Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ॲक्टीव्ह इक्विटी म्युच्युअल फंड्सची निवड करताना या गोष्टी टाळा, होईल फायदा

Equity Mutual Fund

गुंतवणुकीची सर्व धोरणे (जरी त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड दीर्घकालीन यशस्वी असला) तरिही मापदंडाच्या विपरीत तात्पुरत्या कालावधीसाठी ढेपाळलेल्या कामगिरीतून जाणे क्रमप्राप्त ठरते.बऱ्याचदा अल्प कामगिरीचा कालावधी लांबू शकतो.

केवळ चालू कामगिरी लक्षात घेऊन ॲक्टीव्ह इक्विटी फंडची खरेदी आणि विक्री केल्याने सामान्यपणे अगदीच टुकार गुंतवणूक अनुभव मिळतो.शिवाय दीर्घकालीन परतावाही यथा-तथाच असतो असे दिसून आले आहे.ॲक्टीव्ह इक्विटी म्युच्युअल फंड्स हे त्यांच्या प्रकारानुसार पोर्टफोलियोत इंडेक्स (फंड रणनितीनुसार वेगळे असू शकतात) निराळे असू शकतात.परिणामी मगिरी ही इंडेक्सच्या तुलनेत अगदी चांगली किंवा वाईट असू शकते.

चांगली कामगिरी आणि कमकुवत कामगिरी करणारे फंड यांच्यात तुलना करणारे मुख्य सूत्र आहे. जर एखादा फंड 3 वर्षे,5 वर्षे आणि 7 वर्षे कालावधीकरिता मापदंडाच्या तुलनेत अल्प कामगिरी करत असल्यास या गोष्टी तपासून घेऊ शकता. 

  • गुंतवणूक रणनिती आणि प्रक्रियेतील समाविष्ट सातत्य. एखादा फंड एखाद्या रणनितीला चिकटून आहे का?
  • अशी अल्प कामगिरीचा ट्रेंड इतर फंडात दिसतो आहे का आणि त्याची गुंतवणूक स्टाईल एकसारखीच आहे का?
  • फंडचा दीर्घकालीन ट्रॅक रेकॉर्ड (10 हून अधिक वर्षांचा)आऊट परफॉर्मन्स आहे का?  
  • मागील कालावधीत फंडच्या कामगिरीत सातत्य होते का? 
  • गेल्या 10-15 वर्षांमध्ये 5Y आणि 3Y रोलिंग रिटर्नच्या आधारावर मापदंडापेक्षा किती % वेळा त्याने कामगिरी केली आहे ?
  • बाजारात पडझड झाल्यावर फंड मापदंडाच्या तुलनेत घसरला होता का? (फंडमधील जोखीम समजण्यासाठी रफ प्रॉक्सी)
  • फंड मॅनेजरमध्ये कोणते बदल झाले का?
  • फंड खूप दीर्घ झाला का आणि आकारमानाच्या मर्यादा आल्या का?
  • फंडकडून सुमार कामगिरीविषयी स्पष्ट आणि पारदर्शक कारणमीमांसा देण्यात आली का?

जर गुंतवणुकीची स्टाईल आणि रणनिती यामध्ये सातत्य होते, तरी अशाच इतर फंडने एकसारखी गुंतवणूक स्टाईल अनुसरून सुमार कामगिरी केल्याचे निदर्शनास आले, फंड मॅनेजमेंट टीममध्ये कोणतेही महत्त्वाचे बदल नव्हते, दीर्घकालीन ट्रॅक रेकॉर्ड प्रदीर्घ मुदतीसाठी आऊटपरफॉर्मन्सचा राहिला. बाजार चक्रात, घसरणच दिसते, सामान्यपणे बाजार पडल्यावर,आकारमानाची मर्यादा नसते आणि निधी धोरणाचे स्पष्टीकरण देणारा एक प्रामाणिक आणि पारदर्शक संवाद आहे, या संदर्भात सुमार कामगिरी ही प्रक्रियेचा एक नैसर्गिक भाग म्हणून स्वीकारली जाऊ शकते.

सुमार कामगिरी कायम राहिल्यास गुंतवणुकदाराने कधी बाहेर पडावे?

सामान्यपणे चांगला फंड (सर्व स्थितीत समाधानकारक असलेला) तात्पुरता सुमार कामगिरी करत असल्यास, 3-5 वर्षांची प्रतीक्षा करून कामगिरीत सुधारणा होते का ते पहावे. जर तरीही फंडाची कामगिरी सुमारच असेल किंवा तुम्ही याच स्टाईलचा पर्यायी फंड शोधला असेल, मात्र त्याची कामगिरी चांगली असल्यास सुमार कामगिरीच्या फंडमधून बाहेर पडावे. आदर्श कालावधी संपूर्ण बाजार चक्र कव्हर करणारे (सामान्यपणे जवळपास 5-8 वर्षे) – बूल फेज, बेअर फेज आणि रिकव्हरी फेज समाविष्ट, हा कालावधी चांगला समजला जातो, त्यात फंडचे दीर्घकालीन कामगिरी मूल्यांकन शक्य आहे.