Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Down Payment: डाऊन पेमेंट म्हणजे काय? ते किती करावे लागते?

What is Down Payment

Image Source : www.canadianrealestatemagazine.ca

Down Payment: डाऊन पेमेंटमुळे कर्ज घेतलेल्या व्यक्तीवरील कर्जाचा भार कमी होण्यास मदत होते. कोणतीही बँक कर्ज फ्री मध्ये देत नाही. उलट कर्जावर भरमसाठ व्याज आकारतात. पण डाऊन पेमेंट जर जास्त केले तर कर्जाची रक्कम कमी होते. त्यामुळे व्याज आणि Loan Tenure देखील कमी होण्यास मदत होते.

Down Payment: डाऊन पेमेंट म्हणजे अशी एक रक्कम असते. जी आपण देऊन त्याच्या आधारे एखादी महागडी वस्तू पूर्ण पैसे न देता घेतो. त्याला डाऊन पेमेंट म्हणतात. कार किंवा घर घेताना प्रचलित नियमानुसार पूर्ण पैसे न देता एक ठराविक रक्कम म्हणून डाऊन पेमेंट करतो आणि त्याची उर्वरित रक्कम देण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतो.

डाऊन पेमेंटमुळे कर्ज घेतलेल्या व्यक्तीवरील कर्जाचा भार कमी होण्यास मदत होते. कारण कर्ज हे कोणतीही बँक फ्री मध्ये देत नाही. त्यासाठी भरमसाठ व्याज आकारते. या व्याजाची रक्कम खूप मोठी असते. त्यामुळे जितके कमी कर्ज घ्याल तितके व्याज कमी भरावे लागते आणि कर्ज भरण्याचा कालावधी देखील कमी होतो. त्यामुळे डाऊन पेमेंट जर जास्त केले तर आपोआप कर्जाची रक्कम कमी होते. त्यामुळे व्याज आणि Loan Tenure कमी होतो आणि ग्राहकाचा फायदा होतो.

डाऊन पेमेंट का द्यावे लागते?

घर किंवा कार खरेदी करताना सर्वांकडेच एवढे पैसे उपलब्ध नसतात. त्यासाठी कोणाकडून पैसे घ्यावे लागतात किंवा बँकेकडून कर्ज घ्यावे लागते. अशावेळी एक ठराविक रक्कम घर किंवा कार घेताना डाऊन पेमेंट म्हणून द्यावी लागते. डाऊन पेमेंट करण्याचे बँकांचे किंवा कार विक्रेत्यांचे त्यांचे स्वत:चे नियम आहेत. पण त्याचबरोबर डाऊन पेमेंट किती करायचे म्हणजे किमान पात्रतेपेक्षा जास्त डाऊन पेमेंट करण्याचा अधिकार खरेदीदाराला असतो.

बऱ्याचदा घर घेताना घराच्या एकूण किमतीच्या 6 टक्के रक्कम ही डाऊन पेमेंट म्हणून केली जाते आणि उर्वरित रक्कम बँकेकडून कर्ज स्वरूपात घेतली जाते. यासाठी बँकेकडे सदर घर तारण म्हणून ठेवले जाते. बँकेकडून घेतलेले कर्ज पूर्णपणे फेडले की, बँक घराची कागदपत्रे अर्जदाराला परत करते.

थोडक्यात, आपल्याकडे घर किंवा गाडी घेण्यासाठी पुरेशी एकत्रित रक्कम आपल्याकडे उपलब्ध नसल्याने आपण आपल्याकडील एक ठराविक रक्कम डाऊन पेमेंट म्हणून करतो आणि उरलेल्या रकमेचे कर्ज काढतो.

घर खरेदी (Home Purchases)

भारतात घर खरेदी करताना बँका किंवा नॉन-बँकिंग कंपन्या साधारणपणे 80 टक्क्यांपर्यंत होम लोन देतात. त्यामुळे घराच्या एकूण किमतीपैकी घर खरेदी करणाऱ्या व्यक्तीला 20 टक्के रक्कम ही डाऊन पेमेंट म्हणून द्यावी लागते. यामध्ये कर्ज घेणाऱ्या व्यक्तीची आर्थिक स्थिती, त्याचा क्रेडिट स्कोअर हा देखील महत्त्वाचा असतो. त्याआधारेही डाऊन पेमेंटची रक्कम बदलू शकते.

पण घर घेताना डाऊन पेमेंट जास्त केल्याने कर्ज कमी घ्यावे लागते. परिणामी कर्जाच्या ईएमआयवर भरले जाणारे व्याज आणि कर्जाचा कालावधी कमी होतो.

कार खरेदी (Car Purchases)

घराप्रमाणेच गाडी खरेदी करताना भारतात 20 ते 10 टक्क्यांपर्यंत डाऊन पेमेंट करावे लागते. काही नॉन-बँकिंग कंपन्या या अगदी 5 टक्के डाऊन पेमेंट भरून उर्वरित रकमेवर कर्ज देतात. पण कमी डाऊन पेमेंट करणाऱ्या ग्राहकांकडून जास्त व्याजदर आकारला जाऊ शकतो. त्यामुळे डाऊन पेमेंट जास्त करून कर्जाचा भार कमी करणे जास्त संयुक्तिक ठरू शकते.