Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Instant Food Market: डिआयवाय फूड किट म्हणजे काय? इंस्टंट फूडला हे किट टक्कर देऊ शकते?

DIY Food kit

Instant Food Market: इंस्टंट फुडसारखा, डिआयवाय फूड किट असे पदार्थ सध्या बाजारात उपलब्ध झाले आहेत. काय आहेत हे डिआयवाय पदार्थ, त्यांची किंमत किती, ते कसे खायचे असतात हे सर्व जाणून घेण्यासाठी ही स्टोरी पूर्ण वाचा.

DIY Food: डिआयवाय म्हणजे डू इट युअरसेल्फ! यात मुख्यत्त्वे स्वत:चे स्वत: करणे, त्यासाठीच्या काही सोप्प्या ट्रिक्स सांगणारे अनेक व्हिडीओज काही वर्षांपूर्वी खूप व्हायरल झाले होते. खरेतर हे व्हिडीओ परदेशातून विशेषत: अमेरिकेतून प्रदर्शित होत असत. तेथे सर्व कामे स्वत:ची स्वत: करावी लागतात, तेथे कोणी नोकर किंवा छोट्या - छोट्या कामांसाठी कारागीर येत नाहीत किंवा त्यांची फी परवडत नाही, यामुळे तेथे सर्व कामे स्वत:ची स्वत:च केली जातात. ही कामे करताना काही ट्रीक्स वापरल्या तर कामे सोप्पी होऊ शकतात, यामुळे हे डिआयवाय व्हिडीओज प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर त्यांना भारतातही चांगला प्रतिसाद मिळाला. त्याच धर्तीवर डिआयवाय असे अनेक प्रोडक्ट मिळू लागले. आता डिआयवाय फूड किटही मिळते.

डू इट युअरसेल्फ फूड किट म्हणजे काय, तर थोडक्यात सांगायचे तर इंस्टंड फूडचा नवा प्रकार. यात पिझ्झा, पास्ता, सँडविच, रामेन आदी कोणतेही पदार्थ असतात. उदाहरणार्थ, पिझ्झा असेल तर, पिझ्झा बेस, त्याचा सॉस, भाज्या, चीझ अशी सर्व सामग्री दिलेली असते. ते सर्व पदार्थ असेंबल करून पिझ्झा बनवायचा आणि बेक करून खायचा. पास्ता असेल तर त्यात काहीवेळा शिजवलेला पास्ता येतो तर कधी न शिजवलेला कुठून, किती दुरून किट मागवला आहे त्यावर हे अवलंबून आहे की पास्ता कसा असेल. तर यात भाज्या, पास्ता सॉस, तेल आदी गोष्टी दिलेल्या त्या एकत्र करून आपण बनवायचे आणि खायचे. डिआयवाय फूड किटचा जुना प्रकार म्हणजे भेळ हल्दिराम, छेडा यांची भेळेची पाकिटे. ज्यात कुरमुरे, शेव, चटण्या आदींचे वेगवेगळी पाकिटे असत, ती एकत्र केली की बनली भेळ.

डिआयवाय किटमधील पदार्थ खूप वेळ शिजायला लागणारे नसतात. यात झटपट बनणारे पदार्थ असतात. फ्रॅझोसारख्या ऑनलाईन ग्रोसरी शॉपमध्ये सांबार, व्हेज कोल्हापूरी, कढाई पनीर, पुलाव आदी पदार्थ बनवण्यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तूंचा बॉक्स किट विकण्यासाठी असतो. ज्यामुळे त्या पदार्थांसाठीची सामग्री सगळीकडे शोधत राहायला नको, पटकन किट काढला, पदार्थ बनवायला घेतला.

डिआयवाय फूड किट हा प्रकार सध्या अगदीच प्राथमिक पायरीवर आहे. मात्र सध्या जे शॉप्स याची विक्री करत आहेत, त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. सॉवरिन हे इटालियन पदार्थांचे डिआयवाय किट विकतात, असे इटालियन पदार्थांचे किट विकणारी ही पहिलीच कंपनी आहे. त्यांचे दर महिन्याला साधारण 120 किट विकले जातात. 2021 मध्ये हे किट 50 विकले जात होते, म्हणजेच अशाप्रकारच्या पदार्थांकडे नागरिक आकर्षित होत आहेत.

डिआयवाय फूडचे भविष्य (The future of DIY food)

डिआयवाय फूड किटची किंमत प्रत्येक पदार्थानुरुप वेगळी असते. इटालियन पदार्थ कमीत कमी 800 रुपयांपासून मिळतात. तर भाज्या 50 रुपयांपासून मिळतात. या प्रकाराबाबत अजुनही व्यावसायिक साशंक आहेत. अशा पदार्थांच्या विक्रीचे प्रमाण वाढले असले तरी हा प्रकार कितपत वाढेल, हा व्यवसाय खरेत स्केलेबल आहे का? सगळ्यांना कितपत आवडेल याबाबतही अजून शंकाच आहे. तसेच, या पदार्थांचे थेट कॉम्पिटीशन हे इंस्टंट फूडशी असणार आहे आणि आज इंस्टंट फूडचे मार्केट खूप मोठे झाले आहे, त्यात याचा तग लागणे सध्या तरी कठीण दिसत आहे. मात्र येणारा काळ डिआयवाय फूड किटचे भविष्य ठरवेल, असे स्वस्तिक एंटरप्रायझेस फूडचे मार्केटींग प्रमुख मनोज डोंगरे यांनी सांगितले.