Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Cyclical Stocks: सायक्लीकल स्टॉक्स म्हणजे काय?

What is Cyclical Stocks?

Cyclical Stocks: Cyclical Stocks मध्ये खासकरून कार उत्पादक, एअरलाइन्स, फर्निचर किरकोळ विक्रेते, कपड्यांची दुकाने, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स या कंपन्यांचा समावेश होतो. जेव्हा अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत असते. तेव्हा खरेदी वाढते पण जेव्हा अर्थव्यवस्था मंदावते तेव्हा खर्चावर निर्बंध येतात.

शेअर मार्केटवर ज्याप्रमाणे अर्थव्यवस्थेचा परिणाम होतो; त्याचप्रमाणे शेअर मार्केटमधील कंपन्यांवर देखील अर्थव्यवस्थेचा परिणाम होत असतो. हे दोन्ही परिणाम जरी काहीसे सारखे असले तरी ते वेगवेगळे आहेत. शेअर मार्केटवर अर्थव्यवस्था कशी परिणाम करते! (Economy Affect Stock Market) हे आपण यापूर्वी समजून घेतले. पण कंपन्यांवर अर्थव्यवस्था कशी परिणाम करते? हे समजणे देखील महत्त्वाचे आहे. शेअर मार्केटमध्ये ज्या कंपन्यांवर अर्थव्यवस्थेचा थेट परिणाम थेट होतो. त्यांना सायक्लीकल कंपनीज किंवा स्टॉक्स (Cyclical Company or Stocks) असे म्हटले जाते. आज आपण सायक्लीकॅल स्टॉक्स म्हणजे काय? व आपल्या पोर्टफोलिओमध्ये अशा स्टॉक्सचा समावेश केला पाहिजे का? हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.


स्टॉक्स म्हणजे काय? What is Cyclical Stocks?

Cyclical Stocks हे अशा कंपन्यांचे स्टॉक्स असतात; ज्याची किंमत अर्थव्यवस्थेतील मॅक्रो इकॉनॉमिक किंवा वेगवेगळ्या घडामोडींमुळे प्रभावित होत असते. सायक्लीकल शेअर्स हे खासकरून मार्केटमधील उच्चांक, मंदी आणि पुनर्प्राप्तीद्वारे अर्थव्यवस्थेच्या चक्रांचे होणाऱ्या परिणामांचे मापन करण्यासाठी ओळखले जातात. बर्‍याच सायक्लीकल स्टॉक्समध्ये अशा कंपन्यांचा समावेश असतो. ज्या ग्राहकांची स्थिती सांगण्याचा प्रयत्न करत असतात. जसे की, अर्थव्यवस्था जेव्हा तेजीमध्ये असते तेव्हा बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी होते. पण अर्थव्यवस्था जेव्हा मंदगतीने जात असते. तेव्हा खरेदीची प्रमाण कमी होते.

What is Cyclic Stock

Cyclical Stocks मध्ये खासकरून कार उत्पादक, एअरलाइन्स, फर्निचर किरकोळ विक्रेते, कपड्यांची दुकाने, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स या कंपन्यांचा समावेश होतो. जेव्हा अर्थव्यवस्था सुस्थितीत असते, तेव्हा नवीन कार खरेदी करणे, घरांचे सुशोभिकरण करणे, नवीन दुकान विकत घेणे, परदेश किंवा देशांतर्गत प्रवास करण्याचे प्रमाण वाढते. पण जेव्हा अर्थव्यवस्था वाईट स्थितीतून जात असते. तेव्हा आपोआप लोकांच्या खर्चावर निर्बंध येतात. मंदी तीव्र असेल तर सायक्लीकल स्टॉक्स पूर्णपणे खाली येऊ शकतात. काही परिस्थितीत कंपन्या या व्यवसायातून बाहेर पडण्याचा धोका ही असतो. संबंधित कंपनी किंवा त्या कंपनीच्या शेअर्सची ही प्रतिक्रिया पूर्णपणे अर्थव्यवस्थेच्या चक्रावर अवलंबून असते. त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या आलेखानुसार हे स्टॉक्स कधी वर जातील आणि कधी खाली येतील, याचा अंदाज लावणे सोपे होऊ होते. याचाच काही गुंतवणूकदार फायदा घेतात. त्यांना अशा स्थितीचा अंदाज आला की, ते लो पॉईंटवर हे शेअर्स विकत घेतात आणि नंतर हाय पॉईंटवर त्याची विक्री करून फायदा मिळवतात.

सायक्लीकल स्टॉक्स वि. नॉन-सायक्लीकल स्टॉक्स | Cyclical Stocks Vs. Non-Cyclical

Cyclical Stocks ची कामगिरी अर्थव्यवस्थेशी संबंधित असते. पण नॉन-सायक्लीकल स्टॉक्सबद्दल असे म्हणता येणार नाही. कारण अर्थव्यवस्थेत मंदीचे वातावरण असतानाही हे स्टॉक्स वेगळे परिणाम दर्शवतात. नॉन-सायक्लीकल स्टॉकला बचावात्मक स्टॉक्स किंवा डिफेन्सिव्ह स्टॉक्स (Defensive Stocks) देखील म्हणतात. या स्टॉक्समध्ये असा वस्तू आणि सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांचा समावेश असतो; ज्यांची आर्थिक मंदीच्या काळातही खरेदी केली जाते. जसे की, ज्या कंपन्या अन्नपदार्थ, गॅस किंवा लोकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित वस्तुंची विक्री करतात. त्यांचा या कंपन्यांमध्ये समावेश होतो आणि त्या कंपन्यांच्या शेअर्सना नॉन-सायक्लीकल स्टॉक्स म्हटले जाते. आपल्या पोर्टफोलिओमध्ये नॉन-सायक्लीकल स्टॉक्स ठेवणे हे एक गुंतवणूकदार म्हणून चांगले धोरण ठरू शकते. कारण ते आर्थिक मंदीच्या काळात Cyclical कंपन्यांकडून होणाऱ्या नुकसानापासून बचाव करण्यास मदत करू शकते.

इंडियन शेअर मार्केटमधील काही Cyclical Stocks ची उदाहरणे

Cyclical सेक्टर

कंपनी (Company)

इंडस्ट्री (Industry)

कॅपिटल गुड्स सेक्टर 
(Capital Goods Sector)

HEG लिमिटेड

उत्पादन (Manufacturing)

ग्रेफाइट इंडिया लि. (Graphite India Ltd.)

उत्पादन (Manufacturing)

एनबीसीसी (इंडिया) लि. (NBCC (India) Ltd.)

बांधकाम (Construction)

हनीवेल ऑटोमेशन इंडिया लि.

(Honeywell Automation India Ltd.)

उत्पादन (Manufacturing)

श्री सिमेंट लि.

(Shree Cement Ltd.)

बांधकाम साहित्य (Building Materials)

BFSI Sector
(बीएफएसआय सेक्टर)

फेडरल बँक लि.

(Federal Bank Ltd.)

बँकिंग (Banking)

एचडीएफसी बँक लि.

(HDFC Bank Ltd.)

बँकिंग (Banking)

कोटक महिंद्रा बँक लि.

(Kotak Mahindra Bank Ltd.)

बँकिंग (Banking)

सिटी युनियन बँक लि.

 (City Union Bank Ltd.)

बँकिंग (Banking)

आयसीआयसीआय बँक लि.

(ICICI Bank Ltd.)

बँकिंग (Banking)

Auto Sector
(ऑटो सेक्टर)

महिंद्रा अँड महिंद्रा लि.

(Mahindra & Mahindra Ltd.)

ऑटोमोबाईल (Automobile)

आयशर मोटर्स लि.

(Eicher Motors Ltd.)

ऑटोमोबाईल (Automobile)

बजाज ऑटो लि.

(Bajaj Auto Ltd.)

ऑटोमोबाईल (Automobile)

TVS मोटर कंपनी लि.

(TVS Motor Company Ltd.)

ऑटोमोबाईल (Automobile)

मारुती सुझुकी इंडिया लि. 

(Maruti Suzuki India Ltd.)

ऑटोमोबाईल (Automobile)