Cardekho Auction: कारदेखो.कॉम या संकेतस्थळावर जुन्या कार, दुचाकींचा लिलाव केला जातो. लिलावामध्ये बोली लावून स्वस्तात सेकंड हँड गाड्या खरेदी करता येऊ शकतात. मात्र, हा लिलाव नक्की कोणासाठी असतो. लिलावामध्ये सहभागी होण्यासाठी शुल्क किती हे आपण पाहूया.
कारदेखो ऑक्शन नक्की कोणासाठी?
कारदेखो संकेतस्थळावरील ऑनलाइन गाड्यांचा लिलाव हा जुन्या कार खरेदी विक्री करणाऱ्या डिलर्स/पार्टनर्ससाठी आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी हा लिलाव नाही.
लिलावासाठीच्या गाड्या येतात कुठून?
Car dekho Auction: विविध बँका, फायनान्स कंपन्या, विमा कंपन्या, बिगर बँक वित्त संस्था ग्राहकांना वाहन कर्ज देत असते. या कर्जाची परतफेड न झाल्यास कर्ज बुडीत निघाल्यास बँकेकडून वाहन जप्त केले जाते. ही वाहने वित्तसंस्था विक्री करून पैसे वसूल करते. कार देखो.कॉम बँका आणि वित्तसंस्थांकडील या गाड्यांचा लिलाव करते.
डिलर्सना सहभागी होण्याची प्रक्रिया काय?
कार, आणि दुचाकी डिलर्स कार देखो संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन नोंदणी करू शकतात. नोंदणी केल्यानंतर एक मेल येईल. त्यावर पॅन कार्ड, रहिवासी पुरावा आणि रद्द केलेला चेक कार देखो कंपनीला जमा करावा लागेल. तसेच नोंदणी शुल्क जमा करावे लागेल.
लिलावासाठी नोंदणी शुल्क आणि बोली प्रक्रिया
बँक लिलावासाठी 8,850 रुपये, ग्राहक लिलावासाठी 6,200 रुपये नोंदणी शुल्क आहे. (Car dekho Auction) हे नोंदणी शुल्क डिलरला ऑनलाइन भरता येईल. लिलावात सहभागी होण्यासाठी 10 हजार रुपये रिफंडेबल अनामत रक्कम जमा करावी लागेल.
कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर दोन दिवसानंतर लिलाव पोर्टलवर लॉगइन करता येईल. युझरनेम, पासवर्ड कंपनीकडून दिला जाईल. (How to participate in Car dekho Auction) त्यानंतर गाड्यांच्या लिलावात सहभागी होता येईल. (Car dekho Auction) लिलावात गाडी जिंकल्यानंतर तेवढे पेमेंट करून कार डिलर्सला घेता येईल. डिलर्सकडून ग्राहकांना अशा कार पुन्हा विक्री केल्या जातात. कार देखो कंपनीचा प्रतिनिधी या प्रक्रियेत डिलर्सला मदत करतो.
कोणत्या गाड्यांचा लिलाव होतो?
कार, दुचाकी, ट्रक, टेम्पो, बस, आलिशान गाड्यांचा लिलाव पोर्टलवर होतो. सोबतच फ्लॅट, शेतीची अवजारे, मशिनरीचाही लिलाव होतो.