Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

What is SEBI: सेबी म्हणजे काय? सेबीचे कार्य कसे चालते?

Securities and Exchange Board of India-SEBI

SEBI ही भारतातील सिक्युरिटीज मार्केटचे नियमन करण्यासाठी आणि सिक्युरिटीजमधील गुंतवणूकदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी सरकारने स्थापन केलेली वैधानिक नियामक संस्था (Statutory Regulatory Body) आहे.

सेबी (SEBI) या शब्दाचा इंग्रजीतील फुलफॉर्म सिक्युरिटीज् अॅण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (Securities and Exchange Board of India-SEBI) असा आहे. तर याला अस्खलित मराठीत भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ किंवा भांडवली बाजार नियामक संस्था किंवा सेबी असं देखील म्हटलं जातं. SEBI ही भारतातील सिक्युरिटीज मार्केटचे नियमन करण्यासाठी आणि सिक्युरिटीजमधील गुंतवणूकदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी सरकारने स्थापन केलेली वैधानिक नियामक संस्था (Statutory Regulatory Body) आहे. सेबी ही संस्था भारतातील शेअर मार्केट, म्युच्युअल फंड (Share Market & Mutual Fund) आदी संस्थांच्या कार्याचे नियमन देखील करते.

SEBI चे कार्य काय आहे? (Functions of SEBI)

सेबी (Securities and Exchange Board of India) ही भारतातील सिक्युरिटीज मार्केटचे नियमन करण्यासाठी आणि सिक्युरिटीजमधील गुंतवणूकदारांच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी भारत सरकारने 1992 मध्ये स्थापन केलेली वैधानिक नियामक संस्था आहे. ही संस्था नियमनाबरोबरच गुंतवणुकीशी संबंधित संस्थांसाठी नियम आणि मार्गदर्शक तत्त्वं सुद्धा तयार करते. मुळात सेबीचा मुख्य उद्देश गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे हा आहे. सेबीचे मुख्य कार्यालय वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई (SEBI Main Branch at Mumbai) येथे आहे. तसेच नवी दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि अहमदाबाद या शहरांमध्ये प्रादेशिक कार्यालये (Regional Offices) आहेत. तर बंगळुरू, जयपूर, गुवाहाटी, पाटणा, कोची आणि चंदीगडसह आणखी इतर शहरांमध्ये स्थानिक कार्यालये (Local Offices) आहेत.

सेबी शेअर मार्केटमधील वेगवेगळ्या खात्यांची पुस्तके तपासणे आणि स्टॉक एक्सचेंजच्या नियमांना मंजूर करणे, बँकेसारख्या आर्थिक मध्यस्थांच्या पुस्तकांची तपासणी करणे, कंपन्यांचे आयपीओ मान्य करणे, त्यांना परवानगी देणे आदी कामांचे नियमन करण्याचा आणि ती पार पाडण्याचा अधिकार सेबीला आहे.

SEBI ची स्थापना का करण्यात आली? (Establishment of SEBI)

वेगवेगळ्या प्रकारच्या गैरप्रकारांपासून गुंतवणूकदारांचे संरक्षण करण्यासाठी आणि गैरप्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सेबीची स्थापना करण्यात आली. प्रामुख्याने खाली दिलेल्या तीन गटातील लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना नियंत्रित करण्यासाठी सेबी सारख्या संस्थेची स्थापना करण्यात आली.

इश्युअर्स (Issuers) : SEBI गुंतवणूकदारांना एक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दिशेने काम करते. जिथे ते त्यांच्या पूर्ण कार्यक्षमतेने आणि प्रामाणिकपणे त्यांचा निधी उभारू शकतात.

मध्यस्थ (Intermediaries) : SEBI मध्यस्थांना व्यावसायिक आणि स्पर्धात्मक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे काम करते.

गुंतवणूकदार (Investors) : SEBI गुंतवणूकदारांना अचूक माहिती देण्याचे काम करते.


सेबीची उद्दिष्टे (Objectives of SEBI)

मार्केटमध्ये गुंतलेल्या किंवा सहभागी झालेल्या सर्व घटकांचे रक्षण करणे. त्यांना त्यांचे काम प्रमाणिक पार पाडण्यात मदत करणे. हे सेबीचे मूलभूत उद्दिष्ट आहे. सेबी शेअर मार्केटमधील कामकाजावरही नियंत्रण ठेवते.

  • गुंतवणूकदारांच्या हक्कांचे रक्षण करणे
  • नियम तयार करून ते पाळण्यासाठी आग्रही राहणे
  • मार्केटमधील गैरप्रकारांना आळा घालणे
  • दलाल, अंडररायटर आणि इतर मध्यस्थांसाठी आचारसंहिता तयार करणे


SEBI कायदा आणि SEBI मार्गदर्शक तत्त्वे

1988 मध्ये, SEBI ची स्थापना शेअर मार्केटमधील व्यवहारांवर देखरेख ठेवण्यासाठी करण्यात आली. 1922 च्या SEBI कायद्याने SEBI ला स्वतंत्र अधिकारक्षेत्र असलेली वैधानिक संस्था म्हणून दर्जा देण्यात आला. या कायद्यांतर्गत सेबीला भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या नियमांची देखरेख आणि सक्रियपणे अंमलबजावणी करण्याचा अधिकार देण्यात आला.

सेबीचे अधिकार काय आहेत? (Powers of SEBI)

शेअर मार्केटमधील व्यवहारांवर देखरेख ठेवणे, त्यांच्या नियमांना मंजूरी देणे. मार्केटमधील कंपन्यांकडून नियतकालिक अहवाल व विवरण पत्रे मागविणे. त्यांच्या खात्यांची तपासणी करणे. आर्थिक मध्यस्थांच्या पुस्तकांची तपासणी करणे, आदी अधिकार सेबीला आहेत. सेबीला तिच्या अधिकारांतर्गत नियम आणि कायदे तयार करण्याचा सुद्धा अधिकार आहे. तसेच एखाद्या कंपनीकडून गैरप्रकार झाल्यास त्या कंपनीला सेबी दंड सुद्धा लागू करू शकते. सेबीचा कारभार संचालक मंडळाद्वारे चालविला जाते. ज्यात संसदेद्वारे निवडले जाणारे अध्यक्ष, तज्ज्ञ व अनुभवी पू्र्णवेळ सदस्य, केंद्रीय फायनान्स डिपार्टमेंटचे 2 अधिकारी, आरबीआयचा एक सदस्य आणि संसदेद्वारे निवडलेले पाच सदस्य यांचा समावेश असतो.