्यापूर्वी को-लोकेशन म्हणजे काय? (What is Co-Location?) हे समजणे महत्त्वाचे आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदार शेअर्स खरेदी करण्यासाठी किंवा विकण्यासाठी ऑर्डर्स जनरेट करतात. ज्या एक्सचेंजकडे दिल्या जातात. स्टॉक एक्सचेंजकडे येणाऱ्या या लाखो-करोडो ऑर्डर्स त्याच क्षणात एक्झिक्यूट करण्यासाठी व सर्व कामकाज सुरळीत व विनाअडथळा चालू ठेण्यासाठी मोठमोठे सर्व्हर्स या स्टॉक एक्सचेंजमध्ये असतात. स्टॉक एक्सचेंजच्या इमारतींमध्ये काही जागा या अशा सर्व्हरसाठी (Server) राखीव ठेवलेल्या असतात. त्या जागेच्या बाजूला असलेली जागा हाय-फ्रिक्वेंस (High-frequency) आणि अल्गो ट्रेडर्सना (Algo traders) ट्रेडिंगसाठी दिली जाते, यालाच को-लोकेशन असे म्हटले जाते. 


को-लोकेशन फॅसिलिटी, स्टोक एक्सचेंज सर्व्हरच्या अगदी जवळ असल्याने त्यांना ट्रेडिंग दरम्यान ऑर्डर एक्झिक्यूट करण्यासाठी लागणाऱ्या वेळेत फायदा मिळतो. कॉ-लोकेशनमधील ट्रेडर्स हे साधारणतः ब्रोकरेज कंपन्या व ट्रेडिंग सुविधा पुरविणाऱ्या कंपन्या असतात. त्यामुळे किरकोळ ट्रेडर्सना कॉ-लोकेशनचा हा फायदा उचलता येत नाही. 

10 वर्षांपूर्वी घडलेल्या या NSE को-लोकेशन स्कॅममध्ये को-लोकेशनचा गैरफायदा उचलून अनेक घोटाळे करण्यात आले. OPG सिक्युरिटीज हे नॅशनल स्टॉक एक्सचेंज (National Stock Exchange-NSE)मधील ट्रेडिंग मेंबर्स होते. ज्यांनी NSEच्या सर्व्हर्सच्या कनेक्टिव्हिटीचा गैरफायदा उचलून सर्व्हरमधील माहिती इतर कॉ-लोकेशन मेंबर्सच्या आधी मिळवली होती. 2012 ते 2014 दरम्यान सुरु असलेल्या या घोटाळ्यामुळे ट्रेडर्सना स्वतःच्या ऑर्डर्स इतर ट्रेडर्सच्या ऑर्डर्स एक्झिक्यूट होण्याआधी एक्झिक्यूट करणे शक्य होते.

NSE को-लोकेशन स्कॅम घडला कसा?

सेबीने केलेल्या चौकशीनुसार या ब्रोकर्सना NSE मधील काही कर्मचाऱ्यांनी मदत केली होती. त्यामुळेच या ब्रोकर्सना सर्व्हरमध्ये सर्वात प्रथम कनेक्ट होणे सलग दोन वर्ष शक्या होत होते. 2019 मध्ये सेबीने या घोटाळ्यामध्ये सहभागी असलेल्या अनेक NSE कर्मचाऱ्यांना अटक केली.

2015 मध्ये सेबीकडे आलेल्या तक्रारीत सर्व्हरच्या गैरवापराचा व या संपूर्ण घोटाळ्याचा उलघडा केलेला होता. त्यानंतर जेव्हा Moneylife या कंपनीने घोटाळा उघडकीस आणला. तेव्हा NSEने त्यावर नकार देत 100 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला. त्यानंतर जेव्हा हा खटला मुंबई हाय कोर्टात (Bombay High Court) गेला तेव्हा NSEला हार मानून 50 लाखांचा दंड भरावा लागला. NSE मधील या स्कॅममुळे सामान्य ट्रेडर्सना कसलाही फटका तर बसला नाही. पण OPG सिक्युरिटीजने 15.7 कोटी रुपयांचा नफा चुकीच्या मार्गाने मिळवला. 

यातून शिकायला काय मिळाले? 

किरकोळ गुंतवणूकदार आणि व्यापारी हे सहसा को-लोकेशनमध्ये सहभागी होत नाहीत. त्यामुळे या घोटाळ्याचा कोणताही परिणाम त्यांच्यावर झाला नाही. पण NSEला या घोटाळ्याचा मोठा फटका बसला. या फटक्यातून शिकवण घेत NSEने एप्रिल 2014 पासून को-लोकेशन सुविधेतील ऑर्डर एक्‍झिक्यूशन प्रोटोकॉल मल्टिकास्ट TBT मध्ये बदल आणले. अशाप्रकारे काहींना सिस्टीमसोबत खेळण्याची परवानगी देणारी त्रुटी दूर करण्यात आली. हा संपूर्ण घोटाळा देशाच्या प्रीमियर एक्सचेंजमधील प्रशासन आणि प्रणालीतील त्रुटींबद्दल प्रश्न उपस्थित करतो. गेल्या चार वर्षांपासून या त्रुटी दूर करण्यासाठी सेबी अनेक नियमांमध्ये बदल करत आहे.