आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांना लिंक करण्याची अंतिम मुदत 31 मार्च, 2022 ला संपत आहे. तुम्ही अजून तुमचे आधार कार्ड पॅन कार्डला लिंक केले नसेल तर ते लवकर करून घ्या. भारतीय इन्कम टॅक्स संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स (CBDT)च्या परिपत्रकानुसार 31 मार्च, 2022 पर्यंत आधार आणि पॅन कार्ड एकमेकांना लिंक करणे बंधनकारक केले आहे.
तुम्ही जर आधारला पॅन कार्ड अजून लिंक केलेले नाही आणि तरीही इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला याचा त्रास होऊ शकतो. कारण इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आधार कार्डला पॅन कार्ड लिंक असल्याशिवाय पुढील प्रोसेस करण्यासाठी मान्यता देत नाही. तसेच दिलेल्या वेळेत ही प्रक्रिया पूर्ण केली गेली नाही तर तुम्हाला 10 हजार रूपयांचा दंड लागू शकतो. तसेच तुमचे पॅन कार्ड इनअक्टव्ही केले जाऊ शकते.
आधारला पॅन कार्ड लिंक करण्याची आम्ही तुम्हाला एकदम साधी आणि सोपी पद्धत सांगणार आहोत. ती पाहून तुम्ही काही सेकंदामध्ये ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्स वेबसाईटवर लॉगिन करण्याची ही गरज नाही. फक्त तुमच्याकडे तुमचा आधार कार्ड क्रमांक आणि पॅन कार्ड क्रमांक असण्याची गरज आहे.
सर्व प्रथम तुम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या https://incometaxindiaefiling.gov.in या साईटला भेट द्या.
- इन्कम टॅक्स वेबसाईटच्या होम पेजवरील क्विक लिंक्स (Quick Links) या टॅबवरील लिंक आधार (Link Aadhar) यावर क्लिक करा.
- Link Aadhar वर क्लिक केल्यावर नवीन विंडो ओपन होईल.
- इथे तुम्हाला सर्वप्रथम पॅन कार्ड क्रमांक, आधार कार्ड क्रमांक, आधार कार्ड जसे नाव आहे तसेच इथेही टाकायचे आहे. आणि शेवटी मोबाईल क्रमांक टाकायचा आहे.
- त्यानंतर तुम्हाला 2 प्रश्नांची उत्तरे टीकमार्क करून द्यायची आहेत. पहिला प्रश्न आधार कार्डवर फक्त जन्म तारखेचे वर्ष आहे. दुसरा प्रश्न या प्रक्रियेसाठी आधार कार्डवरील माहिती तपासण्यासाठी मी तुम्हाला संमती देत आहे.
- त्यानंतर लिंक आधार या बटनावर क्लिक केले की, तुमची प्रक्रिया पूर्ण होते.
अशाप्रकारे तुम्ही तुमचे आधार पॅन कार्डला लिंक करू शकता.