Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

FD Laddering: एफडी लॅडर म्हणजे काय? लॅडरिंग करण्याचा सल्ला का दिला जातो?

What is FD laddering

FD Laddering Technique: एफडी हा सगळ्यात सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो. तर, एफडीमध्ये चांगला परतावा मिळावा आणि एकाचवेळी पैसे ब्लॉक होऊ नये म्हणून गुंतवणूक तज्ज्ञ एफडी लॅडरींग प्रणाली वापरण्याचा सल्ला देतात, मात्र हे एफडी लॅडर आहे तरी काय, हे आपण या लेखातून समजून घेऊयात.

How to Find the Best Fixed Deposit Interest Rate: सकाळी 10 वाजता मोबाईलची रिंग वाजली, समोरुन महिलेचा आवाज आला, "हॅलो, मी नम्रता बोलतेय, तुमच्या सेमिनार काल अटेंड केला होता, तर मला गुंतवणूक करायची आहे, त्यासाठी तुमचा सल्ला हवा होता." मी म्हटले, "हो, बोला. नेमकी काय आणि कशी मदत हवी आहे." त्या म्हणाल्या, "सर, सध्या माझ्याकडे 8 लाख आहेत आणि एफडीचाच पर्याय योग्य वाटल्याने, एफडी करायची आहे, सध्या एफडी इंटरेस्ट रेट वाढले आहेत, तर 10 वर्षांसाठी करू का असं विचारायचं होतं.." मी यावर उसास घेत म्हणालो, "बघा, सध्या एफडी रेट सिनियर सिटीझन्ससाठी वाढले आहेत आणि जनरलमध्ये बोलायचं तर प्रायव्हेट सेक्टर बँकांचे एफडी रेट हे तीन वर्षांसाठी सगळ्यात जास्त असतात, सध्या पब्लिक बँकांनी पण जे इंटरेस्ट रेट वाढवले आहेत, ते तीन वर्षांच्या ठेवीवरच वाढवले आहेत. जर तुम्हाला चांगला परतावा आणि कॅश फ्लो पाहिजे असेल तर लॅडरींग सिस्टम फॉलो करा. त्यात तुम्ही 8 लाखा रुपयांचे तीन हिस्से करा. पहिला हिस्सा तीन वर्षांसाठी एफडी करायचा, दुसरा दोन आणि तिसरा एका वर्षासाठी..ओके, पहिली एफडी मॅच्युअर झाली की ती तीन वर्षांसाठी पुन्हा एफडी करायची.. यामुळे प्रत्येक वर्षाला एक एफडी मॅच्युअर होत राहिल आणि कधी पैशांची गरज पडली ते वापरता येतील, मुख्य म्हणजे तुम्हाला तीन वर्षांच्या एफडीवर मिळणारा हायेस्ट इंटरेस्टही मिळेल.. हे पटत असेल तर 10 वर्षं वैगरे ठेवण्याच्या भानगडीत पडू नका." यावर त्या उत्साहात म्हणाल्या,"थँक्यू सो मच सर, हे गणित तर मला माहितीच नव्हतं, नाही आता मी 10 नाही तीन - तीन वर्षांची एफडी करेन, तुम्ही सांगितलं आहे ना अगदी तसंच.." नम्रता यांनी गुंतवणूक सल्लागार विवेक नाडकर्णी यांच्याकडे ही चौकशी केली होती, हा किस्सा नाडकर्णी यांनी एफडी लॅडरींगचे उदाहरण म्हणून महामनीच्या वाचकांसाठी सांगितला आहे. नम्रताचा किस्सा आपण वाचला. अशाप्रकारे अनेकांना एफडीमध्ये गुंतणूक करायची असते. तर जास्तीत जास्त परतावा मिळवण्यासाठी जे एफडी लॅडरींग केले पाहिजे, हे समजले, मात्र नेमका हा प्रकार आहे ते आता पुढे समजून घेऊयात.

बँक एफडी लॅडरिंग म्हणजे काय? (What is FD Laddering?)

मुदत ठेव, एफडी (FD: Fixed Deposit) हा गुंतवणुकीचा विश्वासार्ह आणि सुरक्षित पर्याय मानला जातो. यात ठरलेला, खात्रीशीर परतावा गुंतवणुकादारांना मिळतो. जर एखाद्या गुंतवणूकदाराला मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्यांनी 'बँक एफडी लॅडरिंग'चा वापर करावा, अशी शिफारस आर्थिक तज्ज्ञांनी केल्याचे आताच आपण वाचले. असे केल्याने, त्यांना वेळोवेळी पैसे देखील मिळतील आणि प्री-मॅच्युअर पैसे काढणे देखील टाळता येते.

बँक एफडी लॅडरिंग म्हणजे, ज्यात गुंतवणूकदार एकाच वेळी अनेक एफडी उघडतात, मात्र त्यांचा कालावधी वेगवेगळा असतो. एका व्यक्तींच्या ठेवींचा कालावधी एक वर्षाने, दोन वर्षाने पूर्ण होत जातो, म्हणून त्याला लॅडरींग असे म्हणतात. प्रत्येक वेळी एफडीसाठीची रक्कम तीन हिश्शांमध्ये विभागायची नसते. तर आपण त्याचे चार, पाच, आठ असे कितीही भाग करू शकतो. तसेच ज्या बँकेत एफडी करणार आहात, तेथील बँके प्रत्येक कालावधीनुसार किती इंटरेस्ट रेट आहे ते पाहून हिस्से करून त्या - त्या वर्षांसाठी एफडी करावी. उदाहरणार्थ, तुमच्याकडे 10 लाख रुपये असल्यास, जे मुदत ठेव म्हणून जमा करायचे आहे. प्रथम ते पाच भांगांमध्ये विभागून घ्या. आता तुम्हाला प्रत्येकी 2 लाख रुपयांच्या पाच एफडी उघडाव्या लागतील. प्रत्येक एफडीचा कालावधी वेगळा असेल. तुमच्या गरजेनुसार, ते एक वर्ष, दोन वर्षे, तीन वर्षे, चार वर्षे आणि पाच वर्षे असू शकते. याद्वारे, तुम्हाला वेळोवेळी पैसे मिळतील, जे तुम्ही तुमच्या गरजेनुसार खर्च करू शकता, असे नाडकर्णी यांनी सांगितले.

परतावा दरवर्षी बदलतो (Returns vary annually)

एफडी लॅडरमध्ये पहिल्या ठेवीचा कालावधी संपला, म्हणजे एफडी मॅच्युअर झाली की त्या पैशांची गरज नसेल तर त्या पैशांची पुन्हा एफडी करावी. पण ती एफडी किती कालावधीसाठी करावी. तीन वर्षांवर साधारण चांगला परतावा मिळतो, मात्र तरी इंटरेस्ट रेट हे प्रत्येकवेळेस बदलत असतात. त्यामुळे आपल्या बँकेत व्यवस्थित चौकशी करून आणि आपल्या पुढच्या एफडीची मॅच्युरिटी लक्षात घेऊनच  कालावधी निश्चित करावा, असे नाडकर्णी म्हणाले.

जर एकाचवेळी 10 लाखांची एफडी 10 वर्षांसाठी केली तर, त्याची मॅच्युरीटी होईपर्यंत वाट पाहावी लागते. यामुळे एकाच वेळी पैसे ब्लॉक होतात, त्यासाठी लॅडरींग सिस्टीम वापरल्यास चांगला परतावा आणि काही काही काळाने एफडी मॅच्युअर होऊन पैसे हातात येतात.