जसे आपल्याला पॅनकार्ड गरजेचे असते; तसेच प्रत्येक करदात्याला टॅनकार्ड (Tan Card) गरजेचे असते. पॅनकार्ड प्रमाणेच टॅनकार्डवर 10 अंकी अल्फा-न्यूमेरिक (अक्षरं आणि क्रमांक असलेला) ओळख क्रमांक असतो. ही दोन्ही कार्ड दिसायला सारखीच असली तरी या दोन्ही कार्डचा वापर वेगवेगळ्या कारणांसाठी केला जातो. प्रत्येक वेळी प्राप्तिकर संग्राहक (Tax Collector) कराची रक्कम अधिकाऱ्यांकडे जमा करतो, तेव्हा टॅन क्रमांक (TAN Number) आवश्यक असतो. जोपर्यंत टॅन क्रमांकचा उल्लेख केला जात नाही. तोपर्यंत आयकर विभाग कोणतेही टीडीएस रिटर्न (TDS Return) आणि पेमेंट स्वीकारत नाही.
टॅनकार्डची आवश्यकता (TAN CARD Requirement)
टीडीएस/टीसीएस रिटर्न (TDS/TCS Return), टीडीएस/टीसीएस पेमेंट चलन (TDS/TCS Payment Invoice) आणि टीडीएस/टीसीएस (TDS/TCS) प्रमाणपत्रांसाठी टॅनकार्ड अनिवार्य आहे. तुम्ही तुमचा TAN काढला नाही तर, कलम 203A अंतर्गत 10,000 रुपयांचा दंड तुमच्यावर आकारला जाऊ शकतो. याशिवाय आयकर विभाग तुमचा TDS स्वीकारणार नाही. तसेच तुमचा पॅन क्रमांक तुमच्या टॅम क्रमांकासाठी पर्याय म्हणून काम करू शकत नाही. पॅनकार्ड (PAN Card) आणि टॅनकार्ड (TAN Card) दोन्ही वेगवेगळ्या कारणांसाठी जारी केले जातात. तसेच काही ठिकाणी आयटी विभागाने परवानगी दिल्याशिवाय ते एकमेकांसाठी पर्याय म्हणून वापरले जाऊ शकत नाहीत.
टॅनकार्ड (TAN Card) कोणासाठी आवश्यक आहे?
इन्कम टॅक्स विभागाच्यावतीने टीडीएस कापण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्वांनाच TAN साठी अर्ज करावा लागेल. ही कायदेशीर गरज आहे; कारण आयकर कायद्याच्या कलम 203A मुळे जे लोक उत्पानांवर कर कपात करतात. त्यांना TAN साठी अर्ज करणे अनिवार्य करते. टॅनकार्डसाठी फोटो, पत्याचा पुरावा आणि आधारकार्ड हे कागदपत्रे लागतात.
TAN साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?
1. अधिकृत NSDL-TIN वेबसाइटवर जा.
2. सर्व्हिस या पर्यायावर क्लिक करून 'TAN' वर क्लिक करा.
3. TAN अंतर्गत 'ऑनलाइन अर्ज करा' पर्यायावर क्लिक करा.
4. नवीन TAN साठी किंवा बदल/सुधारणा हे पर्याय वापरू शकता.
5. फॉर्ममधील सर्व माहिती भरा.
6. आवश्यक शुल्क भरा आणि 'सबमिट' वर क्लिक करा.
नवीन TAN साठी प्रक्रिया शुल्क, तसेच TAN मधील बदल करण्यासाठी 65 रुपये शुल्क आकारले जाते. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, डिमांड ड्राफ्ट किंवा चेकद्वारे TAN साठीची फी भरू शकता. फी भरल्यानंतर स्क्रीनवर 14 अंकांचा पावती क्रमांक येईल. या क्रमांकाच्या आधारे TAN च्या स्थितीचा मागोवा घेऊ शकता. टॅनकार्ड, पॅनकार्ड प्रमाणेच घरपोच मिळते.