Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इंडेक्स फंड म्हणजे काय? त्यात कशाप्रकारे गुंतवणूक कराल

Index Fund

Index Fund: इंडेक्स फंड्स तुमच्या पोर्टफोलिओत विविधता आणण्यासाठीही मदत करतात. त्यात स्थिरता आणतात. काही अभ्यासांनुसार, विशेषत: लाँग टर्ममध्ये बेंचमार्क निर्देशांक चांगलीच बाजी मारतात. त्यामुळे तुमच्या म्युच्युअल फंड हाऊसवर विश्वासाची समस्या असेल तर तुम्ही इंडेक्स फंडात गुंतवणुकीचा विचार केला पाहिजे. पहिल्यांदा गुंतवणूक करणारे लोक इक्विटीत प्रवेश करतानाही याचा विचार करू शकतात.

सेन्सेक्स, बीएसईमध्ये २०१७ पासून जो ३० स्टॉक मार्केट बॅरोमीटर आहे, या निर्देशांकाने ७६% वृद्धी अनुभवली. थोडक्यात सांगायचे म्हणजे, त्याने दरवर्षी १५% पेक्षा जास्त परतावे दिले आहेत. याच काळात लिस्टेड कंपन्यांनी दिलेल्या डिव्हिडंडपेक्षा हे प्रमाण जास्त आहे.  हा रिटर्न अग्रगण्य म्युच्युअल फंड्सपेक्षा जास्त आहे. मग इथे प्रश्न उभा राहतो की आपण इंडेक्स फंडमध्येच गुंतवणूक करणे सोयीस्कर ठरणार नाही का? असेल तर ते कसे?  

इंडेक्स फंड म्हणजे काय ?

नावाप्रमाणेच इंडेक्स फंड म्हणजे सेन्सेक्स, निफ्टी, बीएसई १०० इत्यादीसारख्या इंडेक्समध्ये केलेली गुंतवणूक होय. ते म्युच्युअल फंडांची कामगिरी मोजण्याकरिता त्या संदर्भाने वापरतात म्हणून त्यांना बेंचमार्क निर्देशांकही म्हणतात. त्यामुळे सेगमेंटनुसार म्युच्युअल फंड्सचे बॅरोमीटर असतील तेव्हा एखाद्याने त्यात का गुंतवू नये? याच कल्पनेवर इंडेक्स फंड उभे आहेत. हे फंड्स बाजार निर्देशांकात गुंतवणूक करतात आणि निर्देशांकाच्या सिक्युरिटीजमध्ये समान वाटा मिळवून त्यांच्या परफॉर्मन्सचे अनुकरण करतात.

पाश्चिमात्य अर्थव्यवस्थांमध्ये इंडेक्स फंड मागील वर्षात खूप लोकप्रिय झाले. लोअर डाऊन साइड रिस्कच्या तुलनेत ब्लूचिप स्टॉक्स हे सतत परतावे देतात, हे त्यामागील कारण आहे. त्यामुळे सक्रियपणे व्यवस्थापित केलेल्या म्युच्युअल फंड्सपेक्षा हे अव्यवस्थित फंड्स (उदा. इंडेक्स फंड) उत्तम कामगिरी करतात.

पोर्टफोलिओत विविधता आणण्यास फायदेशीर

इंडेक्स फंड्स तुमच्या पोर्टफोलिओत विविधता आणण्यासाठीही मदत करतात. त्यात स्थिरता आणतात. काही अभ्यासांनुसार, विशेषत: लाँग टर्ममध्ये बेंचमार्क निर्देशांक चांगलीच बाजी मारतात. त्यामुळे तुमच्या म्युच्युअल फंड हाऊसवर विश्वासाची समस्या असेल तर तुम्ही इंडेक्स फंडात गुंतवणुकीचा विचार केला पाहिजे. पहिल्यांदा गुंतवणूक करणारे लोक इक्विटीत प्रवेश करतानाही याचा विचार करू शकतात.

इंडेक्स फंड्स भारतात लोकप्रिय आहेत का?

इंडेक्स फंड्सना हवी तशी लोकप्रियता मिळालेली नाही. म्युच्युअल फंड कंपन्यांनी अनेक इंडेक्स फंड्स लॉंच केले. निर्देशांकात गुंतवणूक करणारे एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (ETFs) देखील आहेत. बँक निफ्टी तसेच मिडकॅप-स्मॉल कॅप आधारीत निर्देशांक (बीएसई व एनएसई) एक्सचेंज या पर्यायही आहे. पण हे करतानाच त्यातील अस्थिरता आणि जोखीमीचाही विचार केला पाहिजे.

चांगला इंडेक्स फंड कसा शोधायचा? (How to Find Right Index Fund)

कोणत्याही इंडेक्स फंडच्या कामगिरीचा अंदाज हा त्या इंडेक्सने दिलेल्या परताव्यांच्या आधारे काढता येतो. ट्रॅकिंग एरर- जी बेंचमार्क निर्देशांकातून फंडाच्या स्थानाचे विचलन प्रतिबिंबीत करते. ते निश्चित करण्यासही मदत करते. लोअर ट्रॅकिंग एरर असलेल्या इंडेक्स फंडाकडेच आपण आदर्श म्हणून पाहिले पाहिजे.

यासह, उपरोक्त फायद्यांव्यतिरिक्त, इंडेक्स फंड्समध्ये गुंतवणूक करण्याचे काही अतिरिक्त फायदे पुढीलप्रमाणे:

  • हे कमी जोखिमीचे व गुंतवणुकीसाठी कमी किंमतीचे असतात. 
  • सक्रियपणे व्यवस्थापित निधीच्या तुलनेत खर्चाचे प्रमाण निम्म्यापेक्षा कमी आहे.
  • लाँग-टर्म गुंतवणुकीत यातून उत्तम परिणाम मिळतात.
  • इतिहास बघितला तर इंडेक्स फंड्सनी सक्रियपणे व्यवस्थापित फंड्सच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे.

इंडेक्स फंडमध्ये गुंतवणूक कशी करायची?

अग्रेसर म्युच्युअल फंडांनी जारी केलेले इंडेक्स फंड आणि ईटीएफ तुम्ही तपासू शकता. सर्वात चांगल्या परताव्यासाठी आपल्या इंडेक्स फंडाने घेतलेल्या सगळ्या शुल्काकडे विशेष लक्ष द्या. यापैकी काही शुल्कांमध्ये एक्झिट लोड, मॅनेजमेंट फी इत्यादींचा समावेश होतो. इंडेक्स खरेदी करण्यासाठी तुम्ही म्युच्युअल फंड कंपनीच्या शाखेला भेट देऊ शकता किंवा कंपनीच्या वेबसाइटवरून तुम्ही खरेदी करू शकता. ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमचे डिमॅट अकाउंट आवश्यक आहे.