Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

How to Choose Cryptocurrency Exchange? क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज निवडायचे कसे?

Crypto Exchange

क्रिप्टोकरन्सीमध्ये Investment करताना क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज अत्यंत महत्त्वाचे असते. या एक्सचेंजचा छोटासा का होईना परिणाम गुंतवणूकदाराच्या Investment वर होत असतो. तो कसा होतो? एक्सचेंजचे महत्त्व काय आहे? एक्सचेंज कसे निवडायचे? याबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत.

क्रिकेट मॅच सुरु होण्याआधी काही लोक येऊन क्रिकेट ग्राउंडवरील पीच बद्दल चर्चा करताना आपण सर्वानीच पहिले आहे. आपल्याला महत्वाच्या न वाटणाऱ्या ह्या चर्चेचे महत्व खेळाडूंना पुरेपूर माहित असते. मॅच सुरु असताना टाकल्या जाणाऱ्या प्रत्येक बॉल वर पीचचा परिणाम होत असतोच. त्यामुळे क्रिकेट मॅच मध्ये चांगले पीच, टीमच्या विजयामध्ये मोठी भूमिका बजावते. ज्याप्रमाणे क्रिकेट मॅचमध्ये पीच महत्वाचे असते त्याचप्रमाणे क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) इन्वेस्ट्मेन्ट्स मध्ये क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज (Cryptocurrency Exchange) महत्वाचे असते. मॅच मध्ये बॉल वर ज्याप्रमाणे पीचचा परिणाम होतो त्याप्रमाणे आपल्या इन्वेस्ट्मेन्ट्स वर देखील एक्सचेंजचा छोटा का होईना पण परिणाम होताना दिसतो. हा परिणाम कसा होतो? एक्सचेंजचे महत्व इतके का आहे? मग योग्य एक्सचेंज कसे निवडायचे? असे प्रश्न तुम्हाला पडले असतीलच. चला तर मग जाणून घेऊयात क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज निवडायचे कसे?


तुम्हाला माहिती आहे का एका महिन्यात हजारो नव्या डिजिटल करन्सीज बाजारामध्ये येतात. ज्या वेगाने हे क्षेत्र मोठे होत आहे ते पाहून आपल्यासारख्या गुंतवणूकदारांची उत्सुकता अजून वाढू लागते. कोणती क्रिप्टोकरन्सी घ्यायची ? स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे ? किती इन्व्हेस्टमेंट करायची ? ह्या सर्व गोष्टींसोबतच आपले, असेट सुरक्षित कसे राहील ह्या गोष्टीवर विचार करणे देखील महत्वाचे आहे व आपल्यासारख्या नव्या व उत्सुक गुंतवणूकदारांनी ह्या गोष्टींचा विचार करूनच मार्केट मध्ये उतरले पाहिजे. गुंतवणूकदारांनी क्रिप्टोकरन्सीमध्ये कुठे आणि कसे व्यवहार करावे आणि टोकन्स स्टॅक करणे (बक्षिसे मिळविण्याचा मार्ग किंवा विशिष्ट क्रिप्टोकरन्सी ठेवण्यासाठी व्याज मिळवणे) याचे मूल्यमापन करणे आवश्यक आहे. एक्सचेंजेस ब्रोकर प्रमाणेच कार्य करतात. तुम्हाला बिटकॉइन, इथरियम आणि टिथर इत्यादी सारख्या क्रिप्टोकरन्सीच्या खरेदी आणि विक्रीसाठी लागणारी साधने एक्सचेंजेसद्वारे पुरविली जातात. गुंतवणुकीसाठी लागणाऱ्या बेस्ट एक्सचेंजची निवड करताना, तुम्ही खाली दिलेल्या पॉइंट्सची मदत घेऊ शकता.

सावध रहा!

क्रिप्टोकरन्सी मार्केट मध्ये छोटे-मोठे घोटाळे होत असतात. अनेक एक्सचेंजेस मध्ये घोटाळे झालेले आहेत, अनेक एक्सचेंजेस हॅक झालेले आहेत त्यामुळे गुंतवणूक करताना असो किंवा अगदी गुंतवणुकीचा विचार करताना असो आपण सावधानता ही बाळगलीच पाहिजे. एक्सचेंज निवडताना सर्वप्रथम एक्सचेंजशी संबंधित असणारा भौतिक पत्ता (Physical Address) शोधावा. जर हा पत्ता नसेल तर त्या एक्सचेंजचा विचार करणे सोडून द्या. कारण एक्सचेंज मध्ये पारदर्शिकता असणे महत्वाचे आहे.

त्यानंतर दुसरे म्हणजे एक्सचेंज कुठे आधारित आहे हे जाणून घ्या कारण त्याशिवाय तुम्हाला गुंतवणुकीचे कायदेशीर परिणाम समजणार नाहीत. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर क्रिप्टोकरन्सी मार्केटवरील कायदे प्रत्येक देशासाठी वेग-वेगळे आहेत त्यामुळे ह्या देशांतील एक्सचेंजचा वापर करताना त्या कोणत्या देशातील आहेत हे जाणून घेतल्याने त्यावरील कायदेशीर नियमांबद्दल आपल्याला माहिती मिळू शकते.

तुमचा स्वत: रिसर्च करा!

तुम्ही जेव्हा कोणत्याही एक्सचेंज वर तुमचे अकाउंट तयार करता तेव्हा तुम्ही तुमचा संपूर्ण विश्वास त्या एक्सचेंजला देता. तुमची सर्व खाजगी माहिती तुम्ही एक्सचेंजला देता. आपण कोणावरही विश्वास ठेवण्याआधी थोडा वेळ नक्कीच घेतो. त्यामुळे एक्सचेंज वर एवढा मोठा विश्वास ठेवण्याआधी थोडा वेळ नक्कीच घ्या. आपला रिसर्च केल्यानंतरच हे एक्सचेंज ठरावा. एक्सचेंजची मार्केटमध्ये असलेल्या प्रतिष्ठेचा वापर तुम्ही करू शकता. इतर लोकांचे त्या एक्सचेंज बद्दलचे मत काय आहे हे ही रिसर्चदरम्यान उपयोगी ठरू शकते.

उच्च सुरक्षितता महत्वाची

एखाद्या एक्सचेंजमध्ये जर अकाउंट तयार करणे खूप अवघड असेल तर त्याची सुरक्षितता देखील तेवढीच मजबूत असू शकते हे सोपे गणित आहे. जर अकाउंट तयार करणेच अगदी सोपे असेल तर ते हॅक होणे अजून सोपे आहे. अश्यावेळी जर तुमचे अकाउंट हॅक झालेच तर ते लवकर ट्रॅक करता येत नाही व त्यामुळे तुमची इन्व्हेस्टमेंट पुनर्प्राप्त करण्यास भरपूर वेळ लागू शकतो. कोणतेही एक्सचेंज तुम्ही घ्या, आपल्या असेटमधील मोठा हिस्सा ऑफलाइन स्टोरेजमध्ये ठेवायला विसरू नका.

जादा फी पासून सावध रहा!

समाजा तुम्हाला आता एक चांगले एक्सचेंज भेटले, ज्यामध्ये सुरक्षितता अगदी उत्तम दर्जाची आहे, हॅकिंगचा कसलाच इतिहास नाही, आणि याची मार्केटमध्ये खूप चांगली प्रतिष्ठा आहे, परंतु जर तुमच्या प्रत्येक इन्व्हेस्टमेंट मधून मोठा हिस्सा एक्सचेंजची फी देण्यातच जात असेल तर मग फायदा काय? त्यामुळे एक्सचेंजच्या फी बाबतची माहिती घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही दररोज ट्रेडिंग करणार असाल तर कमी फी असणाऱ्या एक्सचेंजची निवड करणे तुम्हाला सोईचे ठरेल. तुम्ही ईथरचा व्यवहार करण्याचा विचार करत असल्यास, तुम्हाला विविध प्रकारच्या व्यवहारांशी संबंधित असलेल्या “गॅस" शुल्काविषयी माहिती असायला हवी.

क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज ब्रोकर प्रमाणेच कार्य करतात. तुम्हाला क्रिप्टोकरन्सी सहज खरेदी आणि विक्री करण्यासाठी साधने देतात. ते तुमच्या डिजिटल मालमत्तेसाठी सुरक्षितता, वैशिष्ट्ये आणि स्टोरेज पर्याय देखील देतात जे तुमच्या स्वतःच्या वॉलेट सॉफ्टवेअरची देखभाल करण्यापेक्षा चांगले असू शकतात. क्रिप्टो एक्सचेंजच्या ह्या फायद्यांसोबतच त्यांचे तोटे देखील आहेत. सर्वात महत्वाचा तोटा म्हणजे ते हॅकर्सची पहिली पसंत असतात. ह्यावरून तुमचा रीसरर्च किती महत्वाचा आहे, हे तुम्हाला समजले असेलच. वर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे व आपला अभ्यास केल्यानंतरच एक्सचेंजमध्ये अकाउंट तयार करा. कारण आपण ज्या गोष्टीवर आपला एवढा मोठा विश्वास ठेवणार आहोत त्याबद्दलचे सर्व ज्ञान आपल्याला असलेच पाहिजे, नाहीतर भविष्यात विश्वासघात होऊ शकतो.