• 04 Oct, 2023 11:19

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ITR-7 फॉर्म म्हणजे काय आणि हा फॉर्म कसा भरायचा?

ITR FORM  income tax

आयटीआर-7 हा फॉर्म अशा कंपन्यांना लागू होतो. ज्या कंपन्या त्यांचे उत्पन्न धार्मिक कार्यासाठी किंवा धर्मादाय हेतूसाठी वापरते. याशिवाय संपूर्ण किंवा काही प्रकरणात कायदेशीर किंवा ट्रस्टच्या अंतर्गत असलेल्या मालमत्ताही याच श्रेणीत येतात.

आयटीआर-7 हा फॉर्म अशा कंपन्यांना लागू होतो. ज्या कंपन्या त्यांचे उत्पन्न धार्मिक कार्यासाठी किंवा धर्मादाय हेतूसाठी वापरते. याशिवाय संपूर्ण किंवा काही प्रकरणात कायदेशीर किंवा ट्रस्टच्या अंतर्गत असलेल्या मालमत्ताही याच श्रेणीत येतात.

ITR-7 फॉर्मसाठी काय पात्रता आहे?

आयटीआर-7 फॉर्म भरण्यासाठी वर नमूद केल्याव्यतिरिक्त खालील निकष पूर्ण करणाऱ्या संस्था/कंपन्या पात्र ठरतात.

  • न्यूज एजेंसी, विज्ञान संशोधन संस्था आणि इतर माध्यमातून कलम 139 (4C) अंतर्गत निधी मिळवणाऱ्य संस्था/कंपनी.
  • कलम 139 (4D) अंतर्गत संस्था, महाविद्यालये, युनिव्हर्सिटी किंवा ग्रामीण उद्योगातून उत्पन्न मिळवणाऱ्या संस्था.
  • ट्रस्ट अंतर्गत नोंदणीकृत मालमत्तेतून उत्पन्न मिळवणाऱ्या व्यक्ती.
  • कलम 10 (23A) आणि 10 (23B) अंतर्गत नमूद केलेल्या अशासकीय किंवा सरकारी शैक्षणिक संस्था.

ITR-7 फॉर्मची रचना कशी आहे?

आयटीआर-7 फॉर्म हा दोन भागांमध्ये विभागलेला आहे. पहिल्या भागात सर्वसाधारण माहिती तर दुसऱ्या भागात एकूण उत्पन्न आणि टॅक्सच्या नोंदी असतात. याव्यतिरिक्त 25 शेड्युल्सची माहिती सादर करावयची असते.

ITR-7 फॉर्म कोणी भरू नये?

ITR7 कलम 139 (4A), कलम 139 (4B), कलम 139 (4C), किंवा कलम 139 (4D) अंतर्गत सूटचा दावा करत नसलेल्या करदात्यांनी भरू नये.

ITR-7 कधी दाखल करावा?

आयटीआर-7 हा फॉर्म हा एखादा करदाता ट्रस्ट, कंपनी, फर्म, स्थानिक प्राधिकरण, असोसिएशन ऑफ पर्सन (AOP) किंवा आर्टिफिशियल ज्युडिशियल पर्सन म्हणून फाईल करू शकतो. तसेच कलम 139 (4A), कलम 139 (कलम 139), 4B), कलम 139 (4C) किंवा कलम 139 (4D) अंतर्गत सूटचा दावा करत असेल, तर तो ITR-7 फॉर्म दाखल करू शकतो.

ITR-7 फॉर्म भरण्याची अंतिम तारीख काय आहे?

ITR-7 फॉर्म अंतर्गत रिटर्न दाखल करणाऱ्या करदात्यांना, त्यांच्या खात्याचे ऑडिट करणे आवश्यक असेल तर त्यांच्यासाठी अंतिम तारीख 30 सप्टेंबर आहे. तर ज्यांना खात्यांचे ऑडिट करणे आवश्यक नाही, त्यांच्या अंतिम तारीख 31 जुलै आहे.

ITR-7 फॉर्मसह रिटर्न कसे भरायचे?

आयटीआर-7 खालील प्रकारे इन्कम टॅक्स विभागाकडे दाखल केले जाऊ शकते. एकतर डिजिटल सहीच्या सर्टीफिकेटचा वापर करून ई-फाईल पद्धतीने परतावा सादर करता येतो. तसेच रिटर्नमधील (ITR Return Filing) डेटा ट्रान्समिट करून आणि त्यानंतर आयटीआर रिटर्नची पडताळणी सबमिट करून दाखल करता येऊ शकतो.

रिटर्न भरल्यानंतर संबंधित करदात्याने आयटीआर व्हेरिफिकेशन (ITR V) फॉर्मच्या प्रिंट काढून त्यावर सही करून त्या पोस्टाने बंगळुरू येथील इन्कम टॅक्स विभागाच्या कार्यालयाकडे पाठवणे आवश्यक आहे.