Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Cryptocurrency Key म्हणजे काय?

Cryptocurrency Keys

Cryptocurrency Keys : क्रिप्टोकरन्सी सुरक्षित ठेवण्यासाठी व क्रिप्टोचे व्यवहार सुरक्षित करण्यासाठी Crypto Key ची निर्मिती केली गेली. या Keysचे क्रिप्टो ट्रान्सॅक्शनमध्ये खूप महत्त्व आहे. चला तर मग जाणून घेऊयात काय आहेत या Cryptocurrency Keys आणि त्या का महत्त्वाच्या आहेत?

क्रिप्टोकरन्सी मार्केट त्यांच्या सुरक्षिततेसाठी ओळखले जाते. हॅकर्सचे प्रमाण जास्त असल्याने क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाते. क्रिप्टोकरन्सी तयार होण्यापासून ते तिचे व्यवहार होईपर्यंतची पूर्ण प्रकिया अनेक भागात विभागलेली आहे व या प्रत्येक भागावर टॉप क्लास सुरक्षा दिली गेली आहे. ही सुरक्षा देताना अनेक नवीन संकल्पना उदयास आल्या. या संकल्पनांपैकी एक महत्त्वाची संकल्पना म्हणजे क्रिप्टोकरन्सी कीज् (Cryptocurrency Keys). आपली क्रिप्टोकरन्सी सुरक्षित ठेवण्यासाठी व तिचे सुरक्षित व्यवहार करण्यासाठी या Key ची निर्मिती केली गेली व त्यांचे महत्व भरपूर आहे. चला तर मग जाणून घेऊयात काय आहेत या Cryptocurrency Keys आणि त्या का महत्त्वाच्या आहेत?

क्रिप्टोकरन्सी की चे प्रकार (Types of Cryptocurrency)

क्रिप्टोकरन्सी कीज् दोन प्रकारच्या (Two Types of Cryptocurrency) असतात. एक पब्लिक की (Public Key) आणि दुसरी प्रायव्हेट की (Private Key). या Keys च्या वापरामुळे क्रिप्टोकरन्सची देवाण-घेवाण कोणत्याही थर्ड-पार्टीच्या व्हेरिफिकेशनशिवाय करता येते. या Keys प्रामुख्याने पब्लिक की क्रिप्टोग्राफी फ्रेमवर्क (Public Key Cryptography Framework)चा वापर करतात. हे एक नवे तंत्रज्ञान आहे; ज्याचा वापर डेटाची ऑथेन्टिसिटी करण्यासाठी केला जातो. अॅसिमेट्रिक एनक्रिप्शन (Asymmetric Encryption) या टेक्नॉलॉजीचा वापर यासाठी केला जातो. क्रिप्टोकरन्सीज या तंत्रज्ञानाचा वापर व्यवहार एनक्रिप्ट (Encrypt) आणि डिक्रिप्ट (Decrypt) करण्यासाठी वापरतात. पब्लिक की आणि प्रायव्हेट की ह्या दोन्ही वेगवेगळ्या जरी असल्या तरी त्यांचे महत्त्व हे एकमेकांमुळेच जास्त आहे.


पब्लिक की म्हणजे काय? What is Public Keys?

पब्लिक की हा एक क्रिप्टोग्राफिक कोड (Cryptographic Code) आहे; जो Private Key शी जोडलेला असतो. Public Key मुळे आपल्याला कोणतीही देवाण-घेवाण करणे शक्य होते. Public Keys द्वारे कोणीही ट्रान्सॅक्शन करू शकतो. पण त्यांना “अनलॉक" करण्यासाठी आणि Transaction द्वारे झालेल्या क्रिप्टोकरन्सीचे तुम्ही मालक आहात, हे सिद्ध करण्यासाठी तुम्हाला Private Keys आवश्यक आहे. Public Key हा एक अॅड्रेस (Address) आहे; ज्यावर क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार पाठवले जातात. त्यामुळे तुम्ही तुमची Public Key कोणतीही भीती न बाळगता कोणालाही शेअर करू शकता. अनेकवेळा डोनेशन पेजेस त्यांच्या क्रिप्टो व्यवहाराच्या Public Keys, त्यांच्या पेज वर टाकतात. ज्याच्याआधारे त्यांना क्रिप्टो स्वरूपात केलेले डोनेशन त्यांनी दिलेल्या अॅड्रेसच्या मदतीने त्यांच्या अकाउंटला त्या जमा होतात. 

प्रायव्हेट की म्हणजे काय? What is Private Keys?

प्रायव्हेट की (Private Key) म्हणजे काय? हे समजून घेण्याआधी एक गोष्ट लक्षात घ्या की, कोणालाही Private Key कधीही देऊ नका. तुमच्या क्रिप्टोकरन्सी या तुमच्याच आहेत. हे सिद्ध करण्यासाठी व त्या क्रिप्टोकरन्सी खर्च करण्यासाठी किंवा त्यांचे व्यवहार करण्यासाठी तुम्हाला Private Key ची गरज असते. प्रायव्हेट की हा एक मोठा नंबर असतो; जो 256 कॅरेक्टर बायनरी कोड (256 Character Binary Code) किंवा 64 डिजिट हेक्साडेसिमल कोड (64 Digit Hexadecimal Code) किंवा क्यू.आर. कोड (QR Code) किंवा मेमोनिक फ्रॅज (Mnemonic Phrase) असू शकतो. प्रायव्हेट की च्या मदतीने तुम्ही तुमची पब्लिक की जनरेट करू शकता. पण पब्लिक की च्या मदतीने प्रायव्हेट की जनरेट करणे अशक्य आहे. याचे कारण, “ट्रॅपडोर फंक्शन” (Trapdoor Function) असे सांगतले जात. याबाबतची अधिक माहिती आपण इतर लेखामध्ये घेऊ. तुम्ही अनेक पब्लिक की तुमच्या प्रायव्हेट की सोबत कनेक्ट करू शकता. 

क्रिप्टोकरन्सी मार्केटने पब्लिक की आणि प्रायव्हेट की या संकल्पना जन्माला घालून क्रिप्टो व्यवहारातील सुरक्षिततेची जबाबदारी उत्तमपणे पार पाडत आहेत. पण क्रिप्टो गुंतवणूकदाराने ही प्रायव्हेट की सांभाळून ठेवण्याची व तिची सुरक्षा करण्याची जबादारी सांभाळणे खूप गरजेचे आहे. प्रायव्हेट की सारखी महत्त्वाची गोष्ट तुम्ही कागदावर लिहून तुमच्या खिशात नाही ठेवू शकत. या की बाबात सुरक्षितता बाळगणे खूप गरजेचे आहे. यासाठी तुम्ही क्रिप्टो वॉलेट्सचा (Crypto Wallets) वापर करू शकता. शेवटी आपल्या पैशांची सुरक्षा हा सर्वांत महत्त्वाचा प्रश्न आहे.